Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अॅम्ब्युलन्स चालकांचा संप मागे

$
0
0
महापा‌लिकेच्या अतिक्रमण विभागाने उद्ध्वस्त केलेल्या जनसेवा अॅम्ब्युलन्स सेवा संस्थेतर्फे करण्यात आलेला संप मागे घेण्यात आला आहे. संस्थेच्या सदस्यांना टपरीवजा कार्यालयात जागा मिळाल्याने हा संप मागे घेण्यात आला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटलबाहेरील जनसेवा अॅम्ब्युलन्स सेवा संस्थेचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले होते.

डोण्या खूनप्रकरणी दोघे ताब्यात

$
0
0
सराईत गुन्हेगार सचिन रावसाहेब मोकळ उर्फ डोण्या (३२) याच्या खूनप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. योगेश गांगुर्डे आणि प्रीतम चांगले अशी त्यांची नावे आहेत.

फसवणूक, जातिवाचक शिवीगाळीची तक्रार

$
0
0
ठरलेल्या फ्लॅटच्या व्यवहारात ऐनवेळी दुप्पट रक्कमेची मागणी केल्याचा तसेच खरेदीदारास जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार भगूरमध्ये घडला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये जातिवाचक शिवीगाळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरणारेजवळ अपघातात चौघे ठार

$
0
0
भरधाव कार आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चौघे ठार तर तिघे जण जबर जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास गिरणारे परिसरातील दुगाव शिवाराजवळ हा अपघात झाला.

भूसंपादनाविरोधात शेतकरी हायकोर्टात

$
0
0
सिन्नरजवळील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी इंडियाबुल्सतर्फे तयार करण्यात येणाऱ्या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचा वाद हायकोर्टात पोहोचला आहे. वाहतुकीच्या सोयीसाठी इंडियाबुल्सतर्फे हा रेल्वेमार्ग बांधण्यात येत असून त्यासाठी भूसंपादन सुरू आहे.

ध्रुवनगरमध्ये दोन गटांत जुंपली

$
0
0
गुन्ह्यातील साक्षीदाराने साक्ष मागे घ्यावी, या कारणावरून दोन गटांत झालेल्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग झाल्याचा तसेच जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

९ ते १८ जूनदरम्यान डीटीएडच्या परीक्षा

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या डीटीएडच्या परीक्षा येत्या ९ ते १८ जून २०१४ या कालावधीमध्ये होणार आहे. या विषयीची अधिसूनचा परिषदेच्या www.mscepune.in या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पैशांसाठी २ विवाहितांचा छळ

$
0
0
माहेराहून पाच लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याची तक्रार दोन विवाहितांनी केली आहे.

सर्पमित्र कुमावतची जामिनावर सुटका

$
0
0
सर्पमित्र म्हणून पूर्वी परवाना असलेल्या आणि जवळ साप बाळगणाऱ्या माणिक कुमावत याला वनविभागाने मंगळवारी कोर्टात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन महिन्यांत चार्जशीट दाखल करण्याचा निश्चय वनविभागाने केला आहे.

नाशकात निच्चांकी तपमान

$
0
0
उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम नाशिकच्या तपमानावरही झाला असून मंगळवारीही नाशकात राज्यातील सर्वात निच्चांकी तपमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी नाशकातील तपमान ९.४ अंश सेल्सिअस एवढे होते.

३.५ लाख हजार कोटींचा घोटाळा

$
0
0
राज्यातील बाजार समित्यांमधून फळे आणि भाजीपाला वगळण्याच्या हालचाली सुरू असतानाच कॅगच्या अहवालानुसार समित्यांमध्ये तब्बल साडेतीन लाख हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप बाजार समिती बचाव समितीचे डॉ. गिरधर पाटील यांनी केला आहे.

हिरेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त

$
0
0
माजी मंत्री प्रशांत हिरेंसह त्यांच्या पुत्रांना अखेर भाजप प्रवेशाचा मुहूर्त सापडला आहे. येत्या १४ जानेवारीला मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल, अशी माहिती बागलाणचे आमदार उमाजी बोरसे यांनी दिली आहे.

‘नामको’ बँकेवर प्रशासक

$
0
0
शहरातील आघाडीची मल्टिशेड्युल्ड बँक असलेल्या नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे (नामको) संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेने बरखास्त केले असून, कामकाज पाहण्यासाठी जे. बी. भोरी यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे.

मनसेचा नारळ नाशकात फुटणार

$
0
0
आजवर पक्षाला भरभरून देणाऱ्या नाशिकपासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा श्रीगणेशा करण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाची राज्यस्तरीय बैठक नाशिकमध्ये होत आहे. गुरुवारी, नऊ जानेवारीला प्रदेशपातळीसह राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.

दोन दिवसांत ३२ लाखांची वसुली

$
0
0
महापालिका बाजार संकुलांमधील थकबाकीधारकाविरोधात प्रशासनाने उघडलेल्या मोहिमेअंतगंत दुसऱ्या दिवशी सात गाळ्यांना सील ठोकत विविध कर विभागातील अधिकाऱ्यांनी १५ लाख ५४ हजार ७२ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली.

सांस्कृतिक संचित

$
0
0
आमच्याकडे नाणी, स्टँप आणि दुर्मिळ पुस्तकं असा मोठा खजिना आहे. माझ्या आजोबांपासून जपलेला. ते आमचं सांस्कृतिक संचितच आहे.

तिच्याविना आयुष्य अधूरं

$
0
0
अनेकदा आयुष्यात असे प्रसंग घडले की त्यावेळी आम्हाला एकमेकांची खूप गरज असायची पण आम्ही दोघेही एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण तरीही तीची साथ महत्त्वाचीच आहे. तीच्याविना आयुष्यच अधूरं आहे.

एका सॉरीनं दिला धडा...

$
0
0
मुंबई रेल्वे प्रवासातील ही गोष्ट. मी आणि माझी मुलगी घाटात कॉफीचे कप खिडकीतून खाली टाकणार होतो, इतक्यात समोरच बसलेल्या टिनएजर मुलीनं मला खुणेनंच अडवलं आणि काहीही न बोलता एका प्लास्टिक पिशवीत आम्हाला ते टाकायला लावले.

आमचा ग्रुप मेंबर कट्टा..

$
0
0
‘कट्टा’....! नुसता शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर कॉलेजची रंगीबेरंगी दुनिया दिसते. कॉलेजियन्सचा जीव की प्राण म्हणजे कट्टा. पूर्वी ‘कट्टा’ म्हटलं की मुलांचेच घोळके दिसायचे, मुली क्वचितच.

‘रसिक घडवायचे आहेत’

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘व्हायोलिन अकादमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ जानेवारीदरम्यान ‘स्वरझंकार संगीत महोत्सवा’चं आयोजन करण्यात आलंय.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images