Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लाल कांद्याची आवक वाढली

0
0
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढत असून मंगळवारी सुमारे ११५० ट्रॅक्टरमधून सुमारे १२ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती.

त्र्यंबकच्या गोदावरीबाबत खुलासा करा

0
0
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या हद्दीत गोदावरी नदी कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित होण्यासह याठिकाणी गोदावरीला काँक्रीटच्या नाल्यात बंदिस्त केल्याप्रकरणी पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने त्र्यंबक नगरपालिका, नाशिक जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभागाचे सचिव आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सचिवांना नोटीस बजावली आहे.

सतराशे अनधिकृत इमारतींना नोटिसा

0
0
मागील साडेचार वर्षांत महापालिका हद्दीत १ हजार ७९६ अनधिकृत इमारती उभारण्यात आल्याची बाब समोर आली आहे. शहराला अनधिकृत इमारतींचा विळखा बसत असताना महापालिकेने धडक कारवाई करण्याऐवजी फक्त नोट‌ीस बजावण्यात धन्यता मानली आहे.

मक्याच्या हमी भावासाठी धाडसत्र

0
0
राज्य सरकारने मका खरेदीसाठी १३१० रुपयांचा हमी भाव दिला असला तरी जिल्ह्यात ७०० ते ८०० रुपये दराने मका खरेदी होत असल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

३ लाख टन ऊस उभाच राहणार?

0
0
नाशिक जिल्ह्यासह लगतच्या चाळीसगाव, कन्नड, धुळे, साक्री आणि नवापूर या तालुक्यात सुमारे १३ लाख टन ऊसाचे उत्पादन झाले आहे. मात्र अवघ्या तीन साखर कारखान्यांचा विचार करता यातील तीन लाख टन ऊस उभाच राहणार असल्याची भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे.

कांद्याचे आंदोलन आठवडाभर स्थगित

0
0
कांद्याचे निर्यातमूल्य रद्द करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यासाठी आत्मदहन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आठवडाभर स्थगित केला आहे.

एचआयव्हीबाधितांचा वधू-वर मेळावा

0
0
आयुष्यभराचा साथीदार देणारं लग्न म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. पण ज्यांना आयुष्यभरासाठी ‘एचआयव्ही’ने साथ दिली आहे त्यांच्यादृष्टीने मात्र हे लग्न म्हणजे अशक्य स्वप्न.

पर्यावरण अहवाल वस्तुनिष्ठच होणार

0
0
पर्यावरण अहवाल शहराच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा असल्याने तो वस्तुनिष्ठ तयार होणे आवश्यक आहे. यापूर्वीच्या काही चुका दूर सारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महापौर अॅड. यतीन वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

महिलांच्या हक्काचे गाळे पडून

0
0
महाराष्ट्र सरकारच्या विशेष अनुदानातून महापालिकेने संभाजी स्टेड‌‌िअमला लागून महिलांसाठी १८ गाळ्यांचे सावित्रीबाई फुले महिला बचत गट मार्केट उभारले होते. गेल्या दोन वर्षांपासून हे गाळे लिलावाविनाच पडून असताना पुन्हा त्या गाळ्यांवर नव‌ीन गाळे बांधण्याचा घाट घातला जात आहे.

महापालिका आखणार क्रीडा धोरण

0
0
शहरातील खेळाडूंना पोषक वातावरण मिळावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महापालिकेने क्रीडा धोरण आखण्याची तयारी केली आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच हा निर्णय घेतला गेल्याने क्रीडापटूंसह विविध क्रीडा संघटनांनी याचे स्वागत केले आहे.

कॅन्टोमेंट बोर्डाला सहा महिन्याची मुदतवाढ

0
0
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असल्याने देवळाली कॅन्टोमेंटच्या निवडणुकांना दुसऱ्यांदा सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

'युवक राष्ट्रवादी'त फेरबदलाची चर्चा

0
0
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधील फेरबदलाने वेग घेतला असून येत्या काही दिवसात संघटनेला नवा चेहरा मिळण्याचे संकेत आहेत.

​चार वर्षांपासून काम अपूर्ण

0
0
महापालिकेने गेल्या पंचवार्षिकमध्ये सिडकोतील चेतनानगर येथील दास मारुतीनगर गार्डनचे काम सुरु केले होते. परंतु गेल्या चार वर्षांपासून येथील रहिवाशी गार्डनच्या प्रतीक्षेत आहेत.

युवतींनो राहा निर्धास्त!

0
0
महिला सुरक्षेसाठी रात्रीची गस्त घालणारी निर्भया व्हॅन नववर्षात दिवसाही शहरात गस्त घालणार आहे. महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड रोखण्यासाठी पोलिसांकडून टाकण्यात येणारे हे पुढचे पाऊल असून पोलिस दलाच्या स्थापनेदिनी २ जानेवारीला त्याचा शुभारंभ करण्याचा पोलिस आयुक्तांचा मानस आहे.

‘पिंपळगावा’त बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट

0
0
मुंबई-आग्रा हायवेवरील पिंपळगाव बसवंत विकासाच्या वाटेवर झेपावत आहे. चार ते सहा मजल्यांच्या इमारतीचे बांधकाम करताना नगर रचना विभागाचे सारे नियम तुडवले जात आहे.

१७ लाख गॅसधारक अनुदानापासून दूर

0
0
केंद्र सरकारने गॅसचे अनुदान थेट खात्यात जमा करणे सुरू केले असून नाशिक विभागातील २६ लाखांपैकी फक्त ९ लाख नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तर गॅस कनेक्शन व बँक खाते यांची जोडणी न झाल्याने सतरा लाख ग्राहक मात्र या अनुदानापासून दूर आहेत.

२ दिवसांत १४१ होर्डिंग्ज हटवले

0
0
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अवघ्या दोन दिवसांत पंचवटी विभागातील १४१ होर्डिंग्ज हटवले आहेत. हटवण्यात येणाऱ्या होर्डिंगची संख्या पाहिली की, पंचवटीत होर्डिंग लावण्याचे युद्ध सुरू आहे की काय? अशी शंका सर्वसामन्यांच्या मनात उपस्थित होऊ लागली आहे.

‘युवा’ची पहिलीच बैठक रद्द

0
0
आधीच कार्यकारिणीला तीन वर्षांचा विलंब, त्यात भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना युवा सेनेची पदे दिल्याने युवा सेनेत नक्की चाललेय तरी काय, असा प्रश्न युवा सैनिकांकडून विचारला जातो आहे.

‘MET’फीमध्ये ८ कोटींचा घोटाळा

0
0
शैक्षण‌िक अभ्यासक्रमांचे शुल्क ठरव‌िताना पालकमंत्री तथा मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे (एमईटी) संचालक छगन भुजबळ व इतर व‌िश्वस्तांनी दोन वर्षांमध्ये आठ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप या संस्थेचे माजी व‌िश्वस्त सुन‌िल कर्वे यांनी केला.

‘त्या’ दोघांना न्यायालयीन कोठडी

0
0
पंचवटीतील सागर वाघ या तरुणाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images