Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बाल नाट्य स्पर्धा २३ डिसेंबरपासून

$
0
0
गेल्या आठ वर्षांपासून बंद झालेल्या राज्यस्तरीय बाल नाट्य स्पर्धेचा बिगुल २३ डिसेंबरपासून पुन्हा वाजणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक संचलनालयातर्फे होत असलेल्या राज्य नाट्य स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर बाल नाट्य स्पर्धांचे केंद्र गेल्या काही वर्षांपासून नाशिकला नाही परंतु अखेर प्रतिक्षा संपली असून आता पुन्हा बाल नाट्य स्पर्धा सुरू होणार आहेत.

इंधन बचतीसाठी एसटीचा पुढाकार

$
0
0
इंधन बचतीचा मंत्र देणारे सिम्युलेटर कार्यान्वित करावे या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नाशिक विभागाने शुक्रवारी या प्रयोगाचा श्रीगणेशा केला.

हॉकर्स झोनसाठी प्रतीक्षाच

$
0
0
शहरातील हॉकर्स झोन निश्च‌ित करण्यासाठी तसेच त्यासंबंधी नियमावली तयार करण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे सादर केलेल्या ठरावावर मागील तीन वर्षांत कोणताही निर्णय झालेला नाही.

मनमाड-मालेगाव मार्गावर अपघात

$
0
0
मध्य प्रदेशमधील साईभक्तांना घेऊन चाललेल्या स्कॉर्पिओला आज (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास मनमाड-मालेगाव मार्गावर कुंदलगाव शिवार येथे अपघात झाला. स्कॉर्पिओ आणि कंटेनर यांची एकमेकांशी धडक झाली.

इंजि‌नीअरिंगच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

$
0
0
दोन दिवसांत शहरात घडलेल्या चार वेगवेगळ्या अपघाती घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाची ओळख पटू शकलेली नाही. मोटरसायकलवरून घराकडे चाललेल्या इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्याचा भरधाव टेम्पोच्या धडकेने मृत्यू झाला. आनंदवली येथे शनिवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला.

भूतदयेचा अनोखा आविष्कार!

$
0
0
मुक्या जनावरांना मायेची ऊब देऊन त्यांच्यासाठी दररोज पाला (घास) आणि गुळ देण्याची आपल्या वडिलांची अनोखी परंपरा येथील अनिल बोरसे या सलूनचालकाने थोडीथोडके नव्हे तर तब्बल ३३ वर्षांपासून सुरू ठेवली आहे.

‘युवा’च्या कार्यकारिणीत ‘भाविसे’चे पदाधिकारी

$
0
0
गेल्या तीन वर्षांपासून लटकलेल्या युवा सेनेच्या नाशिकमधील कार्यकारिणीला शनिवारचा(७ डिसेंबर) मुहूर्त लाभला. मुंबईतून जाहीर झालेल्या कार्यकारिणीत जिल्हा अधिकारी, उप जिल्हा अधिकारी, महानगर अधिकाऱ्यासह इतर पदांचीही घोषणा करण्यात आली आहे.

बँक शाखाधिका-यांवर गैरव्यवहाराचा गुन्हा

$
0
0
‘एफडी’च्या(फिक्स डिपॉजिट) बनावट पावत्यांद्वारे तसेच नियमबाह्य पद्धतीने मुदत ठेव कर्जवाटप करून दोन कोटी नऊ लाखांचा गैरव्यहार केल्याच्या ठपक्याखाली श्री गणेश सहकारी बँकेच्या पिंपळगाव शाखेच्या शाखाधिकाऱ्यांसह पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘नामको’ संचालकांविरोधात कर्मचारी संघटना कोर्टात

$
0
0
नाशिक मर्चंट को. ऑप. बॅँकेचे संचालक हुकूमचंद बागमार यांनी गेली तीन तपे खातेदारांचा पैसा व्यक्तिगत स्वार्थासाठी वापरून सहकार खात्याचे निर्बंध न पाळता बॅँकेत आर्थिक अनियमितता आणत असल्याचा आरोप करीत कर्मचारी को. ऑप. एम्पलॉईज युनियन आता या संचालकांविरोधात कोर्टात जाणार आहे.

‘वसाका’चा ऊस नाशिक, नगरकडे!

