Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

३ -या दिवशीही महावितरणची बोंब

$
0
0
गणेशोत्सवात गेल्या दोन दिवसापासून सतत वीज जात असून, बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही हा लपंडाव सुरूच होता. शहराच्या गडकरी चौक, शिंगाडा तलाव, प्लास्टिक हाऊस, मुंबई नाका परिसरात रात्री १० वाजता गेलेली वीज दुसऱ्या दिवशी सकाळी आली.

कारवाई करणार होतो पण...

$
0
0
जिल्हा कृषी विभागाकडून मोठ्या गाजावाजात सुरु करण्यात आलेल्या थेट भाजीपाला विक्री केंद्रांना सहा महिन्यात अवकळा आल्याने कृषी विभागाचं हसू झालं.

वाढले शहरातील औद्योगिक क्षेत्र

$
0
0
शहराचा नवा विकास आराखडा महापालिकेला सादर झाल्यानंतर त्यातील अनेक बाबी समोर येत आहेत. त्यानुसार शहरातील औद्योगिक क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट होत असून, यामुळे शहरांतर्गत उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे.

पीजी कोर्सला परवानगी देणार

$
0
0
कृषी शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेऊन आगामी शैक्षणिक वर्षापासून कृषी अभ्यासक्रमांच्या पीजी कोर्सला परवानगी देणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

महिला पोलिसाचा विनयभंग

$
0
0
लग्नास नकार देणा-या महिला पोलिसाचा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या शिपायाने जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘पुरवठ्या’ची गोदामे बेकायदा!

$
0
0
अन्न सुरक्षा कायदा लागू करण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने जोरदार हालचाली सुरू असताना पुरवठा विभागाची राज्यातील एक हजारांहून अधिक गोदामे बेकायदा असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

धान्य साठवणुकीचा परवानाच नाही

$
0
0
केंद्र सरकारने अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ लागू केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सुरू आहे.

डॉक्टरांनो ऑनररी व्हा!

$
0
0
सुपर स्पेशालिटी हॉस्प‌िटलमध्ये संपावर गेलेल्या डॉक्टरांच्या डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसच्या डायरेक्टर अर्चना पाटील यांच्याशी मंगळवारी झालेल्या झालेल्या बैठकीत ‘सुपर’च्या डॉक्टरांसाठी पगारावर काम करायचे नसेल, तर ऑनररी म्हणजे पेशंटनुसार मानधनावर काम करण्याचा प्रस्ताव डॉक्टरांसमोर ठेवला गेला.

...तर कांदा दक्षिणेतून

$
0
0
कांद्याने किलोमागील दरात अर्धशतक पार केल्याने सर्वसामान्यांचा रोष वाढतो आहे. ते पाहता राज्य सरकारकडून ही दरवाढ कमी करण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी यंदा अधिक उत्पन्न झालेल्या दक्षिण भारतातील राज्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक भेट देणार आहे.

फ्लॅश...

$
0
0
एखाद्या रंगात आलेल्या कार्यक्रमात एखादी वयस्क व्यक्ती असा एखादा शब्द उच्चारते की हास्यकल्लोळ सुरू होतो. परवा असाच एक किस्सा घडला.

नेतृत्त्वात मुली चमकणार कधी?

$
0
0
परीक्षांमध्ये अव्वल स्थान पटकावत विविध क्षेत्रांमध्ये पाय रोवणाऱ्या मुली नेतृत्त्वामध्ये मात्र आजही शेवटच्या नंबरावरच आहेत. नुकत्याच झालेल्या कॉलेजेसमधील विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडीमधून ही बाब अधोरेखित झाली.

लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदी नानासाहेब पाटील

$
0
0
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नानासाहेब पाटील तर उपसभापतीपदी इंदुबाई तासकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

‘हत्ती’च्या पाण्यासाठी गावागावांत संघर्ष

$
0
0
बागलाण तालुक्यातील वनोली, डोंगरेज, विरगावच्या ग्रामस्थांनी हत्ती नदीवर अनाधिकृत वाळूचे बांध घालून पाणी पळविल्याने खळबळ उडाली आहे. शेवटच्या टोकाला असणाऱ्या गावांना पाणी मिळावे, म्हणून तहसीलदारांनी हे बांध फोडण्याचे आदेश देऊनही जलसंपदा विभागाने त्याकडे कानाडोळा केला आहे.

गुलाल न उधळता मिरवणूक

$
0
0
कळवण शहर व तालुक्यात गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी वाजतगाजत ढोलताशांच्या गजरात पण भावपूर्ण वातावरणात श्रीगणेशाचे विसर्जन करण्यात आले. मात्र ही विसर्जनाची ही मिरवणूक सर्वार्थाने वेगळी ठरली.

येवलेकरांचा गणरायाला भावपूर्ण निरोप

$
0
0
संस्कृतीप्रिय येवलेकरांनी गणरायाला बुधवारी भावपूर्ण निरोप दिला. यंदाच्या गणेशोत्सवात सुमारे सव्वाशे गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. मात्र, अनंत चर्तुदशीच्या अगोदरच बहुतांश मंडळांनी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केल्याने बुधवारच्या विसर्जन मिरवणुकीत सुमारे २३ मंडळे सहभागी झाली होती.

चुकांमधूनच मिळतो यशाचा मार्ग

$
0
0
‘पहिल्या प्रयत्नामध्ये प्रत्येकालाच यश मिळते असे नाही. अनेकजण यश मिळविताना होणाऱ्या चुकांमुळे घाबरून जातात. परंतु या चुकांमधूनच यशाचा मार्ग मिळतो’, असे मत बॉश कंपनीच्या टेक्निकल विभागाचे प्रमुख डॉ. थॉमस मारबेक्स यांनी व्यक्त केले. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स संस्थेच्या नाशिक शाखेमार्फत आयोजित विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते.

बोर्डाची परीक्षा पाच दिवसांवर

$
0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी तसेच बारावीच्या सप्टेंबर/ऑक्टोबरच्या परीक्षांना २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. नाशिक विभागातील जवळपास ३८ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

कॉलेजेसमध्ये अहिंसा दिन

$
0
0
महात्मा गांधी जयंती‌निमित्त पुणे विद्यापीठांतर्गत सर्व कॉलेजेसमध्ये २ ऑक्टोबरला (बुधवारी) अहिंसा दिन साजरा केला जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार कॉलेजच्या एनएसएस विभागामार्फत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

रुपयाला साथ भारतीय वाइनची

$
0
0
परकीय चलनांच्या तुलनेत रुपयाची होणारी पडझड रोखण्यासाठी भारतीय वाइन महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. तामिळनाडू सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे भारतात आयात होणाऱ्या वाइनला लगाम बसतानाच भारतीय वाइनच्या विक्रीत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

हृदयदिनानिमित्त सायकल रॅली

$
0
0
श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर तसेच नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदयदिनानिमित्त २९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता ‘आरोग्यम् धनसंपदा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images