Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आमदार भोसलेंच्या पॅनलचा धुव्वा

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील व्हीआयपी एम्प्लॉईज युनियनच्या त्रैवार्षिक निवडणुकीत आमदार नितीन भोसले प्रणीत समर्थ पॅनलचा धुव्वा उडाला आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या एकता पॅनलने सातही जागा राखून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करतानाच आमदार भोसले यांना चपराकच दिली आहे.

अखेर बिझनेस कंबाईन सुरू

$
0
0
कामगार आयुक्तांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली सातपूर एमआयडीसीतील बिझनेस कंबाईन कंपनी पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

वर्षा पाटील यांचा शोधनिबंध देशात प्रथम

$
0
0
स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसुतीशास्त्रज्ञ डॉ.वर्षा नरेंद्र पाटील (सावंत) यांनी मुंबईत आयोजित राष्ट्रीय संशोधन सत्रात सादर केलेल्या शोधनिबंधाला देशस्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या परिषदेत देशातील सुमारे १२ हजार स्त्रीरोग तज्ज्ञांनी सहभाग घेतला.

चित्रपटगृहे आजही रिकामीच

$
0
0
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय, दादासाहेब चित्रनगरी व जिल्हा प्रशासनाच्यावतीने चित्रपटाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष समारंभाचे आयोजन केले आहे. परंतु या समारंभात सादर केल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी नाशिककरांनी पाठ फिरवली असून अवघ्या पाच प्रेक्षकांच्या उपस्थितीत चित्रपट प्रदर्शित करावा लागत आहे.

वृक्ष प्राधिकरण बेकायदेशीर

$
0
0
कॉँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी वृक्ष प्राधिकरण समितीचा एका दिवसातच राजीनामा दिल्यानंतर आता समितीचे सदस्य संजय चव्हाण यांनीही ही समिती बेकायदेशीररित्या गठीत करण्यात आल्याचे सांगितले. प्रत्येक समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असतो आणि २८ फेब्रुवारी रोजी समितीचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने ती बेकायदेशीर असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

युजीसीची आज सेट परीक्षा

$
0
0
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षेचे (सेट) आयोजन रविवारी शहरातील विविध केंद्रांवर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी उत्तर महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

अवैध वाळू वाहतूक रोखणारच!

$
0
0
जिल्ह्यातून होणारा अवैध वाळू उपसा, क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक, बेकायदेशीर साठा व विक्री करणा-यांविरुद्ध हाती घेतलेली कारवाई सुरूच राहील, असे अप्पर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी शनिवारी स्पष्ट केले.

बोचऱ्या थंडीचा काटा फुलला

$
0
0
नाशिककर सध्या माघाच्या थंडीचा सुखद अनुभव घेतायत. शनिवारी मात्र वातावरणातील बदलांमुळे दिवसभर वाऱ्याचा वेग वाढला आणि बोचऱ्या थंडीने नाशिककरांच्या अंगावर काटा फुलला.

जकातीमुळे ३०० कोटी बजेटवाढ

$
0
0
महापालिकेने यंदा विक्रमी जकात वसूल केल्याने आयुक्तांच्या बजेटमध्ये तब्बल तीनशे कोटींनी वाढ होण्याची शक्यता आहे. जकातीची वसुली लक्षात घेता यंदाचे बजेट १५०० कोटींपेक्षा अधिक असू शकते.

'कपालेश्वरा'च्या नावे जमीन घोटाळा

$
0
0
देवस्थानांच्या धार्मिक कार्याचा खर्च भागावा म्हणून त्यांना कैक वर्षांपूर्वी दानशूरांनी दिलेल्या जमिनींची भूमाफियांनी नाशिकमध्ये अक्षरशः लूट चालवली असल्याचा नवा प्रकार समोर आला आहे.

देवस्थान जमिनींवर भूमाफिया?

$
0
0
येथील बहुतांश देवस्थानांचे ट्रस्टमध्ये रुपांतर झाल्याने देवस्थानांना दान केलेल्या जमिनींची मालकी ट्रस्टकडे आली. तसेच नाशिकचा विस्तार होत गेल्याने अनेक जमिनी शहराच्या मोक्याच्या ठिकाणी आल्या. त्यामुळे या जमिनींचे मूल्य प्रचंड वाढत गेल्याने भूमाफियांनी काही ट्रस्टवरील ट्रस्टींना हाताशी धरून या जमिनींचे व्यवहार घडवून आणले.

