Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एमआयडीसीतील पाणी पेटले

$
0
0
महावितरण कंपनीने काही दिवसांपूर्वीच वीज बीलाचे दर वाढवून शॉक दिल्यानंतर आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पाण्याचे दर वाढवून उद्योजकांना एक प्रकारे चटकाच दिला आहे.

आयुक्त गप्प का?

$
0
0
महापालिकेत कर्मचाऱ्यांचा वानवा आहे. महिन्यागणीक कर्मचारी निवृत्त होत आहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा ताण सर्वच पातळ्यांवर जाणवत असून त्यामुळे शहरातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठेकेदारावर ‘होऊ द्या खर्च’

$
0
0
नाशिककरांच्या हिताला बगल देणाऱ्या महापालिकेतील मुखंडांनी आता ठेकेदारावर ‘होऊ द्या खर्च’ असे धोरण स्विकारले आहे. त्यामुळेच शहरात एलईडी बसविण्याची ८० कोटींची योजना तब्बल २०२ कोटींना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पेन्शन आमच्या हक्काची...

$
0
0
ज्येष्ठ नागरिकांच्या वयाबाबत राज्य सरकारची अट रद्द करण्यासह वाढत्या महागाईच्या तुलनेत तुटपुंजी पेन्शन वाढविण्याच्या मागणीसाठी बुधवारी सीबीएस परिसर दणाणला.

घर घालू धंदा

$
0
0
दिल्ली येथे निर्भया रेप प्रकरणसमोर आल्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठ्या शहरात किमान स्ट्रीट लाईटची संख्या वाढवण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत प्रकर्षाने पुढे आले.

शिवपदस्पर्श दिनासाठी विश्रामगड सज्ज!

$
0
0
सिन्नर तालुक्यातील पट्टागड परिसरात असलेल्या विश्रामगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाऊल ठेवल्याच्या घटनेला आज, २२ नोव्हेंबर रोजी ३३४ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने शिवपदस्पर्शदिनाच्या पार्श्वभूमीवर विश्रामगड विकास मंडळासह शिवप्रेमींकडून सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे.

निवाणेत बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ

$
0
0
निवाणे परिसरातील खालच्या दरी भागात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालत पाच शेळ्या व एक बोकड फस्त केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शिष्यवृत्तीसाठी सकारात्मक पाऊल

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात श‌िक्षण घेणाऱ्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर श‌िष्यवृत्ती देण्यात यावी, या प्रस्तावाच्या दृष्टीने प्राथम‌िक टप्प्यात सकारात्मक चर्चा झाली.

डेंग्यू प्रकरणामुळे शिवसेनेचे आंदोलन

$
0
0
पंचवटीतील तरूणाचा डेंग्यूसदृश आजाराने निधन झाल्याच्या चर्चेने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच राजकीय पक्षांकडून महापालिका सत्ताधाऱ्यांसह प्रशासनावर ताशेरे ओढण्यात येत आहेत.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले...

$
0
0
गोदामाईच्या काठावरची काझी गढी. हातावर पोट भरणारी येथील माणसे. ४० ते ५० वर्ष त्यांनी जेथे संसार केला त्या घरांची डोळ्यादेखत माती झाली. निवारा गेल्याने अश्रूंचा बांधही फुटला. ज्यांचा संसार मोडून पडला त्यांना मदतीचा हात देत रहिवाशी रात्रभर शेजारधर्म जागवित राहीले.

मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार जाहीर

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा साहित्यक्षेत्रात मानाचा समजला जाणारा यंदाचा ‘विशाखा पुरस्कार २०१३’ गुरूवारी जाहीर करण्यात आला.

‘कट प्रॅ‌क्टिस’ पडणार महागात

$
0
0
शहरात डेंग्यूचे अस्तित्व असले तरी, या आजाराचा जास्तीत जास्त धाक दाखवून पेशंटची लुबाडणूक केली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. ओळखीच्या लॅबमधून हवे ते रिपोर्ट तयार केले जात असून अशी कट प्रॅक्टिस करणाऱ्या हॉस्पिटल तसेच पॅथॉलॉजिस्टविरोधात कडक कारवाई करण्याची योजना महापालिकेने आखली आहे.

कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगीत

$
0
0
दशकभरापासूनच्या प्रलंब‌ित मागण्यांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पेटलेले आंदोलन स्थग‌ित करण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अज‌ित पवारांनी या प्रश्नी सकारात्मक भूमिका घेतल्यानंतरही विद्यापीठ स्तरावरील मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची भूमिका संद‌िग्ध होती.

केंद्र सरकारचा आदेश

$
0
0
शहरातील स्ट्रीट लाइट बदलून त्याऐवजी एलईडी फिटिंग्ज करण्यावरून गदारोळ सुरू असताना आता केंद्र सरकारनेदेखील एलईडी ‘मस्ट’ असल्याचा जीआर पाठविला आहे.

‘आर्ट फिनि‌क्स फेस्टिव्हल’मध्ये नाशिककरांचा ठसा

$
0
0
मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये आयोज‌ित करण्यात आलेल्या ‘आर्ट फ‌िन‌िक्स फेस्टिव्हल’मध्ये नाश‌िककर गुरुश‌िष्यांचा ठसा उमटला आहे. च‌ित्रकार प्रा. संजय साबळे आण‌ि विद्यार्थ्यांच्या च‌ित्रांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला होता.

राज्यातील बालगृहे संकटात

$
0
0
राज्यातील एक हजार बालगृहातील ८० हजार निराधार बालकांना सांभाळणाऱ्या दहा हजार सेवकांवर सरकारच्या दुर्लक्षामुळे वेठबिगारी करण्याची वेळ आली आहे. तर बालगृहातील एका बालकाला फक्त २१ रुपये अनुदानावर दिवस काढावा लागत आहे.

दोन वर्षांत वाढले डेंग्यूचे पेशंट

$
0
0
मागील दोन वर्षांत डेंग्यू आजाराच्या संशयित आणि डेंग्यूची लागण झालेल्या पेशंटच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. २०११-१२ या कालावधीत शहरात अवघे १२ पेशंट आढळून आले होते. मागील वर्षी हाच आकडा १३१ पर्यंत पोहोचला तर या वर्षी आतापर्यंत २१२ पेशंट आढळून आले आहेत.

पोट धरून हसवणारे ‘मन वढाय वढाय’

$
0
0
विनोदी अंकाचा बाज जपत ओझरच्या एचएईडब्लूआरसी रंगशाखेने सादर केलेल्या ‘मन वढाय वढाय’ या नाटकाने प्रेक्षकांना पोट धरून हसवले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या ५३व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सुनील जाधव लिखित हे नाटक सादर झाले.

मोकळ्या प्लॉटधारकांनी स्वच्छता करावी

$
0
0
मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ज्यांचे प्लॉट मोकळे पडले आहेत, अशांनी प्लॉटमधील गवत, झाडे, झुडपे काढून साफसफाई करून वॉल कंपाऊंड करावे, असे आवाहन मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त अजित जाधव यांनी केले आहे.

‘वसाका’ला घरघर; ऊस उत्पादकांत चिंता

$
0
0
देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऊस क्रशिंग होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ‘कसमादे’मधील ऊस उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images