Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘आम आदमी पार्टी’चा मेळावा

0
0
भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांसह राज्यातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणाऱ्या व अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पार्टी’च्या राज्य संयोजक अंजली दमानिया आज, रविवारी नाशिकला येत आहेत.

कॉपीराइट : तिघांना अटक

0
0
ह्युंदाई कंपनीचा बनावट लोगो असलेले सीट कव्हर तसेच स्पेअरपार्ट्स विक्रीसाठी ठेऊन कॉपीराइट अॅक्टचा भंग केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. प्रवीण प्रभाकर शिरापुरे (रा. विनयनगर), रुषिराज लुथरा (रा. आनंदवली) आणि मुकेश चावला (रा. काठेगल्ली) अशी आरोपींची नावे आहेत.

कॉन्स्टेबल मुदस्सर शेख यांना रौप्य

0
0
पुणे गुन्हा अन्वेषण शाखेने आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टेट पोलिस ड्यूटीमेटमध्ये लासलगाव पोलिस कार्यालयाचे पोलिस कॉन्स्टेबल मुदस्सर शेख यांनी व्हिडिओ शुटींग या प्रकारात रौप्य पदकाला गवसणी घातली.

त्याच झाल्या, त्यांचा आधार

0
0
आपल्याला एड्स झाला आहे हे सत्य स्वीकारून मुलाबाळांना वाढविणाऱ्या आणि संसाराचा गाडा हाकणाऱ्या अनेक महिला आहेत. मात्र एखादीला एड्स झाल्याचं कळताच अनेकदा मदतीचे हात आखडते घेतले जातात. पण नाशिकमधील एड्सबाधित काही म‌हिलांनीच एकमेकांना साहाय्य करत आपल्या अडचणींतून मार्ग काढला आहे.

अंजली दमानिया नाशिक दौ-यावर

0
0
भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांसह राज्यातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणाऱ्या व अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पार्टी’च्या राज्य संयोजक अंजली दमानिया आज, रविवारी नाशिकला येत आहेत.

ऑडिटोरियमचा उपयोग सर्वसामान्यांनाही

0
0
विभागीय महसूल आयुक्तालयाच्या आवारात साकारण्यात येणारे ऑडिटोरियम(सभागृह) केवळ सरकारी अधिकाऱ्यांसाठी नसून ते सर्वसामान्य जनतेसाठीदेखील आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

विभाग नियंत्रकांनी मागविला नकाशा

0
0
ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या वाहन पार्किंगसाठी २००२ पासून हक्काची जागा आरक्षित असूनही त्यांची नाहक फरफट केली जात असल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये नकाशासह प्रसिद्ध होताच एसटी महामंडळ खडबडून जागे झाले.

आमची भूमिका कायदेशीरच!

0
0
आम्ही ‘काय द्या’ने नव्हे; तर कायद्याने काम करणारे असून शिवसेना सत्तेत असतानाही जादा विषयांना हरकत घेत पुन्हा महासभा घेण्याचे धाडस आम्ही दाखवले. तसे धाडस मनसे दाखवेल का?, असा प्रश्न करत महापालिका विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी मनसेचा टोला परतावून लावला आहे.

दिंडे यांना बढती की शिक्षा?

0
0
‘ज्या माणसाने आजवर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीवर भर दिला, त्याला जिल्ह्याच्या बाहेर काढणे कितपत योग्य आहे’, असे म्हणत जयंत दिंडे यांना धुळे जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्त केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या दिंडे यांना नुकतेच धुळे जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्त करण्यात आले.

प्रीपेड रिक्षासेवेला महिलांची पसंती

0
0
नाशिकरोड रेल्वेस्टेशनवर ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या प्रीपेड रिक्षासेवेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून प्रवास करणाऱ्या पुरुषांच्या संख्येपेक्षा महिलांची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत ८८१ प्रवाशांनी याचा लाभ घेतला, त्यातील ६३१ महिला प्रवासी आहेत.

'त्या' धमकी पत्राचे धागेदोरे मिळेनात!

