Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दुष्काळी दौरा

$
0
0
जिल्ह्याच्या काही भागात सध्या दुष्काळ असल्याने लोकप्रतिनिधींना या दुष्काळाची दखल घेणे भाग पडले आहे. त्यामुळेच काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातील परिस्थितीची पाहणी करण्याचे काम सुरु केले आहे. पण, जे प्रतिनिधी विधान परिषदेवर निवडून गेले आहे.

पर्यटन विकासाची कामे मार्गी लावा

$
0
0
वनविभागातील अधिका-यांच्या अनुत्सुकतेपोटी खुद्द पर्यटनमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची पर्यटन विकासाची कामे रखडल्याच्या 'मटा'तील वृत्ताची दखल वनविभागाच्या प्रधान सचिवांनी घेतली आहे.

तीन महिन्यांत ९७ लाखांवर दंड

$
0
0
गौणखनिजाची बेकायदा वाहतूक करणा-या वाहनांकडून महसूल विभागाच्या पथकांनी तीन महिन्यांत ९७ लाखांहून अधिक दंडवसुली केली. वाळूला चांगलाच भाव आल्याने कृत्रिम वाळू तयार करणा-या दगडखाणींकडेही या पथकांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

पाणीचोरीमुळे मनमाडमध्ये टंचाई

$
0
0
मनमाडकर भीषण पाणीटंचाईचा सामना करत असताना पाटबंधारे विभागाने पाण्याचा अपव्यय व पाणीचोरीसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या हातात असलेल्या पाण्याचा साठा कमी झाला आहे. त्याचा फटका मनमाडला बसला आहे.

एसटीच्या मार्गावर प्रोत्साहनाची गाडी

$
0
0
एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचा मुख्य दुवा असलेल्या चालक-वाहकांना आर्थिक लाभाची संधी देतानाच प्रवाशांचीही हेळसांड थांबावी, यासाठी एसटी महामंडळाने 'उत्पन्नाधारित प्रोत्साहन भत्ता योजना' जाहीर केली आहे.

शिक्षकाने गाठला शिक्षणाधिकारी पदाचा पल्ला

$
0
0
प्राथमिक शिक्षक ते जिल्हा शिक्षणाधिकारी (प्रथम वर्ग) अशा प्रेरणादायी प्रवास करणारे डॉ.सुभाष बोरसे सध्या कौतुकाचा विषय ठरले आहेत. धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील रहिवासी असलेल्या सुभाष बोरसे यांनी दहावी नंतर डीएड केले आणि गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत ते प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले.

१५५६.८० कोटींचे बजेट सादर

$
0
0
वातावरणातील बदलावर मात करण्यासाठी विशेष कृती आराखडा, मॉलिक्युलर लॅब, प्रदर्शन भरविण्यासाठी कायमस्वरुपी जागा, माध्यमिक शाळा आणि अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेतर्फे गणवेश, सर्वच शाळांसाठी कम्प्युटर, इआरपी कार्यप्रणाली आदी महत्त्चकांक्षी योजनांचा समावेश असलेले १५५६.८० कोटींचे बजेट आयुक्तांनी स्थायी समितीसमोर सादर केले.

दुष्काळावर भुजबळांचा 'शिरपूर पॅटर्न'चा उतारा

$
0
0
जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीवर मात करत पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी भुजबळ फाऊंडेशनने 'नाशिक फेस्टिव्हल'ला फाटा देत शिरपूर पॅटर्नद्वारे जलसंधारणाची कामे सुरू केली आहेत. जिल्ह्यातील एकूण ९९ ठिकाणी ही कामे करण्यात येणार आहेत.

आरोग्य अभ्यासक्रमाला ४ कोटींचा 'डोस'

$
0
0
महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य विज्ञानाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्याच्या हालचाली थंडावल्या असतानाच आयुक्तांनी मात्र आपल्या बजेटमध्ये या अभ्यासक्रमासाठी ४ कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे थंडावलेल्या हालचाली पुन्हा एकदा गतीमान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुसळगाव सेझ प्रकल्पग्रस्तांचे उपोषण

$
0
0
मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ मुसळगावच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तालुक्याचे आ. माणिकराव कोकाटे व दिलीपराव शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील शेतक-यांनी सेझसाठी जमिनी दिल्या.

