Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रक्षकच कायद्याचे भक्षक

0
0
कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस खात्यातील काही कर्मचाऱ्यांनी आपल्याच हेतूला हरताळ फासून निलंबनाची कारवाई ओढवून घेतली आहे. आतापर्यंत निलंबित झालेल्या २४ कर्मचाऱ्यांपैकी लाचखोरीच्या प्रकरणात १२ तर उर्वरित कर्मचाऱ्यांना बेशिस्त वर्तणुकीमुळे घरी बसावे लागले.

फॅमिली फिजिशिअन विश्वासाची जागा

0
0
'मोठमोठे हॉस्पिटल आणि सुपरस्पेशलिस्टच्या जमान्यात फॅमिली फिजिअन ही संकल्पना मागे पडू लागली असली तरी आजही फॅमिली फिजिशिअन ही एक विश्वासाची जागा आहे,' असे मत पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी व्यक्त केले. धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते.

कृषी साहित्य संमेलनाला तारीख पे तारीख

0
0
दीड वर्षापासून आज होणार, उद्या होणार असा डांगोरा पिटण्यात येणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाला आणखी एक तारीख देण्यात आली असून त्यानुसार रविवार, २४ फेब्रुवारीला हे संमेलन होणार, असे जाहीर करण्यात आले आहे.

अखेर बिझनेस कंबाईन सुरू

0
0
कामगार आयुक्तांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली सातपूर एमआयडीसीतील बिझनेस कंबाईन कंपनी पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नाशिकरोड जेलला प्रतीक्षा CCTVची

0
0
राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्रमुख जेलचे सिक्युरिटी ऑड‌िट करून जेलच्या परिसरात व जेलमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले होते. मात्र नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये अद्याप सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत.

दहा हजार विद्यार्थ्यांनी दिली 'सेट'

0
0
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी सेट (स्टेट इलिजीबिलीटी टेस्ट) ही परीक्षा नाशिकमधील १६ केंद्रांवर पार पडली. शहरातील या केंद्रांवर समारे १० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८० टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिल्याची माहिती मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव व सेट परीक्षा नियंत्रक प्रकाश अतकरे यांनी 'मटा'ला दिली.

दुष्काळावरचे उपाय GRमध्ये अडकले

0
0
दुष्काळावर मात करण्यासाठी टँकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे (एसडीओ) सोपविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर दुष्काळी जिल्ह्यांतील फळबागांच्या नुकसानीचे सर्वेक्षण, पंचनामे करण्याचेही सरकारने जाहीर केले. मात्र, या घोषणांचा जीआर (शासन निर्णय) निघाला नसल्यामुळे अद्यापही त्यावर अंमलबजावणी सुरू झालेली नाही.

पाल्यांना स्पर्धक बनवू नका!

0
0
सर्वत्र स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेमध्ये आपसातील सौहार्द संपुष्टात येते आणि इर्ष्या वाढीला लागते. यामुळे आपल्या पाल्यांना सातत्याने प्रेरणा द्या मात्र त्यांना निव्वळ स्पर्धक बनवू नका, असे आवाहन भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफाली भुजबळ यांनी केले. मातोश्री दमयंती शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक सेवा संस्था संचलित युनिव्हर्सल अॅकॅडमीच्या सांस्कृतिक व गौरव समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी बालकवी संमेलन म टा

0
0
बालकवी संमेलनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त लोकहितवादी मंडळातर्फे २७ फेब्रुवारीला जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी बालकवी संमेलन आयोजित केले जाते.

पार्किंगचा नियम शाळांकडून धाब्यावर

0
0
नगररचना नियमानुसार प्रत्येक शाळेला विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी जागा ठेवणे बंधनकारक असताना, अलिकडे सुरू झालेल्या अनेक शाळांकडून हे नियम धाब्यावर बसविण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. अशा शाळांना वाहतूक पोलिसांनी नोटीस बजावली असली तरीही महापालिकेच्या बोटचेपे धोरणामुळे शिक्षण संस्था याबाबत गंभीर नाहीत.

