Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

इतिहासाच्या पुस्तकातला आक्षेपार्ह भाग वगळणार

$
0
0
पुणे व‌िद्यापीठाच्या फर्स्ट इयर बी. ए. अभ्यासक्रमात समाव‌िष्ट करण्यात आलेल्या इत‌िहासाच्या पुस्तकातील आक्षेपार्ह भाग वगळणार आहे. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्र‌िगेडने यातील काही मजकुरावर आक्षेप घेतल्यानंतर व‌िद्यापीठाने याबाबत व‌िषय तज्ज्ञांची सम‌िती गठीत करून अहवाल मागव‌िला होता.

निलंबित कामगारांना कामावर घ्या

$
0
0
कॅप्रिहॅन्स कंपनीने निलंबित केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीसाठी ‘कामगार विकास मंच’ने गुरुवारी मोर्चा काढला. तसेच, कामगार उपायुक्तांना भेटून त्यांना निवेदन देण्यात आले.

जैनांच्या हजेरीवर प्रश्नचिन्ह

$
0
0
घरकुल घोटाळ्यातील आरोपी आमदार सुरेश जैन हे सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. गेल्या आठवड्यात त्यांना अतिसाराची लागण लागल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना अद्यापही डिचार्ज मिळालेला नाही, असे असतांनाच दुसरीकडे शुक्रवारी खटल्याचे नियमित कामकाज धुळे न्यायालयात होणार आहे.

‘रस्त्यांमध्ये केबल टनेल टाका’

$
0
0
नाशिक शहरातील अनेक रस्ते खोदून सध्या ४ जी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. पुन्हा रस्ते खोदावे लागू नये यासाठी महापालिकेने आताच रस्त्यांमध्ये केबल टनेल टाकावेत, अशी मागणी उद्योजकांनी आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

‘आप’च्या गटबाजीवर शिक्कामोर्तब

$
0
0
आपल्या साधेपणामुळे देशभरात चर्चेत असलेल्या ‘आम आदमी पार्टी’चा (आप) नाशिकमधील कारभार गटबाजीच्या विळख्यात अडकला आहे. शहर व जिल्हा कार्यकारिणीत असलेल्या असमन्वयामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिक ‘आप’मधील गटबाजी चर्चेत होती.

नाशिक तहसील कम्प्युटराइज्ड

$
0
0
नाशिक जिल्ह्यात दिंडोरीनंतर नाशिक तहसील कार्यालय पूर्णपणे कम्प्युटराइज्ड झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व सातबारे उतारे स्कॅन झाले असून लवकरच ते ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.

‘आप’ला हवंय अण्णांचं 'बळ'

$
0
0
'आप'ला अण्णा हजारे यांच्या समर्थनाची उणीव पावलोपावली जाणवत आहे. आजपर्यंत 'आप'ला थेट पाठिंबा न देणाऱ्या अण्णांनी आगामी लोकसभा निवडणुकीत तरी समर्थन द्यावे अशी 'आप'ची अपेक्षा आहे.

नाशिकमध्ये भोंदूबाबा जेरबंद

$
0
0
करणीची बाधा झाल्याची भीती घालून घरातील दोष नाहिसे करण्यासाठी दोन महिलांकडून तब्बल २७ हजार रुपये उकळणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी जादुटोणाविरोधी कायद्यान्वये अटक केली आहे.

मुलीला दारू पाजणा-यावर गुन्हा

$
0
0
एका १५ वर्षांच्या मुलीला बळजबरीने गुटखा खाण्यास देऊन, तिला गार्डनमध्ये नेऊन दारू पाजणाऱ्यावर गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी ३१ डिसेंबरला शंकरनगर येथील गार्डनमध्ये हा प्रकार घडला. संबंधित मुलीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

मारहाण प्रकरणी एकास अटक

$
0
0
दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून एकास बेदम मारहाण करणाऱ्या चौघांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली. बुधवारी, १ जानेवारीला गंजमाळ येथील श्रमिकनगरमध्ये हा प्रकार घडला. सुनिल सुधाकर लांडगे, राजू सुधाकर लांडगे, रवि सुधाकर लांडगे, दिलीप सुधाकर लांडगे अशी आरोपींची नावे आहेत.

