Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाट्यसंपदा एकांक‌िका स्पर्धेला जल्लोषात सुरूवात

$
0
0
नाट्यसंपदा सुवर्ण जयंती पुरस्कार आंतरमहाविद्यालयीन एकांक‌‌िका स्पर्धा आयोजीत केल्या असून परशुराम साइखेडकर नाट्यगृहात सोमवारी या स्पर्धेला प्रारंभ झाला. सोमवारी दिवसभरात पाच एकांकीका सादर झाल्या.

ऐतिहासिक घटना; ऐतिहासिक प्रीमिअर

$
0
0
अनंत कान्हेरे या नाशिकच्या युवकाने १९०९ साली केलेल्या जॅक्सन या इंग्रज अधिकाऱ्याचा वधाचा इतिहास ‘१९०९’ या चित्रपटातून जिवंत होणार आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात 'आप'ची उडी

$
0
0
‘कार्यमुक्त केल्याच्या कारणास्तव आंदोलनात उतरलेल्या जनलक्ष्मी बँक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीचा (आप) पाठींबा असून या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू’ असे प्रतिपादन 'आप'च्या राज्य समितीचे सदस्य विजय पांढरे यांनी केले.

‘दिगंबरा दिगंबरा’चा जयघोष

$
0
0
‘दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात आज शहरासह उपनगरांमध्ये श्रीदत्त जयंती महापूजा, गुरुचरित्र पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, पालखी सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कर्करोगग्रस्तांना ‘मुक्त’ शिक्षणाची दिशा

$
0
0
आपले सकारात्मक विचारच आपल्याला, आपल्या कृतीला पर्यायाने आयुष्याला घडवत असतात. ऐन उमेदीच्या काळातले काही युवक शिक्षण, करिअरची ओढ असताना नोकरी करत असतात.

अखेर केमिस्टचा संप मागे

$
0
0
अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) जाचाला कंटाळून बंदची हाक देणाऱ्या औषध विक्रेत्यांना हायकोर्टाच्या निर्णयामुळे बंद मागे घ्यावा लागला आहे.

पर्यावरण अहवालात महापालिकेचे ‘कॉपी पेस्ट’

$
0
0
महापालिकेने गेल्या दोन वर्षांत तयार केलेले पर्यावरण अहवाल एकसारखेच असल्याचे समोर आले आहे. पर्यावरण अहवाल तयार करून त्यादृष्टीने शहरात उपाययोजना राबवण्यासाठी हा अहवाल महासभेला सादर केला जातो.

पुरेसे पाणी द्या

$
0
0
यंदा पाऊस उत्तम झाला आहे, धरणांमध्ये पाणीसाठाही भरपूर आहे. असे असताना पंचवटी विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा का केला जातो, याचा जाब विचारण्यासाठी पंचवटी विभाग राष्ट्रवादीतर्फे विभागीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

मखमलाबादमध्ये सिलिंडरचा स्फोट

$
0
0
मखमलाबाद येथील एका वाड्यात सिलिंडरचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास हा प्रकार घडला. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे अ​ग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले.

कायदा हवा कठोर!

$
0
0
जादूटोणाविरोधी विधेयक संमत झाल्यामुळे अंधश्रद्धेला लगाम बसेल, अशी चर्चा राज्यभरात सर्वत्र सुरू आहे. परंतु या कायद्याचा बारकाईने अभ्यास केला असता यामधून अनेक महत्त्वाच्या बाबी वगळल्याचे निदर्शनास आले आहे.

उद्यान व्यवस्थापनाची माहिती फलकावर

$
0
0
शहरात एकूण ४२९ उद्याने असून त्यातील बहुतांश उद्यानांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पालिकेने बचतगट तसेच खासगी प्रायोजकाकडे दिली आहे.

महापालिकेत तेरी भी चूप...

$
0
0
महापालिकेच्या धोरणात्मक बाबींवर अधिकाऱ्यांनी चुप्पी साधावी. त्याबाबत कोणतीही चर्चा करू नये अन्यथा अशा अधिकाऱ्यांवर थेट प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा दमच आयुक्तांनी भरला आहे.

रिलायन्सच्या ४ जीसाठी महापालिकेला भुर्दंड

$
0
0
शहरात ४ जी सेवा सुरू करण्यासाठी रिलायन्स समूहाने रस्ते खोदण्याचे काम सुरू केले आहे. मात्र यातून शहरातील रस्ते खराब होत असून महापालिकेलाही मोठा आर्थिक भुर्दंड बसला असल्याचा दावा शिवसेना नगरसेवक शैलेश ढगे यांनी केला आहे.

जो देईल त्याला लाभ

$
0
0
नव्या भूसंपादन कायद्यात शेतकऱ्यांच्या पदरी फारसा मोबदला पडणार नाही. त्यामुळे शेतकरी सध्याच्या भूसंपादन कायद्यानुसार जमीन देणार असतील तर तेवढाच त्यांना अधिक लाभ होणार आहे.

रेड्यांची झुंज लावणा-यांवर गुन्हा

$
0
0
रेड्यांची झुंज लावून त्यांना निर्दयी वागणूक दिल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी दुपारी आडगाव शिवारात हा झुंज लावण्याचा प्रकार घडला होता.

होमिओपॅथिकच्या परीक्षांवर बहिष्कार

$
0
0
होमिओपॅथी संघटनांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी नागपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधील धन्वंतरी होमिओपॅथी महाविद्यालयांनी मंगळवार, १७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रात्याक्षिक व लेखी परीक्षा घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

साध्या अर्जावर जमीन नावावर

$
0
0
निलंबित करण्यात आलेले उपजिल्हाधिकारी विनय गोसावी यांची वादग्रस्त प्रकरणे रद्द करण्याचा सिलसिला सुरूच आहे. केवळ साध्या अर्जावर सरकारी जमीन खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचा गोसावी यांचा निर्णय अपर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे.

पतंगाचा खेळ ठरतोय जीवघेणा

$
0
0
नायलॉन मांजावर बंदी असली तरी पतंगाचा खेळ जीवघेणा ठरत आहे. पतंग उडविण्याच्या नादात तोल जाऊन पडल्याने रविवारी नाशिकरोड आणि पंचवटी परिसरात दोन चिमुकल्यांचा करूण अंत झाला.

‘आप’लाही गटबाजीची लागण

$
0
0
दिल्ली विधानसभेतील कामगिरीमुळे देशभरात उदोउदो होत असलेल्या आम आदमी पार्टीचा(आप) नाशिकमधला कारभार मात्र विसंवादात सुरू असल्याचे सोमवारी निदर्शनास आले.

कांद्याने केला हायवे जॅम

$
0
0
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याचे दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी कांदा लिलाव बंद पाडत पिंपळगावला मुंबई-आग्रा नॅशनल हायवेवर सुमारे तीन तास रास्ता रोको केला. गेल्या दोन आठवड्यांपासून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, मनमाड, सटाणा या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा भाव घसरत आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images