Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दुस-या मजल्यासाठी FSI ची शोधाशोध

$
0
0
कुसुमाग्रज प्रतिष्ठानमधील वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्याचे काम एफएसआयच्या शोधात अडकले आहे. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार महापालिका प्रशासनाने हे काम हाती घेतले आहे.

अखेर कारसाठी हालचाली सुरू

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नाकर्तेपणामुळे २२ लाख रुपयांची बॅटरी कार धुळ खात पडल्याचे वृत्त ‘मटा’त प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला जाग आली आहे. त्यामुळेच ही कार कृषी पर्यटनासाठी वापरण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

सिल्व्हर ओकवर शिक्षण विभागाचा दबाव?

$
0
0
फी वसुलीच्या मुद्द्यावरून च‌िघळलेल्या आंदोलनामुळे व‌िद्यार्थ्यांची सुटलेली शाळा त्यांना पुन्हा म‌िळवून देण्यासाठी स‌िल्व्हर ओकच्या प्रशासनावर दबाव टाकण्याचे आश्वासन श‌िक्षण अध‌िकाऱ्यांनी द‌िले आहे.

भालेकर शाळेच्या बचावासाठी उद्या आंदोलन

$
0
0
शहरातील जुन्या श‌िक्षणसंस्थांपैकी असणारी बी.डी.भालेकर शाळा सुरू रहावी यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बचाव सम‌ितीतर्फे संघर्षाचे स्वरूप तीव्र करण्यात आले आहे.

नगरसेविकेच्या मुलासह ४१ जणांवर कारवाई

$
0
0
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्या १५ लोकांवर नाशिकरोड पोलिसांनी कारवाई केली असून त्यामध्ये एका नगरसेविकेच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती नाशिकरोड पोलिस स्टेशनचे निरीक्षक मौला सय्यद यांनी दिली.

गंगापूर रोडला रेडीरेकनरमध्ये सर्वाधिक वाढ

$
0
0
नववर्षाला प्रारंभ होताच रेडीरेकनरचे दरही जाहीर झाले असून सर्वाधिक वाढ गंगापूर रोड परिसरात झाली आहे. याठिकाणी जागेचे दर ४१ हजार प्रति चौरस मीटरवरून ४९ हजार २०० एवढे करण्यात आले आहेत.

दुभाजकाला धडकून मोटरसायकलस्वार ठार

$
0
0
वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव मोटरसायकलस्वाराचा दुभाजकाला धडकून मृत्यू झाला. त्र्यंबकरोडवरील सिव्हिल हॉस्पिटलसमोर मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. अक्षय दीपक मगर (२१, रा. तिडके कॉलनी) असे त्याचे नाव आहे.

बांधकाम नियमांची कडक अंमलबजावणी करा

$
0
0
नाशिकपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाल्याच्या ‘मटा’तील वृत्तमालिकेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या सीईओंनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

महापौरांना घडले गटार‘गंगेचे’ दर्शन!

$
0
0
गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी हायकोर्टात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी महापौर अॅड. यतीन वाघ यांनाच गोदापात्रातील गटार‘गंगे’चे प्रत्यक्ष दर्शन झाले.

नववर्षाची महागाई भेट!

$
0
0
महागाईला विटलेल्या जनतेला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दरवाढीची भेट मिळाली आहे. एकीकडे नाशिक शहरातील रेडीरेकनरमध्ये २० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्याने घरांच्या किंमती गगनाला भिडणार आहेत.

पंचवटीत विनापरवाना ‘करमणूक’

$
0
0
पंचवटीतील हॉटेल मिर्चीने करमणूक कराचा परवाना न घेता ३१ डिसेंबरचा कार्यक्रम आयोजित केल्याने या हॉटेलवर भरारी पथकाने कारवाई केली आहे. त्यानुसार या हॉटेलला दुप्पट दंड करण्यात येणार आहे.

यंदा होणार द्राक्ष निर्यातीचा विक्रम

$
0
0
भारतातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत नाशिकचा वाटा हा तब्बल ७० टक्के इतका आहे. आतापर्यंतच्या द्राक्ष निर्यातीवर नजर आणि सद्यस्थिती लक्षात घेतली तर यंदा द्राक्षांची सर्वाधिक निर्यात होण्याची चिन्हे आहेत.

ढिकलेनगरच्या रस्त्यात खांब

$
0
0
महापालिकेच्या बांधकाम विभागाने नाशिकरोडच्या ढिकलेनगर परिसरात रस्त्यात येत असलेल्या वीजेच्या खांबांना न काढता, आहे त्याठिकाणी नवीन रस्ते तयार सुरूवात केली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून चालताना नागरिकांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे.

थर्टी फर्स्टला ३५० अडकले

$
0
0
नववर्षाचे स्वागत करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे ३५० जणांना पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागला. यामध्ये अतिउत्साहाच्या भरात तोल गमावलेले, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बेशिस्तपणाचे दर्शन घडविण्याऱ्यांचा समावेश होता.

३० हजारांपर्यंत सक्ती नको

$
0
0
प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीत ई-पेमेंटचे व्यवहार राज्य सरकार स्वीकारत असले तरी गेल्या तीन पिढ्यांपासून व्यवसाय करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांचे काय होणार असा प्रश्न या विक्रेत्यांनी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांपुढे उपस्थित केला आहे.

बडी आयटी कंपनी नाशकात!

$
0
0
जगातील पहिल्या दहामध्ये असलेल्या एका आयटी कंपनीने नाशकात एण्ट्री करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या कंपनीमुळे नाशिक आयटीच्या जागतिक नकाशावर जाणार असून येत्या काळात इतरही आयटी कंपन्या नाशकात येण्याची चिन्हे आहेत.

अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन नाशिकमध्ये

$
0
0
श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूर आणि कवी नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयार्फे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. येत्या ४ व ५ जानेवारीला काल‌िदास कलामंदिरात हे संमेलन पार पडणार आहे.

लासलगावला शनिवारी लिलाव

$
0
0
शेतकरी हिताला प्राधान्य देत आता शनिवारपासून (ता. ४) कांदा लिलाव सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लासलगाव बाजार समिती व मर्चंट असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ही माहिती बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी दिली.

तरुणाईचे ग्रामविकासाला प्राधान्य

$
0
0
शहरी भागातील तरुणाई नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यात मग्न असतांना कळवणसारख्या आदिवासी भागातील कॉलेजच्या तरुणाईने मात्र सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामविकासाला प्राधान्य देत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

मालेगाव- मनमाड- येवला रस्ता बनलाय मृत्युचा सापळा

$
0
0
मालेगावकडून शिर्डीकडे चोंडीघाट तसेच कुंदलगाव मार्गे जाणारा रस्ता, त्यातच अंतर्भूत असणारा मनमाड- येवला मार्ग हा गेल्या अनेक महिन्यांपासून मृत्युचा सापळा बनला आहे. या मार्गावर सातत्याने होणारे अपघात ‌चिंतेचा विषय ठरत आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images