Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महापालिका १२८ कोटींमध्ये ६ हजार घरे बांधणार

$
0
0
घरकुल योजनेतील अकरा हजार २०० घरांपैकी २ हजार ५० घरे जानेवारी २०१४ पर्यंत लाभार्थींना देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. तर आणखी २ हजार ८४८ घरे पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने कोर्टात सादर केले आहे. या ४ हजार ८९८ घरांसाठी आतापर्यंत योजनेतील २४८ कोटींपैकी १३० कोटी रूपये खर्च झाला आहे. तर उरलेल्या ६ हजार २९२ घरे १२८ कोटींमध्ये कशी होणार या कोंडीत महापालिका सापडली असून घरकुलाचे हे ओझे कसे पेलायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘महिंद्रा’त कंत्राटी कामगारांचे ‘कामबंद’

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत कंत्राटी कामगारांनी वेतनवाढ मिळावी या मागणीसाठी सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारले. याप्रकरणी कामगार अधिकाऱ्यांबरोबर सोमवारी झालेली बैठक यशस्वी होऊनही कामगारांनी पुन्हा आंदोलन पुकारले आहे.

‘एलबीटी’ही भरता येणार ऑनलाइन !

$
0
0
घरपट्टी आणि पाणीपट्टी ब‌िले भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर महापालिकेने आता लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी)चा भरणा देखील ऑनलाइन करता यावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठीचे सॉफ्टवेअर विकस‌ित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील पाच ते सहा दिवसात ही सुविधा कार्यन्वित होईल अशी अपेक्षा संबंधीत अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कोर्टात जाणाऱ्यांची केबल बंद

$
0
0
सरकारी निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात जाणाऱ्या आणि जिल्हा प्रशासनाकडे कर भरण्याऐवजी कोर्टात कर भरणाऱ्या ३० लोकल केबल ऑपरेटरला चांगलेच महागात पडणार आहे. जिल्हा प्रशासनाला संयुक्त प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे या ३० केबलचालकांचे प्रक्षेपण थांबविण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी काढले आहेत.

नाशिकमधील घुसखोरीवर करडी नजर

$
0
0
शहरवासियांच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर घेणारे पोलिस स्वत:च्या आणि आपल्या आस्थापनांच्या सुरक्षेसाठी पूर्वीपेक्षा अधिक सतर्क झाले आहेत. पोलिस आयुक्तालयात येणाऱ्या प्रत्येकाची कटाक्षाने नोंद घेतली जात असून काहीवेळा दिवसभरात १ हजारांपर्यंत लोक येथे व्हिजिट करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

स्टेशनवर हवे बहुमजली पार्किंग

$
0
0
रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या प्रवाशांना वाहने लावण्यास जागा नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. सध्या देवी चौकातील पार्किंग अपुरे पडत असल्याने प्रवासी आपली वाहने रस्त्यावर उभी करीत आहेत. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीचा त्रास वाढला आहे. रेल्वे प्रशासनाने वाहनांच्या पार्किंगसाठी बहुमजली पार्कींगची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

शिवसेनेतर्फे नाशिक आयडॉल

$
0
0
एरवी 'आवाज कुणाचा' म्हणत दे दणादण आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने तरूणाईच्या आवाजाला न्याय देण्यासाठी 'नाशिक आयडॉल' गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या आवाजाद्वारे संगीत क्षेत्रात पाय रोवण्यासाठी धडपडणारे अनेक जण टॅलेन्ट असूनही संधीअभावी मागे राहतात. त्याची दखल घेत नाशिकमधील इच्छुकांना व्यासपीठ म्हणून शहर शिवसेनेतर्फे ही स्पर्धा आयोजित केली आहे. विशेष बाब म्हणजे स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी इंडियन आयडॉल फेम अभिजीत सावंत उपस्थित राहणार आहे.

