Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'कॅप डे'ला चमकली 'आप'ची टोपी

$
0
0
एचपीटी कॉलेजमध्ये साजऱ्या होणाऱ्या ‘कॅप डे’च्या निमित्ताने गुरूवारी कॉलेजचे कॅम्पस रंगेबिरंगी हॅट, कॅपद्वारे सजलेले असताना कॉलेजबाहेर मात्र, आम आदमी पार्टीची (आप) टोपी चर्चेत होती. दिल्लीतील धमाकेदार कामगिरीनंतर सतत चर्चेत असलेल्या 'आप'तर्फे शहरात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.

ओसरला थर्टी फर्स्टचा उत्साह ?

$
0
0
वर्षाअखेरीचा दिवस काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना यंदा मात्र थर्टी फर्स्टचा उत्साह कमी झाला आहे की काय, अशी शंका निर्माण होत आहे. गेल्यावर्षी थर्टी फर्स्टसाठी तब्बल १६ जणांना परवाने देण्यात आले असताना यंदा मात्र अवघ्या ९ जणांनीच करमणूक कराचे परवाने घेतले आहेत.

प्रमुख रस्ते होणार चकाचक!

$
0
0
सिंहस्थ निधीतील रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती महापौर अॅड. यतीन वाघ यांनी दिली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्‌घाटनाअभावी कामे सुरू होत नसल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर महापौरांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

मुंबई हवी रोमिंग फ्री!

$
0
0
देशभरात रोमिंग फ्रीची घोषणा करून काही महिने उलटले असतानाही ही सुविधा उपलब्ध होऊ शकलेली नाही. परिणामी आजही मुंबई व्यतिरिक्त राज्यातील मोबाइलधारकांना मुंबईत गेल्यावर रोमिंग चार्जेस पडतात. हे रोमिंग चार्जेस पडू नये म्हणून महाराष्ट्रासाठी मुंबई रोमिंग फ्री करण्याची मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

बीएसएनएलचे पुन्हा ‘उडान’!

$
0
0
दूरसंचार क्षेत्रातील पराकोटीची स्पर्धा आणि तोट्याचे गणित सांभाळताना होणारी कसरत लक्षात घेता भारत संचार निगम लिमिटेडला (बीएसएनएल) अखेर ग्राहकांचे मूल्य कळले आहे. त्यामुळेच ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी बीएसएनएलने ‘उडान’ मोहिमेची घोषणा केली आहे.

नाशिकरोडला ट्रकच्या धडकेने तरुणीचा मृत्यू

$
0
0
भरधाव ट्रकच्या धडकेने मोटरसायकलवरून चाललेल्या तरुणीचा मृत्यू झाला. गुरूवारी रात्री आठच्या सुमारास नाशिकरोड येथील एका हॉटेलसमोर हा अपघात झाला. उपनगर पोलिसांनी ट्रकचालक मोहंमद इस्माईल हनीफ शेख (२८, रा. हुमताबाद, कर्नाटक) याला अटक केली आहे.

हॉकर्स झोनचे होणार बायोमेट्र‌िक सर्व्हेक्षण

$
0
0
शहरातील हॉकर्स झोनचे बायोमेट्रीक पध्दतीने सर्व्हेक्षण होणार आहे. त्यापूर्वी महापालिका प्रशासन फेरीवाला समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेचे अधिकारी आणि फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

नाशकात सेंद्रिय शेतीचा स्टॉल

$
0
0
मुंबईनंतर नाशकातही सेंद्रिय शेतीचा पहिला स्टॉल लवकरच सुरु होत आहे. रासायनिक औषधांना फाटा देत उत्पादित करण्यात आलेला भाजीपाला आणि फळे नाशिककरांना दर शनिवारी उपलब्ध होणार आहेत.

बचत गटांनी तारले संसार

$
0
0
काही नेहमीच चूल आणि मूल सांभाळणाऱ्या, काही सतत बुरख्यात राहणाऱ्या तर काही आपल्याला जमेल का हा व्यवसाय या चिंतेने घाबरलेल्या बहुसंख्य महिलांचा संसार बचत गटाच्या परीसस्पर्शाने विकासाच्या मार्गावर धावत आहे.

