Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सेनेची कार्यकारिणी फायनल?

$
0
0
गटबाजी, अंतर्गत वाद, हकालपट्टी, पदाधिकारी नेमणूक अशा विविध मुद्द्यांमुळे वर्षभरापासून चर्चेत असलेल्या नाशिक शिवसेनेच्या कार्यकारिणीबाबत अंतिम निर्णय झाला असून लवकरच ती जाहीर करण्यात येणार आहे.

'ई-पालिके'साठी प्रशासनाचे 'लॉगिन'

$
0
0
अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असलेले ई-गव्हर्नन्स महापालिकेत प्रत्यक्षात उतरण्याच्या तयारीत असून त्यासाठी प्रशासनाने बजेटमध्ये कम्प्युटरायजेशनचे 'लॉगिन' केले आहे.

बंदचा बार फुसका?

$
0
0
कामगारांच्या हितासाठी हाती घेतलेल्या 'भारत बंद'मधून प्रमुख पक्ष आणि संघटनांनी आंदोलनाच्या पूर्वसंध्येलाच माघार घ्यायला सुरुवात केल्याने बुधवार आणि गुरुवारच्या बंदचा बार फुसका ठरण्याचे संकेत आहेत. या बंदमुळे प्रशासकीय कामकाज काही प्रमाणात प्रभावित होण्याची शक्यता आहे.

'क्रशर्स'कडून प्रशासनाची दिशाभूल

$
0
0
डोंगर पोखरून कोट्यवधींची माया जमविणा-या स्टोन क्रशर चालकांकडून महसूल विभागाची दिशाभूल सुरू असल्याचे कारवाईच्या निमित्ताने उघडकीस आले आहे. रॉयल्टी टाळण्यासाठी वर्षांनुवर्षे उत्पादन कमी दाखविणा-या क्रशर चालकांचा हा उद्योग एवढ्या दिवस बिनबोभाट सुरू राहण्यामागे खुद्द अधिका-यांचाच वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.

काळारामच राम भरोसे

$
0
0
काळाराम मंदिर हे नाशिककरांचे नाक आहे, असे म्हटल्यास अजिबात वावगे ठरू नये. परंतु या अतिमहत्त्वाच्या ठिकाणी असलेली सुरक्षाव्यवस्था अत्यंत तकलादू आहे. येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरांसह शहरातील महत्त्वाच्या वास्तू आणि स्थळांच्या सुरक्षेबाबत गांभीयाने विचार करण्याची गरज आहे.

घरपट्टी, पाणीपट्टी भरा 'पेमेंट गेटवे'ने

$
0
0
घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी रांगेत उभे राहणे आणि बराचकाळ उभे राहूनही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरील आठ्या बघून त्रस्थ होणे हा अनुभव नाशिककरांना नेहमीचाच झाला आहे.

औषधी वनस्पतींना संरक्षणाची मात्रा

$
0
0
विश्वातील सर्वात दुर्मिळ वनस्पती अंजनेरी येथे सापडल्यानंतर वनविभागाने हा परिसर औषधी वनस्पती संवर्धन क्षेत्र म्हणून विकस‌ित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर औषधी वनस्पतींची लागवड करून त्यांचे संवर्धन केले जाणार आहे.

कॉपी केली तर शिक्षकावरही कारवाई

$
0
0
दहावी, बारावी परीक्षांच्या काळात परीक्षा केंद्रावर कॉपी करतांना विदयार्थी आढळल्यास विदयार्थ्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. शिवाय शिक्षकांवरही कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर गायकवाड यांना परीक्षा आढावा बैठकीत दिला.

यशस्वी होण्यासाठी हारही महत्त्वाची

$
0
0
'प्रत्येकामध्ये स्वत:चा शोध घेण्याची उर्मी दडलेली असते. ती कायम ठेवून स्वत:चा शोध घेणे गरजेचे असते. तसेच एखाद्या गोष्टीमध्ये यशस्वी होण्यासाठी हारही महत्त्वाची असते', असे मत कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांनी व्यक्त केले.