आठ दिवसांत निवाराशेड जमीनदोस्त

$
0
0
त्रिमुर्ती चौकासह डीजीपीनगर परिसरात नुकत्याच नऊ ठिकाणच्या बसथांब्यांवर निवारा शेडचे लोकार्पण करण्यात आले असून या थांब्यांपैकी कामटवाडा येथील शेड आठच दिवसात जमीनदोस्त झाला आहे. सुदैवाने यावेळी कुणीही प्रवासी शेडमध्ये नसल्याने जीवितहानी टळली. तकलादू स्वरूपाचे हे शेड सिमेंटातून उखडले असून दोन दिवसांपासून पडलेल्या अवस्थेतच आहे.

मोडक्या उद्यानात खेळणार कोण?

$
0
0
मोडलेल्या घसरगुंड्या... व्यायामाच्या बारवर वाळत घातलेले कपडे अन् मुलांच्या खेळण्याच्या ‌ठिकाणी साचलेला कचरा... या विळख्यात अडकलेल्या दिंडोरीनाका परिसरातील उद्यानाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

बजेट वाढले; दायित्व घटले

$
0
0
जकातीतील वाढीसह बंधनात्मक दायित्वात (स्पिल ओव्हर) २३० कोटींनी कमी करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले असल्याचे निदर्शनास येते. सोमवारी सादर होणाऱ्या बजेटमध्ये तब्बल ४८६.९३ कोटींचा स्पिल ओव्हर दर्शविण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. दरम्यान, आयुक्तांनी सन २०१३-१४ वर्षासाठी तयार केलेले बजेट सोमवारी स्थायी समितीच्या सभेत सादर करण्यात येणार आहे.

हरिश्चंद्र जातात मराठीच्या गावा

$
0
0
'राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंद्राची फॅक्टरी' या सर्वांगसुंदर व महत्त्वाच्या परिसंवादाची वाट लागताना पाहून रसिकांना काहीकाळ भोवळ आल्यासारखेच झाले. चित्रपट महोत्सवाच्या सकाळी झालेल्या शानदार उद्घाटनाचा प्रभाव परिसंवादातील वक्त्यांवर होता. त्यामुळे काहीही अभ्यास नसताना बोलणाऱ्या वक्त्यांचे ज्ञान वेळेवर चांगलेच उघडे पडले.

शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

$
0
0
बागलाण तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले असून ऐन दुष्काळात तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बागलाणचे आमदार उमाजी बोरसे यांनी मुख्यमंत्री तसेच कृषीमंत्री, पुर्नवसनमंत्री व पालकमंत्र्याकडे केली आहे.

वास्तूंवरील रोपट्यांना जीवदान

$
0
0
जुन्या इमारती व मंदिरांवर उगवणाऱ्या दीर्घायू रोपट्यांच्या पुनर्रोपणासाठी पुढाकार घेतलेल्या स्वराज्य प्रतिष्ठानने आजवर शंभरावर रोपट्यांना जीवदान दिले आहे. जुन्या वास्तूंच्या संवर्धनासोबतच वड-पिंपळासारख्या झाडांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरतो आहे.

संस्कृती जपायला शिका!: सिंधुताई

$
0
0
संवेदना जागृत करते ते शिक्षण. शिक्षणाने माणूस केवळ ज्ञानवान होऊन उपयोग नाही, तर तो संवेदनशील व्हायला हवा. शिक्षण हे माणसाला संस्कृतीच्या जवळ नेते, तर अज्ञान संस्कृतीपासून दूर नेते. खरे माणूसपण हे संस्कृतीत दडले आहे, हे लक्षात घेऊन संस्कृती जपायला शिका, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी केले.

शहराला एकवेळच पाणी द्या!

$
0
0
आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद केल्यास त्याचा काही भागांतील रहिवाशांना त्रास होईल, तसेच यापूर्वी हा प्रयोग अयशस्वी ठरला असल्याने दररोज एकवेळ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी महापौरांकडे केली आहे.

नाट्य परिषदेच्या मतदानात धिंगाणा

$
0
0
अनेक राजकीय वळणे लाभलेल्या तसेच एकमेकांवर कुरघोड्यांच्या राजकारणाने सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी महाकवी कालिदास कलामंदिर येथे रविवारी मतदान झाले. सकाळी शांततेच्या वातावरणात सुरू झालेले मतदान सायंकाळी साडेसातपर्यंत शाब्दिक चकमकी तसेच हमरीतुमरीवर आले होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images