Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कपाळे डोंगराच्या वनीकरणाला आग

0
0
बागलाण तालुक्यातील भंडारपाडे शिवारालगत असलेल्या कपाळे डोंगराच्या वनीकरणाला रविवारी काही विकृतांनी आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला. वनवा पेटल्यामुळे सुमारे दोन एकर क्षेत्रावरिल वनसंपदा खाक झाली. या आगीत पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पगारवाढीच्या विषयावर गाजली बॉशची सभा

0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील सर्वात नावाजलेल्या बॉश (मायको) कंपनीच्या कामगार युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा पगारवाढीबाबतच्या करारावर गाजली. गेल्या एक वर्षापासून पगारवाढीबाबत बोलणी सुरू असून निर्णय कधी होणार, असा सवालही कामगारांनी यावेळी उपस्थित केला.

वाहन परत करण्याचा शिंदेंचा निर्णय वैयक्तिक

0
0
महापालिकेची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याचे स्पष्ट करीत सातपूर प्रभाग समितीचे सभापती विलास ​​​शिंदे यांनी नुकतेच महापालिकेचे वाहन परत केले आहे.

कंपनीत आग, ५ जण जखमी

0
0
टायर ट्युब पासून आईल बनविणाऱ्या एका कंपनीत अचानक झालेल्या स्फोटात आग लागून ५ जण जखमी झाले. आगीने रुद्रावतार धारण केला असल्याने मालेगाव मनमाड चांदवड, पिंपळगाव, लासलगाव येथून अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.

गोरेवाडीचे ऐतिहासिक गेट बंद

0
0
भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे गोरेवाडीतील येथील ब्रिटिशकालीन गेट सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहे. तसेच विभागीय महसूल कार्यालयाकडून मुद्रणालयाकडे येणारा रस्ताही खासगी वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

जिल्हा युवक राष्ट्रवादी @ ONLINE

0
0
‘रस्त्यावर उतरून जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासह वेबसाइट, सोशल साइट्सच्या माध्यमातून पक्षाचे काम पोहोचविणे महत्त्वाचे आहे', असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

२५० कोटींच्या रस्त्यांवर शिक्का

0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर १५० कोटी रुपयांच्या कामांना महापालिका लवकरच सुरुवात करणार आहे. ही कामे सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने आणखी २५० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी घेण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

घरनोंदणीसाठी उसळली गर्दी

0
0
जुन्या दराने घरनोंदणीचा सोमवारी शेवटचा दिवस असल्यामुळे नाशिकरोडच्या तसेच नाशिकच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात मोठी गर्दी उसळली होती. नाशिकरोडला सध्या दिवसाला ४० ते ४५ घरांची नोंदणी होत आहे.

रेडीरेकनरमध्ये दरवाढ?

0
0
स्वतःच्या घराचे स्वप्न साकारू पाहणाऱ्यांसाठी १ जानेवारी हा तसा दुःखाच दिवस असतो. कारण राज्य सरकार रेडीरेकनरचे नवीन दर जाहीर करते. त्यामुळे घरखरेदीचा खर्च वाढतो. बुधवारपासून रेडीरेकनरमध्ये १५ ते २० टक्के दरवाढ होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

खरेदी-विक्रीत ई-पेमेंट सक्तीचे

0
0
कुठल्याही प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करण्यासाठी येत्या एक जानेवारीपासून ई-पेमेंट नाशिक शहरात सक्तीचे करण्याचा निर्णय मुद्रांक व नोंदणी विभागाने घेतला आहे. त्यामुळे बनावट मुद्रांकांना आळा बसण्यासह पैशाचे व्यवहारही सुरक्षित होणार आहेत.

‘मुक्त’ कारभाराने बॅटरी कार धूळ खात

0
0
विद्यापीठात येणाऱ्यांच्या सेवेसाठी तब्बल २२ लाख रुपये खर्चून मागविण्यात आलेली बॅटरी कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे चक्क धूळ खात पडली आहे.

लॉच्या विद्यार्थ्यांना उमजेना अभ्यासाची दिशा

0
0
लॉ अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षात श‌िक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अभ्यासक्रमाबाबतच संभ्रम न‌िर्माण झाला आहे. या वर्षाचे आव्हान पेलत वकिली पेशात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य माह‌ितीअभावी कंपनी लॉ या व‌िषयाच्या अभ्यासाची द‌िशाच उमजत नसल्याची बाब समोर आली आहे.

जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

0
0
शहरात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे सिनीयर करस्पॉण्डण्ट अशोक सूर्यवंशी यांना जाहीर झाला आहे. पत्रकार दिनाचे औचित्य साधून ६ जानेवारीला पुरस्कार वितरण होणार आहे.

सटाण्यातील तरुणाचा घातपात झाल्याचा संशय

0
0
पनवेल जवळ रेल्वे मार्गावर सटाणा शहरातील तरुण मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा साक्षीदार ट्रकचालक फरार झाल्याने तरुणाचा घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

जिल्हाधिका-यांच्या आदेशाचीही 'हमी' नाहीच

0
0
मक्याला हमी भावापेक्षा कमी दर देण्यात येत असल्याप्रकरणी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये धाडी टाकून प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधकांना दिले होते.

सराफ बाजारात चोरीचा प्रयत्न

0
0
सराफ बाजार येथील दोन दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आला. परंतु या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

नाशिकरोडला रात्रंदिन युद्धाचा प्रसंग

0
0
नाशिकरोड परिसरात महापालिकेच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांना वाहतूक कोंडी व अन्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अतिक्रमण हे दिवसा तसेच रात्रीही असल्याने ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असेच म्हणण्याची वेळ स्थानिकांना आली आहे.

ग्रामपंचायतीत होणार ‘ग्राहक सुविधा केंद्र’

0
0
महाराष्ट्र सरकारच्या संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र योजने अंतर्गत नाशिक विभागातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांसाठी विविध प्रकारच्या सोयी दिल्या जाणार असून यात मोबाइल रिफिल ते रेल्वे बुकिंगपर्यंतच्या चाळीसहून अधिक सोयीसुविधा असणार आहेत.

भूसंपादन कक्ष नसल्याने कोट्यवधींचा फटका

0
0
भूसंपादन कक्ष तसेच टीडीआर सेल कार्यान्वित नसल्याने महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याचा आरोप स्थायी सदस्यांनी केला आहे. गेल्या वर्षभरात असे आरोप अनेक वेळा करण्यात आले असून प्रशासन मात्र राज्य सरकारकडे बोट दाखवून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करीत आहे.

२६५ कोटींच्या रस्त्यांना स्थायीची ‘मूकसंमती’

0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २६५ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महासभेत सखोल चर्चा होत असल्याने अशा कामांच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची आवश्यकता नसल्याचा लंगडा युक्तिवादही काही सदस्यांनी केला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images