Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'ती' भिंत ठरली चर्चेची

$
0
0
अनेकदा वरवर सोपा वाटणारा विषय चर्चेला गहण करू शकतो, असा अनुभव बुधवारी झालेल्या महासभेत आला. प्रभाग क्रमांक ३९मध्ये नासर्डीनदीलगत बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीच्या प्रस्तावाने मोठ्या चर्चेला तोंड फोडले.

असा सिहंस्थ काय कामाचा?

$
0
0
सिहंस्थ कुंभमेळा ही नाशिकची ओळख असली तरी, कुंभमेळ्याचे नियोजन करायचे म्हटले की सर्वांत प्रथम जुने नाशिक तसेच पंचवटी भागातील नागरिकांवर कुऱ्हाड कोसळते.

महापालिकेची अशीही खैरात !

$
0
0
एकिकडे विकासकामांना निधी नसल्याची ओरड महापालिकेकडून केली जाते. दुसरीकडे विविध संस्थांना दोन ते तीन लाखाचे अनुदान देताना कुठलीही चर्चा होत नसल्याचे बुधवारच्या महासभेत दिसून आले. त्यामुळे महापालिका जनतेचे पैसे खैरातीत वाटत असल्याची चर्चा रंगते आहे.

महापालिकेतर्फे दिग्दर्शक पुरस्कार

$
0
0
महापालिकेतर्फे यंदापासून राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजीव पाटील यांच्या नावे दिग्दर्शक पुरस्कार देण्यात येणार आहे. नगरसेवक तानाजी जायभावे यांनी याबाबत महापा‌लिकेला पत्र दिले होते. त्यानुसार बुधवारच्या महासभेत हा विषय मंजूर करण्यात आला.

विकासकामांना हिरवा कंदील

$
0
0
रस्ते, मैदाने, पथदीप, शाळा यासह शहरातील विविध विकासकामांना महासभेने मंजुरी दिली असून याकामांसाठी ५० कोटी रूपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी तहकूब करण्यात आलेल्या दोन महासभांचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते.

सर्वाधिक तक्रारी बिल्डरांविरोधात!

$
0
0
ग्राहकांना न्याय मिळावा म्हणून स्थापन झालेल्या नाशिक जिल्हा ग्राहक मंचामध्ये आजवर सर्वाधिक तक्रारी बिल्डरांविरोधात आल्या आहेत. बिल्डरांखालोखाल ग्राहकांनी विमा कंपन्यांना मंचात खेचले आहे.

बारागावपिंप्रीत टॅँकर सुरू करण्याची मागणी

$
0
0
तालुक्यातील बारागावपिंप्री येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असताना प्रशासनाने टॅँकरचा पाणीपुरवठा खंडित करून ग्रामस्थांची थट्टा केली असून गावात तातडीने टॅँकर सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मनमाड जंक्शनवर बेवारस मुलांचे प्रमाण वाढले

$
0
0
रेल्वे जंक्शनमुळे मनमाड स्टेशनवर फोफावणारी गुन्हेगारी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरलेली असतानाच आता बेवारस मुलांच्या नव्या समस्येने तोंड वर काढल्याचे चित्र आहे.

पूररेषेतील रहिवाशांना महापालिकेचा दिलासा

$
0
0
पूररेषेबाबत प्रशासनाने इतर महापालिकांमध्ये काय परिस्थिती आहे, याचा सर्व्हे करून तसा प्रस्ताव पुढील महासभेत चर्चेला ठेवावा, असे आदेश महापौर अॅड. यतीन वाघ यांनी दिले आहेत. २००८मध्ये गोदावरीला पूर आला होता. त्यानंतर पूररेषा नि​श्चित करण्यात आली होती. यासंदर्भात बुधवारच्या महासभेत जोरदार चर्चा झाल्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला.

गॅस अनुदानाच्या माहितीसाठी बँकेत गर्दी

$
0
0
गॅसच्या अनुदानाबाबत असलेली अनभिज्ञता आणि गॅस वितरक पुरेशी माहिती देत नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था आहे. नागरिकांनी बॅँकामध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी गॅसचे अनुदान जमा कधी होणार या चौकशीसाठी बँकेत खेट्या घालण्यास सुरुवात केली आहे.