तंबाखू खरेदीच्या बहाण्याने चेन स्नॅचिंग

$
0
0
दुकानात च्युइंगम आणि तंबाखू खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने मंगळसूत्र हिसकावून पोबारा केल्याची घटना वनविहार कॉलनीत गुरुवारी दुपारी पाऊणच्या सुमारास घडली. साईनाथ को ऑपरेटिव्ह सोसायटीत राहणाऱ्या अंजली प्रकाश कांगणे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

वृद्धाला फसवून दागिने लांबविले

$
0
0
पोलिस आहोत अशी बतावणी करीत चोरट्यांनी वृद्धाचा विश्वास संपादन करून त्यांच्याजवळील दागिने लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास नाशिकरोडच्या टागोरनगर भागात घडली. गुरूधाम आश्रमाजवळ राहणारे सुधाकर रामदास बेंडाळे (६५) टागोरनगरमधून पायी चालले होते.

दिव्य याचना

$
0
0
‘देणाऱ्याने देत जावे आणि घेण्याऱ्याने घेत रहावे’ अशी म्हण असल्यामुळे भारतीय संस्कृतीत दानाचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच दारात आलेल्याला कुणीही परत करण्याच्या मानसिकतेत नसतो.

कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज

$
0
0
राज्यात शहरीकरण झपाट्याने वाढत असून या भागात अनधिकृत बांधकामांची संख्याही लक्षणीयरित्या वाढत आहे. त्यामुळे याप्रकरणी राज्यातील चार कायद्यांमध्ये बदल करण्याची नितांत गरज राज्याचे अप्पर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी व्यक्त केली आहे. शुक्रवारी ते नाशिक दौऱ्यावर होते.

श‌िक्षण व‌िभागच हतबल

$
0
0
फ‌ी वसुलीच्या मुद्द्यापोटी स‌िल्व्हर ओक इंटरनॅशनल स्कूलमधून काढून टाकलेल्या व‌िद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश द्यावा या मागणीसाठी व‌िव‌िध संघटना अन् पालकांनी द‌िवसभर शालेय प्रशासनापुढे केलेली डोईफोड अखेरीला न‌िष्फळच ठरली.

वीज कंपनी‌विरोधात शिवसेनेची निदर्शने

$
0
0
वीज वितरण कंपनीकडून थकीत वीजबिल वसुलीसाठी सरसकट विद्युत ट्रान्सफॉर्मरपासून वीजपुरवठा खंडीत करण्याच्या अन्यायकारक धोरणाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी वीजकंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध नोंदविण्यात आला.

घरकुल घोटाळ्याची सुनावणी १७ जानेवारीला

$
0
0
धुळे -बहुचर्चित घरकुल घोटाळ्याचा खटला धुळे न्यायालयात वर्ग झाल्यानंतरच्या पहिल्या तारखेस दिनांक ३ जानेवारी रोजी संशयित आरोपींपैकी आमदार सुरेश जैन वगळता माजी महापौर प्रदीप रायसोनी, जगन्नाथ वाणी, राजा मयूर आणि माजी मंत्री आमदार गुलाबराव देवकर यांनी विशेष न्यायाधीश आर.आर. कदम यांच्यासमोर हजेरी लावली.

पेट्रोलपंप चालकाला सटाण्यात गंडा

$
0
0
ऑईल विक्रेता असल्याचे सांगून नंदुरबार येथील विपीन एम. पटेल याने सटाण्यातील मे. टी. व्ही. गुजराथी पेट्रोलपंपाचे संचालक प्रल्हाद दगाजी पाटील यांची नऊ लाख २८ हजार ६३१ रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

सारस्ते सिंचन प्रकल्पामुळे ओलिताखालील क्षेत्र वाढणार

$
0
0
जलसिंचन प्रकल्पासाठी जमीन दान करणारा घटक महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे सारस्ते लघू पाटबंधारे योजनेसारखे जलसिंचनचे प्रकल्प होतात. सारस्ते लघू पाटबंधारे योजनेमुळे परिसरातील १०५ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

सप्तश्रृंग गडाचे कठडे अजूनही धोकादायकच

$
0
0
आदिशक्ती सप्तश्रृंग गड साडेतीन पीठांपैकी अर्धे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे गडावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. नांदुरी गाव ते गड हे सोळा किमीचे अंतर आहे. सात वर्षापूर्वी याच घाटातून खाजगी बस दरीत कोसळून चाळीस जण मुत्युमुखी पडले होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images