नाशिकरोड परिसरात डासांचे सम्राज्य

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोडच्या काही भागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासनाने धूर तसेच औषध फवारणी करून डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरातील दूषित पाण्याची तक्रार थेट मंत्र्यांकडे

$
0
0
नवनिर्माणाचे स्वप्न पाहणारे सत्ताधारी व ढिम्म महापालिका प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही शहरातील दूषित पाणी व अस्वच्छतेचा प्रश्न कायम असल्याची तक्रार शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांच्यासमोर मांडत हे प्रश्न सोडविण्याची मागणी केली. रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या सोपल यांना भेटून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील समस्या मांडल्या.

पाण्याच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू

$
0
0
देवळा तालुक्यातील वाजगांव येथे अडीच वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून अंत झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. वाजगांव येथील शेतकरी हंसराज जगन्नाथ देवरे यांचा अडीच वर्षांचा एकुलता एक मुलगा निरंजन शेतातील फार्म हाऊसजवळ खेळत होता.

‘वसाका’ वाचवण्यासाठी सोमवारी बैठक

$
0
0
कसमादेचे कार्यक्षेत्र असलेला वसाका कारखाना आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे यंदाचा गळीत हंगाम बंद ठेवण्यात आला आहे.

बस उलटून ३४ प्रवासी जखमी

$
0
0
एसटीवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटून ३४ प्रवासी जखमी झाल्याची घटना सटाणा-रावळगाव मार्गावरील दुधमाळजवळ घडली.

नाशिकरोडचा उड्डाणपुल अंधारात

$
0
0
नाशिक-पुणे रोडवर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरील पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून चालकांना वाहन चालवणे मुष्कील झाले आहे. बंद पथदीपांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

सर्वसाधारण सभेवरून सत्ताधा-यांतच मतभेद

$
0
0
बंद दाराआड झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतील कामकाजाबाबत सत्ताधाऱ्यांमधील दुफळी पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रसारमाध्यमांना प्रवेशबंदीच्या नाट्याने रंगलेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब केल्याचा दावा उपाध्यक्ष संपत सकाळे यांनी केला.

सुधाकर भालेकर यांचे निधन

$
0
0
इंडिया सिक्युरिटी व करन्सी नोट प्रेसचे निवृत्त सुरक्षा अधिकारी, गृहरक्षक दलाचे माजी जिल्हा समादेशक व क्रिकेटपटू सुधाकर शंकरराव भालेकर (६२) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

अखेर पूर्णवेळ आरोग्याधिकायाची नियुक्ती

$
0
0
डेंग्यूचा वाढता फैलाव आणि अस्वच्छतेमुळे टीकेचे धनी ठरलेले प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. सचिन हिरे यांच्या जागी डॉ. एस. ए. बुकाणे यांची पूर्ण वेळ आरोग्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अपहरणकर्ता सापडेना

$
0
0
नांदुरनाक्यावरून लहान मुलीचे अपहरण करणारा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या मुलीने धाडसाने सुटका करवून घेतल्यानंतर अपहरणाची घटना उघडकीस आली.

अब्जावधीच्या गुंतवणुकीला अवघे ३० कोटींचे व्याज!

$
0
0
महामंडळांसह बँकांमध्ये करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या सरकारी गुंतवणुकीला तोकड्या व्याजासह गैरव्यवहाराचाच मोबदला लाभत असल्याची बाब पुढे आली आहे.

‘देशदूत’चे सुरेश अवधूत यांचे निधन

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत आपल्या लक्षवेधी पत्रकारितेने स्वतंत्र मुद्रा उमटविणारे सिद्धहस्त पत्रकार सुरेश नारायण अवधूत (७२) यांचे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

वर्षभरात जिल्ह्यातून ७८ जण तडीपार

$
0
0
परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या तब्बल ७८ जणांना वर्षभरात नाशिक जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. प्रांत आणि उपविभागीय पोलिस अधिक्षक यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images