Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विचार, भावना, वर्तनातून मनाची निर्मिती

$
0
0
विचार, भावना, वर्तनातून मनाची निर्मिती होते. जसे विचार तशा भावना, जशी भावना तसे वर्तन, ही मनाची साखळी आहे. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास सुखाने जगता येते, असे प्रतिपादन प्रसिध्द लेखिका प्रा. डॉ. विजया फडणीस यांनी व्यक्त केले.

बालनाट्य स्पर्धा

$
0
0
येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे साने गुरूजी कथमालेअंतर्गत येत्या ११ व १२ जानेवारीला कै. रत्नाकर गुजराती स्मृती बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अन् शिक्षकाने ठोकली धूम

$
0
0
शहरात अनेक ठिकाणी खेळाच्या स्पर्धा सुरू आहेत. त्यासाठी जिल्हाभरातून तर काही स्पर्धांसाठी महाराष्ट्रातून खेळाडू सहभागी झाले आहेत. एखाद्या संघटनेसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची पहिलीच वेळ असेल तर त्यातून अनेक गमतीजमती घडतात.

अंतरात अडकली ‘बिटको’ची पोलिस चौकी

$
0
0
नाशिकरोड येथील जेडीसी बिटको हॉस्पिटल परिसरात पोलिस चौकी सुरू करण्यास अंतराचा मुद्दा अडचणीचा ठरत आहे. ना​शिकरोड पोलिस स्टेशनपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या बिटको हॉस्पिटलमध्ये कमी अंतरामुळे पोलिस चौकी सुरू झालेली नाही.

‘अडचणीचे’ रस्ता रूंदीकरण

$
0
0
उंटवाडी चौकातील रस्त्याचे रूंदीकरणाचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र, रूंदीकरण करताना नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.

चिकन प्रोसेस क्लस्टर निर्मितीसाठी प्रयत्न

$
0
0
कळवण तालुक्यासह जिल्ह्यातील पशू व कुक्कुट खाद्य उद्योग क्षेत्राशी सबंधित उद्योग समूहाच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या साहाय्याने उद्योग समूह (क्लस्टर ) निर्मितीसाठी नाशिक जिल्हा उद्योग व निर्यातदार संघटनेची बैठक नुकतीच झाली.

दोघा तरुणांच्या मृत्यूचे गुढ उकलले

$
0
0
बागलाण तालुंक्यातील मानूर येथील मासेमारीसाठी गेलेल्या दोघा तरुणांच्या मृत्यूचे गुढ उकलण्यात पोलिसांना दोनच दिवसात यश आले आहे. या दोन तरुणांनी चौघांना मासेमारीसाठी मज्जाव केल्याने त्यांना जाळयात गुंडाळून तलावात बुडवून ठार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

३ वर्षांपासून रखडली पाणीपुरवठा योजना

$
0
0
कळवण तालुक्यातील भगुर्डी, दत्तनगर ग्रुप ग्रामपंचायतीच्या दत्तनगर येथील राष्ट्रीय पेयजल अंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या तीन वर्षापासून रखडली आहे.

बी-१, बी-२ ज‌मिनीची डोकेदुखी झाली कमी

$
0
0
सत्ताप्रकार बी-१, बी-२ याबाबतीत जमीन मालक विक्रीदार व जमीन खरेदीदार यांच्या डोक्याला कायम असणारी डोकेदुखी आता कमी होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

$
0
0
सटाणा नगर पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन तदअनुषंगिक लाभ व प्रलंबित रकमा अदा करण्यासंदर्भात पालिकेची भूमिका सकारात्मक असून त्या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव देखील पाठविण्यता आला आहे.

मणप्पुरमच्या आरोपींना १३ दिवस कोठडी

$
0
0
नाशिकरोड परिसरातील बहुचर्चित मणप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीवर दरोडा टाकणाऱ्या आरोपींना बुधवारी नाशिकरोड कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना १३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोदींसाठी सोमबाबूंचे लॉबिंग

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचारासह स्वतःचे ब्रँडिंग करण्यात व्यस्त असताना प्रचार मोहिमेत त्यांच्या कुटुंबियांनीही उडी घेतली आहे.

सायखेडा रस्त्याच्या भूमिपूजनाबाबत संभ्रम

$
0
0
जेलरोड येथील प्रभाग ३२ ‘अ’मधील टाकळीरोड ते सायखेडाशिव रस्त्याचे दुपदरीकरण आणि पुलाच्या कामाचे भूमिपूजन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगरसेवक शैलेश ढगे यांच्या हस्ते आज, गुरुवारी होणार आहे.

भूकंपाबाबत जिल्हा प्रशासनाचा हलगर्जीपणा

$
0
0
कळवण तालुक्यातील बोरदैवतसह परिसरात होत असलेल्या भूकंपाबाबत जिल्हा प्रशासनाने अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचे दिसून येत आहे. नवी दिल्ली हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी अहवाल दिल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने या ठिकाणचे रहिवासी भयग्रस्त आहेत.

पाणी-वीज दरवाढीवर ‘आप’चे लक्ष्य

$
0
0
‘आम आदमी पार्टी’चे(आप) अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर स्वार झाल्यानंतर दिल्लीकरांना मोफत पाणी देण्याची घोषणा केली. प्रती कुटुंब सातशे लिटर मोफत पाणी देण्याच्या या योजनेचे देशभरातून स्वागत झाल्याने ‘आप’तर्फे इतर शहरातील पाणी तसेच वीजदरांचा अभ्यास केला जातो आहे.

‘नामको’ संचालकांचे RBI ला आव्हान

$
0
0
नाशिक मर्चण्ट को ऑप बँकेची (नामको) आर्थिक परिस्थिती सर्वोत्तम असतानाही रिझर्व्ह बँकेने प्रशासकाची नेमणूक करून ठेवीदारांना संभ्रमित केले आहे.

'टीम शून्य' वाजविणार फ्रान्समध्ये डंका!

$
0
0
ज्ञानवंत आणि प्रतिष्ठितांसाठी अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या फ्रान्समधील यंदाच्या सोलर डॅकथलॉनमध्ये मुंबई आयआयटी आणि अॅकॅडमी ऑफ आर्किटेक्चरच्या ‘टीम शून्य’चा डंका वाजणार आहे. ही टीम जगातील आदर्श सौरगृह साकारणार असून, पवईतील आयआयटीच्या कॅम्पसमध्ये त्याची लगबग सुरू झाली आहे.

मेडिकल पी.जी. इन्स्टिट्यूटचा मार्ग मोकळा

$
0
0
येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नाश‌िकमध्ये मेडिकल पी.जी. इन्स्टिट्युट सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहे‌त.

पदव्युत्तर संस्था सुरू होणार

$
0
0
महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम कराराच्या घोळातून कधी बाहेर पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डॉ. राजेंद्र सिंग आणि राज एकत्र येणार?

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असून ते ८ ते ११ जानेवारी या कालावधीत विविध कामांचे भूमिपूजन करण्यासह पक्षीय पातळीवरील घडामोडींचा आढावा घेणार आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images