Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एकलह-यात बिघाड; सातपूर अंधारात

$
0
0
एकलहरा येथील ओसीआर २२० केव्ही केंद्रात तांत्र‌िक बिघाड झाल्याने सातपूर परिसराचा काही भाग अंधारात होता. खंडीत वीज पुरवठ्याने सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत काम ठप्प झाले होते. या केंद्राची तातडीने दुरुस्ती करण्यात येऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा

$
0
0
वर्षानुवर्षे प्रलंब‌ित असणाऱ्या मागण्यांसाठी येत्या ६ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती सम‌ितीने दिला आहे. या घोष‌ित संपाची नोटीस प्रशासनाला देण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी आज, गुरुवारी ज‌िल्हाध‌िकारी कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढणार आहेत.

'नाशकात प्लास्टिक बंदी होईल का?'

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमळा लक्षात घेता नाशिकमध्ये प्लास्टिक बंदी करणे शक्य आहे का, अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने नाशिक महापालिकेकडे केली आहे. नीरीने दिलेल्या सर्व शिफारशींचे पालन करण्याचे आदेश हायकोर्टाने गोदावरी प्रदूषणप्रश्नी बुधवारी झालेल्या सुनावणीत दिले.

उकल जळीत संवेदनांची

$
0
0
महिलांबाबत अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. स्वयंपाक करताना स्टोव्हचा भडका, सासरी होणाऱ्या छळास कंटाळून पेटवून घेतले, चूल पेटवताना पदर पेटल्याने महिला भाजली, तरुणीवर एकतर्फी प्रेमातून अँसिड हल्ला, विद्युत शॉक बसून भाजणे या घटना समाजात घडताना दिसतात.

रंगदेवतेला अभिवादन करून...!

$
0
0
प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेस व विजय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पु. ल. महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला गुरूवारी सुरूवात झाली. स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे.

बर्न वॉर्ड अजूनही धगधगतोय !

$
0
0
काहीसा कोंदट, पण पुरेशी स्वच्छता असलेला सिव्ह‌िलमधील बर्न वॉर्ड. या वॉर्डात जायला लोक घाबरतात, येथे जायचं म्हटलं तरी पावलं थबकतात. अश्रुंनी भरलेले चेहरे अन् आपला ‘माणूस’ व्यवस्थ‌ित घरी येईल याची आस लावून बसलेले त्यांचे नातलग या वॉर्डाबाहेर घुटमळताना पाहिली की अधिकच हेलावल्या सारखं होतं.

‘तिवंधा’चा मार्ग मोकळा

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिवंधा चौक ते नाव दरवाजापर्यंतचा तसेच नेहरू चौक ते गाडगे महाराज पुलापर्यंतचा रस्ता महत्त्वपूर्ण ठरला आहे. २००२ पासून प्रलंब‌ित असलेल्या रस्ता रूंदीकरणाच्या कामात भूसंपादनाचा अडथळा होता.

लॅबचा ‘निकाल’

$
0
0
पेशंटच्या रक्ताचे नमूने तपासून आजाराचे निदान करणाऱ्या सुमारे ३५० पॅथॉलॉजी लॅबपैकी तब्बल ९२ टक्के लॅब अनधिकृत असल्याची बाब समोर आली आहे. पॅथॉलॉजी लॅब चालवणाऱ्या व्यावसायिकांनी महापालिकेकडे नोंदणी न केल्याने त्या बेकायदेशिर ठरवण्यात आल्या असून आतापर्यंत यातील ७० व्यावसायिकांना महापालिका प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत.

आनंदवलीच्या घरकुलांना अखेर मुहूर्त

$
0
0
गेल्या तीन वर्षांपासून आनंदवली गावात जवाहरलाल नेहरू पुर्नउत्थान योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झाली आहेत. मात्र या ना त्या कारणामुळे रखडलेल्या घरकुल योजनेला अखेर मुहूर्त मिळाला असून पहिल्या टप्याचे भूमिपूजन शुक्रवारी (६ डिसेंबर) महापौर अॅड. यतीन वाघ यांच्या हस्ते होणार आहे.

एक धक्का और दो !

