Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राष्ट्रवादीचा मेळावा स्थगित

0
0
केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवार, २४ नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये होणारा उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळावा स्थगित करण्यात आला आहे.

निकालास खंडपीठाची स्थगिती

0
0
पोळ कांदा पिकाच्या उत्पादनासाठी पाण्याची नितांत गरज असल्यामुळे पाटबंधारे विभागाने ओझरखेडमधून त्वरित आवर्तन सोडावे, या मागणीसाठी त्र्यंबक रस्त्यावरील वेद मंदिराजवळ एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर यांच्या कार्यालयाबाहेर गुरुवारी शेतकऱ्यांनी सुरू केलेले उपोषण आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

वाडकर फसवणूक; ९ जणांवर गुन्हा

0
0
गायक सुरेश वाडकर यांची जमीन व्यवहारात खोट्या दस्तऐवजाद्वारे फसवणूक केल्याच्या आरोपावरून उपनगर पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुधारित आराखडा मारक!

0
0
श‌िक्षण विभागाने ऑक्टोबर मह‌िन्यात मंजूर केलेल्या पदांबाबतच्या सुधारित आराखड्यामुळे राज्यातील प्रामुख्याने श‌िपाई, ग्रंथपाल आण‌ि प्रयोगशाळा सहाय्यक या श‌िक्षकेतर पदांवर टांगती तलवार आली आहे.

सिंगापूरकरांना भुरळ 'नाशिकची'

0
0
नाशिकहून हजारो किलोमीटरवर असलेल्या सिंगापूरकरांना सध्या नाशिक स्टाइलने बनवलेल्या कबाबसह खाकरा व तंदुरमधील विविध डिशेसनी भुरळ घातली आहे. ही अनोखी किमया आहे नाशिकचे हॉटेल व्यावसायिक विक्रम उगले यांची.

काझी गढी कोसळली

0
0
जुन्या ना‌शकातल्या काझी गढीतील ३० घरे बुधवारी मध्यरात्री खचली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरे भुईसपाट झाल्याने रहिवाशांचे संसार उघड्यावर आले असून मोठे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्हा प्रशासनाची वाटचाल ई गव्हर्नन्सकडे

0
0
कासवगतीने काम करणा-या जिल्हा प्रशासनाने आता ई- गव्हर्नन्सच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

आमच्यावर अन्याय करु नका

0
0
'तलाठी भरतीत कामकाज करणा-या महसूल विभागातील दोन लिपिकांच्या आप्तेष्टांना सर्वाधिक गुण मिळाल्याचे उजेडात आले तरी आमच्या सारख्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय करु नका', अशी मागणी या भरतीतील काही परीक्षार्थींनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

'एमबीए'च्या विद्यार्थ्यांची सत्वपरीक्षा

0
0
मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमांचा दर्जा अन् रोडावणारी विद्यार्थीसंख्या या समस्येचा सामना करणाऱ्या पुणे विद्यापीठाने एमबीएच्या विद्यार्थ्यांच्या माथी शुक्रवारी 'सत्वपरीक्षा' लादली.

महापालिकेचे नोटीस सत्र सुरूच!

0
0
खचलेल्या काझी गढीवरील धोकादायक घरांना महापालिकेकडून नोटीस बजावण्याचे काम शुक्रवारीही सुरूच होते. गुरुवारपासून सुरू झालेल्या या नोटीससत्रातून ६३ घरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

आपद्‍ग्रस्तांना २० हजारांची मदत

0
0
नैसर्गिक कारणांमुळे काझीच्या गढीचा काही भाग कोसळल्यामुळे ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्या आपद्ग्रस्तांना येत्या बुधवारी तहसीलदारांकडून २० हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

0
0
सेंट फ्रान्सिस्को येथील कंपनीत मोठ्या हुद्द्याची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणीची सुमारे २३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार देवळाली कॅम्प येथे उघडकीस आला आहे.

वाळू लिलाव १९ डिसेंबरला

0
0
जिल्ह्यातील वाळू उपशाचा ठेका देण्यासंदर्भात असलेली संभ्रमावसथा दूर झाली असून एकूण २३ ठिय्यांसाठी येत्या १९ डिसेंबरला लिलाव होणार आहेत.

३५५ मेडिकल्सवर बंदची कु-हाड

0
0
फार्मसिस्ट नसतानाही औषधांची खरेदी-विक्री केली जात असल्याप्रकरणी नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या सात महिन्यांत तब्बल ३५५ मेडिल्सचे परवाने कायमचे निलंबित केले आहेत.

बहि:स्थांच्या परीक्षा पुढे ढकला

0
0
यंदाच्या शैक्षणिक वर्षात बहुचर्चित ठरलेली पुणे विद्यापीठाची बहि:स्थ प्रक्रिया अद्यापही वादात आहे.

अंडी झाली महाग!

0
0
'डोल्ले-शोल्ले' बनवण्यासह तब्येतीसाठी खास मानल्या जाणाऱ्या हिवाळ्यातील महत्त्वाचा खुराक म्हणजे अंडी. शरीरातील प्रोटिन्स वाढविण्याचे महत्त्वाचे काम होत असल्याने हिवाळ्यात अंड्यांना मागणी वाढते.

अॅट्रॉसिटीचे वाढते गुन्हे चिंताजनक

0
0
राज्यात अॅट्रॉसिटीचे गुन्ह्यांचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब असल्याची खंत नागरी हक्क संरक्षण विभागाचे अपर पोलिस महासंचालक व्ही. डी. मिश्रा यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

CA परीक्षेत अद्याप जुनाच कंपनी अॅक्ट

0
0
सीए परीक्षेमध्ये ‘कंपनीज अॅक्ट २०१३’ च्या समावेशाबाबत अद्याप अध‌िकृत सूचना नसल्याने सद्यस्थितीत ‘कंपनीज अॅक्ट १९५६’ हा अभ्यासक्रमातील घटकच समाविष्ट राहणार आहे.

बाजार समित्यांचाही विकास आराखडा

0
0
कृषी मालाची खरेदी-विक्री होणाऱ्या बाजार समित्यांनीही बदलांचा वेध घेत त्यांचा व्यवसाय विकास आराखडा तयार केला आहे.

आरोग्यच्या परीक्षा १७ डिसेंबरपासून

0
0
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या च‌िघळलेल्या आंदोलनामुळे लांबलेल्या वैद्यकीय शाखांच्या परीक्षांची तारीख आता न‌िश्च‌ित करण्यात आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images