$
0
0
देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दोन लाख टन ऊस नाशिक जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील कारखान्यांना क्रशिंगसाठी देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.

बार्न्स स्कूल परिसरात बिबट्या जेरबंद

$
0
0
देवळालीच्या बार्न्स स्कूल परिसरात काही दिवसांपासून दहशत पसरवणारा बिबट्या शुक्रवारी वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्याच्या वावरामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. शाळेच्या मैदानावर आठवड्यापासून बिबट्याचा वावर वाढल्याने प्राचार्यांनी वनविभागास माहिती दिली. त्यानंतर वनविभागाने झुडपात लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी पहाटे बिबट्या अडकला.

पालांची पोलिसांकडून झडती

$
0
0
शहरात ठिकठिकाणी पाल ठोकून राहणाऱ्यांची पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री झडती घेतली. सराईत गुन्हेगार पाल ठोकून राहून गेल्याच्या घटना ताज्या असल्याने या पार्श्वभूमीवर ही तपासणी केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

वाडगावात मुलाकडून पित्याचा खून

$
0
0
वडिलांनी वखर पायावर मारल्यामुळे संतप्त झालेल्या मुलाने त्याच वखराने वडिलांच्या डोक्यात घाव घातल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक तालुक्यातील वाडगावात शनिवारी सकाळ‌ी आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशकात थंडी वाढली

$
0
0
लहरी मोसमामुळे हरवलेली थंडी उशिराने का होईना, माघारी आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत थंडीची तीव्रता कमी असली तरी, डिसेंबरअखेरीस कडाका वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी कमाल तापमान २९.५ तर किमान १०.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

DDT द्राक्षाप्रमाणे मानवालाही घातक

$
0
0
बाजारपेठेत सन १९७० च्या दशकापासून बंदी असलेले डीडीटी (डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरोइथेन)चे अंश अतिरिक्त प्रमाणात आढळणे हे द्राक्षाप्रमाणे मानवालाही घातक आहे. मानवी श्वसनसंस्था व जनुकांवर प्रतिकूल परिणाम घडविण्याची क्षमता, कॅन्सरसारख्या आजारांसाठी काही प्रमाणात कारणीभूत ठरणारे घटक म्हणून आणि प्रतिविष म्हणूनही डीडीटी यापूर्वीपासून बदनाम आहे.

कचरा थोडा, खर्च डोंगरएवढा

$
0
0
महापालिकेचा खत प्रकल्प पांढरा हत्ती बनला असून त्याची जोपासणूक करणे महापालिकेला चांगलेच जड होऊ लागले आहे. मागील पाच वर्षात या प्रकल्पावर १६ कोटी ४० लाख रूपयांचा खर्च करण्यात आला.

‘स‌िल्वर ओक’ला नोटीस

$
0
0
फी वसुलीच्या मुद्द्याहून व‌िद्यार्थ्यांना वेठीला धरणाऱ्या स‌िल्वर ओक शाळेला या प्रकरणी शालेय व्यवस्थापनाने त्यांची बाजू मांडावी, अशी नोटीस पाल‌िकेच्या श‌िक्षण मंडळाने द‌िली असल्याची माह‌िती शनिवारी पालकांनी द‌िली.

‘राष्ट्रवादी’ भवनचे २५ डिसेंबरला उद्‌घाटन

$
0
0
केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे लांबणीवर पडलेल्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यासह जिल्हा राष्ट्रवादी भवनच्या उद्‌घाटनासाठी २५ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

नाशिक आयडॉलमध्ये तरुणाईचा जल्लोष

$
0
0
‘तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील कलेची जोपासना व्हावी. तरुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी नाशिक जिल्हा शिवसेनेतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात नाशिक आयडॉल स्पर्धेचे आयोजन केले होते या कार्यकमात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन स्पर्धेला रंगत आणली.

‘केकेडब्लू’ ठरले सर्वोत्तम

$
0
0
शहरातील के. के. वाघ पॉल‌िटेक्न‌िक या संस्थेला आय.एस.टी.ई. दिल्लीतर्फे नरसी मुन्जी बेस्ट पॉल‌िटेक्न‌‌िक अॅवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळव‌िणारी ही एकमेव व‌िनाअनुदान‌ित श‌िक्षण संस्था ठरली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images