Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आयएसपी मजदूरांच्या वारसांना नोकरी

$
0
0
नाशिकरोडच्या भारत प्रतिभुती मुद्रणालयातील (आयएसपी) मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळाली पाहीजे, या आयएसपी मजदुर संघाच्या मागणीला केंद्र सरकारच्या लिगल सेलने अंतिम मंजुरी दिल्याने लवकरच याबाबत घोषणा होणार आहे.

पाण्यासाठी मनमाड बंद

$
0
0
शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, यासाठी मनमाड शहर पत्रकार संघाच्या नेतृत्त्वाखाली पुकारलेल्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनाला राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी संघ यांनी पाठिंबा दिला होता.

कारमधील पैशांवर डल्ला

$
0
0
कारमध्ये ठेवलेले सामान तसेच तीन कारटेप चोरट्यांनी हातोहात लांबल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात चोरट्यांनी २३ आणि ७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. काही दिवसांपासून असे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांनी डोके वर काढले असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सहकार कायद्यामुळे संभ्रमाचे वातावरण

$
0
0
केंद्रीय सहकार कायदा लागू केल्यानंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाची संख्या २९ वरून २१ इतकी मर्यादित होणार आहे. पण, या २१ संचालकांबाबत सरकारकडून सुस्पष्ट मार्गदर्शन नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रवेश नियंत्रण समितीच्या घोडदौडीला लगाम

$
0
0
गुणवत्ता आणि प्रवेशाचे निकष डावलून मनमानी पद्धतीने झालेल्या वैद्यकीय प्रवेशांना रोखण्याचा प्रयत्न करत प्रवेश नियंत्रण समितीने खासगी कॉलेजविरोधात रणशिंग फुंकले. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार स्थापन झालेल्या या समितीच्या घोडदौडीला लगाम घालण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.

'व्हॅलेंटाइन डे'चे जल्लोषात सेलिब्रेशन

$
0
0
मंगळवार असूनही रविवारप्रमाणे सुना सुना झालेला कॉलेज कॅम्पस आणि बहरलेले रस्ते, शॉपिंग मॉल, हॉटेल, गार्डन असा नजारा शहरात होता. 'व्हॅलेंटाइन डे'च्या सेलिब्रेशनसाठी यंदाही जय्यत तयारी केलेल्या यंगस्टर्सनी हा लव्हर्स स्पेशल दिवस दरवर्षीप्रमाणे जल्लोषात साजरा केला.

एमआयडीसीवर टीकेची झोड

$
0
0
उद्योग भवनाच्या फायर एनओसी आणि बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसल्याची बाब 'मटा'ने उघडकीस आणल्यानंतर उद्योग जगतातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. उद्योजकांकडून कोट्यवधी रुपये फायर प्रोटेक्शन फंड घेण्याचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) नैतिक अधिकार आहे का, असा सवालच उद्योजकांकडून यानिमित्त विचारला जात आहे.

वाळूच्या ३५ ट्रकवर कारवाई

$
0
0
धुळे, नंदुरबार या भागातून नाशकात येणाऱ्या आणि परवान्यापेक्षा अधिक वाळू वाहतूक करणाऱ्या ३५ ट्रकवर गुरुवारी नाशिक तहसीलदारांनी कारवाई केली. या ट्रकचालक आणि मालकांकडून सुमारे साडेसहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नागरी कामाची तक्रार करा ऑनलाइन

$
0
0
नागरी तक्रारींची जलद आणि कार्यक्षमतेने नोंद घेण्यासाठी ऑनलाइन तक्रार निवारण कार्यप्रणालीची गुरुवारी घोषणा महापौर अॅड. यतीन वाघ यांनी केली. त्यात महापालिकेच्या वेबसाइटवर नागरिकांना तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीच्या मागणीसाठी आज छात्रभारतीचा मोर्चा

$
0
0
एकीकडे विद्यार्थ्यांची रोखली जाणारी शिष्यवृत्ती तर दुसरीकडे बेकायदा कॉलेजकडून वसूल करण्यात येणारी फी या स्थितीत विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी आज छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेतर्फे हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

MPSC परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवेतील विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेच्या अर्जाची मुदत २१ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे एप्रिलमध्ये होणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना उसंत मिळाली आहे.