$
0
0
आध‌ीच वीज दरवाढीचे चटके... त्यातच 'एमआयडीसी'ने केलेल्या पाण्याच्या दरवाढी विरोधात उद्योजकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या समस्येबाबत याआधीही आंदोलन करण्यात आले असले तरी, नागपुरला होणाऱ्या विधानसभा अधिवेशनाच्या निमित्ताने आपला आवाज सरकारदरबारी पोहोचविण्यासाठी उद्योजकांकडून ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणाची म्हैस अन...

$
0
0
मित्रत्त्वाची व्याख्या करताना 'संकटकाळी कामी येतो तोच खरा मित्र' हे वाक्य नेहमी सुनवलं जातं. मात्र, कधीकधी मदत करणे संकट ठरते. परवा असाच एक किस्सा घडला. मार्केटिंग प्रतिनिधी असलेला एक तरूणाला कामानिमित्त बाहेरगावी जावे लागणार होते.

कळवणमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत

$
0
0
कळवण शहरात गेल्या महिन्यापासून अचानक आलेल्या कुत्र्यांच्या टोळीमुळे कळवणवासी त्रस्त झाले असून झुंडीने फिरणाऱ्या या कुत्र्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे.

कांदेंच्या नांदगावभेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण

$
0
0
शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन मनसेतून सेनेत दाखल झालेल्या सुहास कांदे यांनी गुरुवारी नांदगाव व मनमाड शहरात शिवसैनिकांशी संवाद साधत पक्षासाठी जीवाचे रान करण्याचे सूर आवळले. कांदे यांच्या या नांदगावभेटीमुळे दिवसभर तर्कवितर्कांना उधाण आले होते.

‘दर्द-ए-डिस्को’ची बाजी

$
0
0
५३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून आर. एम. ग्रुपतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘दर्द-ए-डिस्को’ नाटकाने बाजी मारली. नाट्यनिर्मितीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या नाटकाने पटकावला आहे.

अंध, अपंग साहित्य संमेलन १४ डिसेंबरपासून

$
0
0
नाशिकरोडच्या शारदा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १४, १५ डिसेंबर रोजी जेलरोडच्या राज राजेश्वरी मंगल कार्यालयात अंध अपंगाचे साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाला महाराष्ट्रातील अंध, अपंग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

‘राष्ट्रवादी युवक’च्या शहराध्यक्षांची अटकेनंतर सुटका

$
0
0
अंबड पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घालण्यासह सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष छबू नागरे यांना गुरुवारी अटक करण्यात आली. नागरे यांना कोर्टात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

कर्मचारी-व्यवस्थापन वादाचा फटका मुलांना

$
0
0
सहावा वेतन आयोग लागू करावा, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शाळेचे कर्मचारी मागणी करत आहेत. मात्र व्यवस्थापनाचे याबाबत मतभेद असल्याने वाद सुरू आहे. अन्यही काही वाद आहेत. काही प्रकरणांसाठी शाळेने चौकशी सम‌ितीही नेमली आहे.

‘एटीएम’च्या बाहेरही सीसीटीव्ही लावा

$
0
0
‘बँकांनी एटीएममध्ये सीसीटीव्ही लावणे आवश्यक असून बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमण्याची जबाबदारी बँकांवरच आहे. ग्राहकांच्या हितासाठी एटीएमच्या बाहेरही सीसीटीव्ही लावणे आवश्यक असून ३१ जानेवारीपर्यंत बँकांनी सीसीटीव्हीचे काम पूर्ण करावे,’ अशी सूचना पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली.

शिक्षक भरतीमुळे खडाजंगी

$
0
0
महापालिकेच्या सातपूर विभागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील दोन शिक्षकांना भरती प्रक्रियेतून वगळण्यात आल्याचा मुद्दा गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत चांगलाच गाजला. नगरसेवक प्रकाश लोंढे आणि शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांची खडांजगी झाल्यानंतर अखेर सभापतींनी वगळण्यात आलेल्या शिक्षकांना सहानुभूती म्हणून परत कामावर घेण्याचे आदेश दिले.

पूररेषेबाबत सरकार उदासीन

$
0
0
हजारो नागरिकांचा जीव टांगणीला लावणाऱ्या पूररेषेचा प्रश्न केवळ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अंधातरी लटकला आहे. उशिरा का होईना, पाठवलेल्या ठरावावर राज्य सरकारने कोणताच निर्णय घेतला नसल्याने हा प्रकार जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याची टीका होते आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images