दिलजमाईनंतरही कोकाटे अनुपस्थित

$
0
0
पालकमंत्री छगन भुजबळ आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्यातील कलगीतुऱ्यानंतर या दोघांमध्ये दिलजमाई झाली असली तरी दोघांमधील सूर अद्याप जुळले की नाही, असा प्रश्न सिन्नर तालुक्यातील जलसंवर्धन कामावेळी उपस्थित झाला.

आता जळगावातही वाहने जाळण्याचा प्रकार

$
0
0
अज्ञात समाजकंटकांकडून मध्यरात्री वाहने जाळण्याचा प्रकार नाशकात होत होता. आता तसा प्रकार जळगावातही झाला आहे. शहरात दोन कार आणि मणियार विधी महाविद्यालयात स्नहसंमेलनासाठी घातलेला मंडप जाळून टाकला.

सेनेतील ठिणगी पेटतीच

$
0
0
शिवसेनेतील अंतर्गत वाद थांबता थांबत नसून महापालिकेत झालेल्या पार्टी मीटिंगमध्येही सेनेच्या नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी झाल्याचे सूत्रांकडून समजते. 'एक व्यक्ती एक पद' या तत्त्वाने काम करण्याची मागणी काही नगरसेवकांनी करतानाच वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांवरुनही नाराजीचा सूर आळवण्यात आला.

वैतरणाचे पाणी मुकणेला देण्यास विरोध

$
0
0
वैतरणा धरणातील आरक्षित पाणी कालव्याद्वारे मुकणे धरणात टाकण्यासाठी प्रास्तावित असलेल्या कालव्याच्या कामाचे मोजमाप करण्यासाठी आलेल्या नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पाच्या पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांची वैतरणा व मुकणे प्रकल्पबाधित संतप्त शेतक-यांनी अशरक्षः हाकलपट्टी केली.

तरुणीची आत्महत्या

$
0
0
स्वामी विवेकानंदनगरमधील २५ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. वृषाली रामनाथ बोडके असे या तरुणीचे नाव असून तिने रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

कम्प्युटर खरेदी 'नेलिटो'कडूनच

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्ताधारी गटाने बँकेसाठी आवश्यक कम्प्युटर खरेदी मुंबईतील नेलिटो कंपनीकडूनच करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही बँकेने विनानिविदा खरेदी करण्याच्या प्रक्रियेत नेलिटो कंपनीलाच प्राधान्य दिले होते.

लाच मागणा-या अधिका-याविरोधात गुन्हा

$
0
0
आवस्तव पाणीपट्टीचे बिल कमी करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणा-या महापालिकेच्या कर्मचाऱ्याविरोधात अँटी करप्शन ब्युरोने सोमवारी गुन्हा दाखल केला.

सिन्नर पाणीटंचाईसाठी विंधणविहीरी

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघातील १२८ टंचाईग्रस्त गावे, वाडे, पाड्यांना खासदार समीर भुजबळ यांनी स्थानिक विकास निधीतून विंधनविहीरी आणि हातपंप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

भुजबळांनी रद्द केला 'नाशिक फेस्टिव्हल'

$
0
0
ऐन दुष्काळात सुरू असलेल्या राज्यातील मंत्र्यासंत्र्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या उत्सवी प्रवृत्तीवर टीकेची झोड उठली असताना नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी 'नाशिक फेस्टिव्हल'ला फाटा देत जिल्ह्यात शिरपूर पॅटर्नद्वारे जलसंधारणाच्या कामांचा प्रारंभ करून राजकीय सूज्ञपणा दाखवला आहे.

बजेटमध्ये कर व दरवाढीची शिफारस

$
0
0
विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश असलेले १५५६.८० कोटी रुपयांचे बजेट सोमवारी आयुक्तांनी स्थायी समितीसमोर सादर केले. १.१६ कोटींच्या या शिलकी बजेटमध्ये आयुक्तांनी नेहमीप्रमाणे कर आणि दरवाढीची शिफारस केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images