रंगला दोन पिढ्यांचा आनंद सोहळा!

$
0
0
गुरुवारी जगभर व्हेलेंटाइन डे साजरा होत असताना जळगाव शहरात मात्र दोन पिढ्यांचा आनंद सोहळा रंगला होता. निमित्त होते उज्ज्वल इंग्लिश स्कूलतर्फे साजरा केल्या जाणा‍ऱ्या 'आजी-आजोबा दिना'चे. तब्बल दीडशे नातवंडांनी आपल्या आजी-आजोबांसोबत हा दिवस साजरा केला आणि जन्मभर त्यांचा सांभाळ करण्याची शपथही घेतली.

कंटेनरची अॅपेला धडक बसून चार ठारम टा

$
0
0
कंटेनर आणि अॅपे रिक्षा यांच्यात भीषण अपघात होऊन चार प्रवासी जागीच ठार झाले, तर आठ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात देवळा-चांदवड रस्त्यावर भाबडबारी घाटात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. कंटेनर चालकास अटक करण्यात आली आहे.

डंपरला धडकून तरुणी ठार

$
0
0
डंपरला स्कूटर धडकून झालेल्या अपघात तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास चोपडा लॉन्स येथे घडली. याबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ जुलैपासून

$
0
0
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ जुलैपासून घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे स्पष्ट केले. नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या उद‍्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ३१ जुलैपासून सहा महिन्यांच्या आत सहकारी संस्थांना निवडणुका घेणे बंधनकारक असणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

'ड्रॉ'ने उजळले घरकुलांचे लक

$
0
0
अनेक वर्षांपासून गाजत असलेल्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना सदनिका देण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून पंचवटीतील निलगिरी बाग परिसरातील ८० लाभार्थ्यांच्या सदनिका 'लकी ड्रॉ' पध्दतीने गुरुवारी निश्चित करण्यात आल्यात. या 'ड्रॉ'ने घरकुलांचेच 'लक' उजळल्याचे बोलले जात आहे.

पाणी सोडले; पण वाया जाण्यासाठी

$
0
0
चणकापूर उजव्या कालव्यातून भऊर फाट्याजवळ जाणाऱ्या पोटचारीस पाटबंधारे खात्याकडून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र या पोटचारीचे काम असुरू असल्याने हे पाणी रस्त्यावर येऊन शेकडो क्युसेस पाणी वाया जात आहे. दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या नागरिकांनी वाहून जाणारे पाणी पाहून संताप व्यक्त केला आहे.

पवारांचा वार, भुजबळही गार

$
0
0
दुष्काळ असताना खोट्या प्रसिद्धीकरता प्रचंड उधळपट्टी करणा-यांना पक्षातच नव्हे, तर सार्वजनिक जीवनातही स्थान नाही,' अशा शब्दांत आपल्याच पक्षाचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांचे कान शरद पवारांनी पिळल्यामुळे त्यांची नाराजी ओढावून घेण्यापेक्षा यंदा 'नाशिक फेस्टिवल' रद्द करण्याची भूमिका छगन भुजबळ घेतील, असे दिसते आहे.

अवकाळी पाऊस, ७५ कोटींचे नुकसान

$
0
0
जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या बेमोसमी वादळी वारा व गारपिटीच्या पावसामुळे सुमारे ७५ कोटी रुपयांची वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त भागांचे अजूनही पंचनामे सुरूच असल्याने ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

स्वाइन फ्लूने पुन्हा वर काढले डोके

$
0
0
स्वाइन फ्लूचा आलेख खाली-वर होत असून गेल्या आठवड्यात एक पेशंट पॉझिटिव्ह आढळून आला. अशा प्रकारे दोन महिन्यांत तीन पेशंट पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, स्वाइन फ्लू सदृश लक्षणे असलेल्या एका पेशंटचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images