केळझर कॅनालच्या गळतीने शेती संकटात

$
0
0
बागलाण तालुक्यातील केळझर धरणातून रब्बीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याची डाव्या कॅनोलमधून मोठया प्रमाणात गळती होत आहे. यामुळे पाणी वाया जाण्याबरोबरच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

अन् साईटवर धडकले मनरेगाचे आयुक्त

$
0
0
बागलाण तालुक्यातील मनरेगाअंतर्गत येणाऱ्या कामाची शुक्रवारी मनरेगाचे आयुक्त मुथ्थू कृष्णन यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. अपूर्ण कामे पूर्ण करून मजूरांचे पेमेंट तातडीने अदा करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

रेल्वेकडून सुविधांचा अभाव

$
0
0
रेल्वेच्या तिकीटात भाड्यासह वीमा सुरक्षिततेसाठी पैसे वसूल करणारे रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उदासीन असल्याचे दिसून आले आहे. नाशिकरोडसह अकरा स्टेशनचे फायर ऑडिट झाले आहे की नाही, याची माहितीच रेल्वे प्रशासनाला नसल्याची बाब समोर आली आहे.

नाशिकरोडला चला, जीव मुठीत धरून

$
0
0
उड्डाणपूल होऊनही नाशिकरोडचा वाहतुकीचा प्रश्न अद्यापही कायम आहे. दोनच दिवसांपूर्वी एक तरुण परिचारिका नासर्डी पुलाजवळ ट्रकखाली सापडून ठार झाली. चार महिन्यांपूर्वी उपनगर जवळ बसच्या मागील चाकाखाली सापडून गृहिणी मृत्यू पावली होती. उपनगरात वेगाने गाडी चालविल्यामुळे एका युवकाचा आठवड्यापूर्वी मृत्यू झाला होता.

पर्यटनवाढीसाठी किऑस्कचा स्टॅण्ड!

$
0
0
राज्यातील विविध पर्यटनस्थळांचा प्रचार, प्रसार करतानाच पर्यटनाला चालना देण्यासाठी किऑस्क सार्वजनिक ठिकाणी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसह महत्त्वाच्या ठिकाणी एकूण ३०० किऑस्क येत्या महिनाभरात लावले जाणार आहेत.

सातपूर प्रभाग सभापतींनी केले वाहन परत

$
0
0
महापालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे स्पष्ट करीत सातपूर प्रभाग समितीचे सभापती विलास शिंदे यांनी महापालिकेचे वाहन परत केले आहे.

बेकायदा बांधकामांची चौकशी करा

$
0
0
पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांच्या ‘मटा’तील वृत्तमालिकेची दखल घेत निफाड तहसिलदारांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पिंपळगावातील अनेक नियमबाह्य कामे उजेडात येण्याची चिन्हे आहेत.

५ लाखांच्या अपहारप्रकरणी एकावर गुन्हा

$
0
0
मेसर्स एस. आर. संकलेचा यांच्या बँक खात्यातून बनावट धनादेशाद्वारे परस्पर ५ लाख रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. रमेश माधव निकम असे आरोपीचे नाव आहे.

लाच घेताना कारकुनाला पकडले

$
0
0
सरपंचांना अपात्र ठरविल्याची निकालप्रत व सर्टिफाईड कॉपी देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अव्वल कारकुनाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

कोण असेल शिवसेनेचा उमेदवार?

$
0
0
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीनिमित्त जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज(शनिवार) नाशिकला येणार आहेत.

अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन जानेवारीमध्ये

$
0
0
पाचव्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साह‌ित्य संमेलनाचे आयोजन जानेवारीच्या पह‌िल्या आठवड्यात नाश‌िकमध्ये करण्यात आले आहे. या दोन द‌िवसीय संमेलनात विविध व‌िषयांवर अभ्यासकांच्या उपस्थ‌ितीत विचारमंथन होणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images