दंतसौंदर्यविषयक माहिती मिळणार वेबसाइटवर

$
0
0
दातांवर चेहऱ्याचे सौंदर्य अवलंबून असते. आताची पिढी सौंदर्यदृष्ट्या खूपच जागरूक आहे आणि टेक सॅव्हिही आहे. या पिढीला दंतसौंदर्यक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान घरबसल्या उपलब्ध व्हावे यासाठी नाशिकच्या ऑर्थोडॉन्टिक स्टडी ग्रुपने http://www.bracesnashik.org या नावाची वेबसाइट तयार केली आहे.

आरोग्यचे सुधारित वेळापत्रक जाह‌ीर

$
0
0
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या ह‌िवाळी स‌त्रातील परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. १७ ड‌िसेंबरपासून या परीक्षांना सुरुवात होणार आहे.

चार स्थळांवर पूर्णतेचा लेप

$
0
0
प्राचीन ठेवा असलेल्या नाशिक विभागातील चार प्रकल्पांचे काम पूर्णत्वाकडे आणण्यास राज्याच्या पुरातत्त्व विभागाला यश आले आहे. त्यामुळेच येत्या काही महिन्यांत पारोळा किल्ला, देवळाण्याचे महादेव मंदिर, चांदवडच्या होळकर वाड्याचा पहिला टप्पा आणि नगरच्या खरडा किल्ल्याचे काम संपुष्टात येणार आहे.

बंदोबस्ताला अंधाराची आडकाठी

$
0
0
नाशिकरोड व उपनगर पोलिसांनी िसक्युिरटी प्रेसच्या परिसरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये गस्त वाढवली असून प्रमुख चौकांमध्ये अंधाराचे साम्राज्य असल्याने गस्तीसाठी अडचणी येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

महावितरण म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा

$
0
0
वीजदर वाढीस ग्राहक संघटना जबाबदार असल्याचा आरोप महावितरणने केला होता. त्याचा ग्राहक संघटनांनी निषेध केला असून आपल्या अपयशाचे खापर महावितरण संघटनांच्या माथी मारत असल्याचे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे सदस्य श्रीधर व्यवहारे यांनी बुधवारी स्पष्ट केले.

बोरदैवतचे कंप सौम्य

$
0
0
कळवण तालुक्यातील बोरदैवत भागात मोठे आवाज होण्यासह जमीन हादरण्याचे प्रमाण अधिक असले तरी हे कंप सौम्य असल्याचा अहवाल हवामानशास्त्र विभागाने जिल्हा प्रशासनाला पाठविला आहे. तसेच, याठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाची योग्य ती काळजी घेण्याची शिफारसही त्यांनी केली आहे.

वजन-मापे तपासणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांची लूट

$
0
0
नाशिक विभागातील वैधमापन विभागाच्या वतीने व्यापाऱ्यांकडे असलेली वजने, मापे व काटे दरवर्षी तपासण्यात येतात. ही तपासणी करण्यासाठी विभागाने काटे दुरुस्ती करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक केली आहे.

विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पक्के छत

$
0
0
महापाल‌िका हद्दीत पाल‌िकेच्या पाच शाळांमध्ये २६ वर्गखोल्यांच्या नूतन बांधकामाला महासभेने बुधवारी मंजुरी दिली. या मंजुरीमुळे शहरातील सुमारे हजारांपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांच्या डोक्यावर श‌िक्षणासाठी पक्क छत मिळणार आहे.

कळवणला मुसळधार पाऊस

$
0
0
बुधवारी दुपारी चारच्या सुमारास कळवण शहरासह तालुक्याला सोसाट्याचा वारा व बेमोसमी मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे शेतीमालाचे विशेषत: कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अद्वय हिरे यांना जामीन

$
0
0
राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात ‘फेसबुक’वर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी अटकेत असलेले नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांना बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images