वृत्तवाहिन्यांनी बिघडवले वक्तृत्व

0
0
'बोलणे हे जीवनशक्तीचे लक्षण आहे. परंतु या बोलण्याच्या म्हणजेच वक्तृत्वाच्या शक्तीलाच ग्रहण लागले आहे. वक्तृत्वामध्ये किंवा भाषेमध्ये हे जे प्रदूषण निर्माण झाले आहे, त्याला विविध वृत्तवाहिन्याच जबाबदार आहेत,' अशी टीका डॉ. उदय निरगुडकर यांनी केली. पंचवटी कॉलेजमार्फत आयोजित कर्मवीर भाऊसाहेब हिरे राष्ट्रीय स्तरावरील आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सॅक्रेड हर्ट शाळेत पालकांचा गोंधळ

0
0
स्कॉलरशीप परीक्षेच्या सरावासाठी मुंबईतील खाजगी संस्थेने आयोजित केले सराव परीक्षेचे नियोजन कोलमडल्याने संतप्त झालेल्या पालकांनी गोंधळ घातल्याने शाळेने मुलांना वेठीस धरल्याचा प्रकार आज घडला. अखेर पोलिसांच्या मदतीने विद्यार्थ्यांना पालकांच्या हवाली करण्यात आले.

टोळक्याची विद्यार्थ्याला मारहाण

0
0
सेंडऑफच्या दिवशी किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर एका टोळक्याने विद्यार्थ्यास बेदम मारहाण केली. इंदिरानगरमधील सुकदेव ज्युनिअर कॉलेजसमोरील मैदानात झालेल्या हाणामारीनंतर इतर विद्यार्थ्यांची धावपळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी वडाळागावातील मेहबुबनगरमध्ये राहणाऱ्या एका संशयितास अटक केली.

पावसाने पाच कोटींचे नुकसान

0
0
तालुक्यातील मोसम खोऱ्यात गुरुवारी झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. आमदार उमाजी बोरसे यांनी शुक्रवारी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला.

अधिकाऱ्यांनी लांबवले वाळूचे लिलाव

0
0
जिल्हा प्रशासनाकडून वाळू वाहतूकदारांविरुद्ध सुरू असलेली कारवाई ही हेतुपुरस्सर असून, जिल्ह्यातील वाळू लिलाव लांबण्यामागे खुद्द अधिकारीच कारणीभूत असल्याचा थेट आरोप नाशिक जिल्हा बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स व वाहतूकदार असोसिएशनने अध्यक्ष शिवाजी चुंबळे यांनी केला आहे. दरम्यान अवैध व क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेत रविवारीही कारवाई करण्यात आली.

नाशिकलाही दुष्काळाचे चटके

0
0
नाशिकलाही चटकेनाशिक जिल्ह्यातील १५पैकी १० ते १२ तालुक्यांना दुष्काळाचे चटके जाणवू लागले आहेत...

भगूर नगराध्यक्षपदाची २६ रोजी निवडणूक

0
0
नगराध्यक्ष भारती साळवे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर येत्या २६ रोजी निवडणूक होणार आहे. दरम्यान, पालिकेत शहर विकास आघाडीची सत्ता असून नगराध्यक्षपदाचा मान पुन्हा एकदा आघाडीच्याच उमेदवाराला मिळणार असल्याचे समजते.

चौफुली ठरतेय जीवघेणी

0
0
पेठ-दिंडोरी मार्गावरुन रासबिहारी स्कूलमार्गे मुंबई-आग्रा, तसेच औरंगाबाद व पुण्याकडे जाणा-या वाहनांसाठी तयार करण्यात आलेल्या रिंगरोडला काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे.

नाट्य परिषदेवर 'सिध्दीविनायक'चे वर्चस्व

0
0
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत 'सिध्दीविनायक' पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. नाशिक मध्यवर्ती शाखा सदस्यपदाच्या चार जागांसाठी आठ जणांमध्ये सरळ लढत झाली. त्यात सुनील ढगे यांच्या सिध्दीविनायक पॅनलने नटराज पॅनलचा धुव्वा उडवला.

महागाईच्या भडक्यात घरपट्टीवाढीचे तेल

0
0
सर्वत्र महागाईचा भडका उडालेला असताना आता त्यात महापालिका प्रशासनाने घरपट्टीत तब्बल १० टक्के वाढीचा प्रस्ताव सादर करत तेल ओतण्याची तयारी केली आहे. येत्या १ एप्रिलपासून ही करवाढ लागू करावी असे प्रस्तावित आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images