अर्भकांची सुरक्षा ऐरणीवर

$
0
0
अर्भक चोरीच्या घटना टाळण्यासाठी प्रसूतिगृहाच्या प्रवेशद्वारावर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश हायकोर्टाने दीड वर्षांपूर्वी दिलेले असतानाही नाशिक महापालिकेने त्यावर अद्याप कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे नवजात अर्भकांची सुरक्षा ऐरणीवर आहे.

विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास थांबविणार कोण?

$
0
0
शाळांमध्ये भरमसाठ फी भरणारे पालक थोड्या पैशांसाठी स्कूल बसऐवजी खासगी वाहनांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शाळाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी झटकून टाकतात. स्कूल बसची फी वाढवून पालकांना वेठीस धरणा-या शाळा अन् स्कूलबसच्या फीमध्येच काटकसर दाखविणारे पालक विद्यार्थ्यांच्या ज‌ीवाशी खेळ करताना दिसतात.

पालिकेची सुरक्षा बाप्पाच्या हाती

$
0
0
सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांची नेहमीच वर्दळ असलेल्या नाशिक महापालिकेची सुरक्षा गणपतीबाप्पाच्या भरवशावर आहे. मुख्यालयात प्रवेश करताच स्वागताला साक्षात बाप्पा दिसतात.

नाशिकच्या विकासाला लाभणार गती

$
0
0
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) तर्फे आयोजित निमा पॉवर २०१३ या औद्योगिक प्रदर्शनाचे आज उद्‌घाटन होत आहे. रविवारपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनातून नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास प्रदर्शनाचे अध्यक्ष मिलींद राजपूत यांनी व्यक्त केला आहे.

सूनबाईंचा नृत्याविष्कार!

$
0
0
घर सांभाळून एखादी कामगिरी केली, तर महिलांचं विशेष कौतुक होतं. मग तो कौतुक सोहळा पाहण्यासाठी अख्खं घरदार उपस्थित राहतं. पण कधीकधी काम कमी आणि कौतुक जास्त अशी परिस्थिती असते. असाच एक किस्सा परवा घडला.

नाशिकची वाटचाल इलेक्ट्रिकल हबकडे

$
0
0
शहरात आगामी चार दिवस होत असलेल्या निमा पॉवर प्रदर्शनाच्या निमित्ताने येत्या काळात नाशिक हे इलेक्ट्रिकल हब म्हणून नावारुपाला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल क्लस्टर आणि इलेक्ट्रिकल पार्कची मुहुर्तमेढही रोवली जाणार आहे.

चारित्र्यवान नेत्वृत्वाची जगाला गरज

$
0
0
समाजासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी आदर्श नेत्वृत्वाची असते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्वृत्वक्षमतेसाठी दूरदृष्टी, तत्वांशी असणारी एकनिष्ठता आणि चारित्र्य या गुणांचा समन्वय हवा.

केमिस्टचे 'नियमानुसार काम'

$
0
0
राज्यभरातील केमिस्टनी आता 'नियमानुसार काम' या तत्त्वावर आठच तास दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फार्मासिस्टच्या अटींची अंमलबजावणी करताना कोणत्याही वेळी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) कारवाई केली जात असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे.

नाशिकरोडला संपाचा परिणाम शून्य

$
0
0
संपूर्ण भारतात पुकारलेल्या संपाला नाशिकरोड येथील महावितरण, रेल्वे, विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. महावितरणमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक युनियनपैकी वर्कर्स फेडरेशनच्या युनियनचे कर्मचारी संपात सहभागी झाले होते.

सिन्नरमध्ये बँकावगळता बंद नाहीच

$
0
0
विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदचा सिन्नर शहरात फज्जा उडाला. बँका वगळता सर्व व्यापारी संस्था सुरळीत सुरू होत्या. तर माळेगाव व मुसळगाव ओद्योगिक क्षेत्रात सर्व कारखाने सुरू होते.

मुक्त विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पुढे ढकलला

$
0
0
२३ फेब्रुवारीला होणारा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा १९वा पदवीदान समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. अपरिहार्य कारणाने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images