0
0
देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी नाशिकरोडच्या करन्सी नोट प्रेसवर हल्ला केला जाईल, असे धमकीवजा पत्र प्रेसच्या महाप्रबंधकांना आले होते. या घटनेला एक आठवडा उलटूनही पत्राबाबत कुठलेही धागेदोरे मिळाले नसल्याचे पोलिसांनी म्हणणे आहे.

त्र्यंबकेश्वर नगरीत कुठे आहे गोदावरी?

0
0
बारा ज्योतिर्लिंगंपैकी एक असलेल्या आणि दक्षिण गंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या उगमापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या त्र्यंबक शहरात गोदावरी नदी कुठे आहे, असाच प्रश्न पडत आहे. नदी लुप्त झाल्याच्या कथा सांगून इथे येणाऱ्या भाविकांची फसवणूक होत आहे.

पांढरे यांचा 'आप'मध्ये प्रवेश

0
0
सिंचन प्रकल्पांतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजीनाम द्यायला भाग पाडणारे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी अखेर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.

शरणपूर येथून बालकाचे अपहरण

0
0
शरणपूर येथील एका घरातून पाच वर्षांच्या बालकाचे अपहरण करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घरात कोणी नसताना हा प्रकार घडला. आश्रबा दगडुबा शिरसाठ (३३, रा. शरणपूर) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कळवण औद्योगिक वसाहतीला उतरती कळा

0
0
सिन्नर औद्योगिक वसाहतीसोबतच स्थापन झालेल्या, कळवणसारख्या आदिवासी तालुक्यात कोल्हापूर फाटा येथे उदयास आलेल्या कळवण औद्योगिक वसाहतीला सध्या उतरती कळा लागली आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे व विविध सुविधांच्या अभावामुळे येथे सुरू झालेले बरेचसे उद्योग बंद पडले असून नवीन उद्योग फिरकण्यास तयार नसल्यामुळे औद्योगिक वसाहतीचा विकास खुंटला आहे.

मजदूर संघाची निदर्शने

0
0
वाढत्या महागाईवर नियंत्रण असावे, कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, ठेकेदारी पद्धत तातडीने बंद करावी, अशा विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

कांदा उत्पादक वळले हरभरा, गव्हाकडे!

0
0
कांदालागवडीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांनी या वर्षीदेखील कांद्याला नाही म्हणत हरभरा व गहू या पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. मागील वर्षी कांद्याला आलेला कमी भाव, त्यातच वाढलेल्या मजुरीमुळे एकूणच कांदा लागवड कमी झाली आहे.

चाकूचा धाक दाखवून १.२५ लाखांची लूट

0
0
शहरी भागात घरफोड्या करणाऱ्यांचे धा‌रिष्ठ्य वाढले असून घरात कुणी झोपले असले तरीही दरवाजा उचकटून ऐवज लुटण्याचे प्रकार घडू लागले आहेत. उपनगर परिसरातील मातोश्रीनगरमध्ये रविवारी पहाटे तीनच्या सुमारास असाच प्रकार घडला.

लोकसभा लढविण्यास विजय पांढरे इच्छुक

0
0
‘माझ्या स्वार्थासाठी मला काहीच नकोय; पण भ्रष्ट राजकारण्यांना त्यांची जागा दाखव‌िण्यासाठी आण‌ि चांगल्या प्रवृत्तींची शासनात मोट बांधण्यासाठी मी राजकारणात आलोय. पक्षाने आदेश दिला तर, आगामी लोकसभा न‌िवडणुकीत नाशिकची जागा लढवेन’, या शब्दांत ‘मेटा’ चे निवृत्त मुख्य अभ‌ियंता विजय पांढरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

घराघरात होणार पाण्याचे ‘ऑडिट’

0
0
‘पाणी म्हणजे जीवन’ असे असले तरी आपल्या हातून किती पाणी वाया जाते याकडे आपले कधीही लक्ष जात नाही. आपल्यातील काही सवयींमुळे दररोज आपण किमान दहा लिटर पाणी वाया घालवितो.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images