Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रेडीरेकनरचा फैसला आज

$
0
0
रेडीरेकनरचे दर अवास्तव वाढविण्यात आल्याची ओरड झाल्यानंतर अखेर राज्याचे नोंदणी महानिरीक्षक सेतूराम चोक्कलिंगम यांच्याकडे गुरुवारी पुण्यात बैठक होत आहे. बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईचे विविध शहरातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

२ दिवसांत ३२ लाखांची वसुली

$
0
0
महापालिका बाजार संकुलांमधील थकबाकीधारकाविरोधात प्रशासनाने उघडलेल्या मोहिमेअंतगंत दुसऱ्या दिवशी सात गाळ्यांना सील ठोकत विविध कर विभागातील अधिकाऱ्यांनी १५ लाख ५४ हजार ७२ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली.

उड्डाणपुलाखाली मुरतेय पाणी!

$
0
0
केवळ सहा महिन्यांपूर्वी खुला करण्यात आलेल्या लांबीच्या दृष्टीने राज्यात दुसरा क्रमांक लागणाऱ्या पांडुरंग गायकवाड चौक ते के. के. वाघ कॉलेजपर्यंतच्या उड्डाणपुलामागचे शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. रॅम्प दुरुस्ती, अॅक्सेस सुविधेसाठी वेळोवेळी विविध दुरुस्ती काम करण्यात येणाऱ्या या पुलाला आडगाव नाक्याजवळ नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

विमानसेवेसाठी पहिला खेळाडू तयार

$
0
0
ओझर येथील पॅसेंजर टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात असतानाच एका विमान कंपनीने नाशिकमधून विमान सेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. राज्य सरकारकडून परवानगी मिळताच ही कंपनी सेवा देण्यास तत्पर असल्याने या कंपनीच्या निमित्ताने नाशकात विमानसेवेसाठी पहिला खेळाडू मिळाला आहे.

आज ठरणार मनसेचे मिशन लोकसभा

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीतील पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज, गुरुवारी होणाऱ्या मनसेच्या राज्यस्तरीय बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मेडिकलच्या ४८ जागा वाढणार

$
0
0
येथील विभागीयप संदर्भ सेवा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नाश‌िकमध्ये पी.जी. इन्स्टिट्युट सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी त्वरीत परवानगी देण्यात येईल, अशी माह‌िती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

राज ठाकरेंनी मोदींना सुनावले!

$
0
0
‘पंतप्रधान हा देशाचा असावा, राज्याचा असू नये. त्याला सर्व राज्ये समान वाटली पाहिजेत. मोदींनी याचा विचार करायला हवा,’ असे सुनावतानाच, ‘पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता,’ असे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले उत्तम साहित्यिक

$
0
0
सावित्रीबाई फुले यांच्या साहित्यावर महात्मा फुले यांच्या साहित्याचा प्रभाव होता. सावित्रीबाई, शिक्षिकेबरोबरच उत्तम साहित्यिकही होत्या, असे प्रतिपादन प्रा. गंगाधर आहिरे यांनी केले. सावित्रीबाई फुलेजयंतीनिमित्त जेलरोडच्या मातृभूमी प्रबोधन समितीततर्फे कर्तबगार महिलांचा तसेच आदर्श शिक्षिकांचा सावित्रीबाई पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

मीटर डाऊन!

$
0
0
एखादी नवीन व्यक्ती शहरात आली की रिक्षावाल्यांचे चलती असते. अवाच्या सवा भाडं आकारून ते प्रवाशांना पुरते हैराण करतात. पण या रिक्षावाल्यांनाही एखाद्यावेळी धडा मिळतोच. शहरात सुरू असलेल्या नाशिक फेस्टीव्हलमध्ये एक रिक्षावाला काहीतरी शोधत फिरत होता. त्याच्याकडे दोन-तीन जणांनी काय हवं आहे, अशी विचारणाही केली.

फेस्टिव्हलचे द‌िमाखदार उद्‌घाटन

$
0
0
खवय्यांसाठी पर्वणी असलेल्या फूड फेस्टिव्हलचे गुरुवारी द‌िमाखदार उद्टन झाले. डोंगरे वसतिगृह मैदानावर मान्यवरांच्या हस्ते रंगबेरंगी फुगे हवेत सोडून फेस्टीव्हलचे उद्‌घाटन करण्यात आले. यानंतर शास्त्रीय नृत्य आण‌ि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाने पह‌िल्या द‌िवशी वातावरणात रंगत भरली.

इथे सन्मान ही भाग्याची गोष्ट

$
0
0
नाशिक हे साहित्याचे तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्रात माझा सत्कार होतो आहे, हा माझ्या आयुष्यातला भाग्याचा क्षण आहे, असे प्रतिपादन ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी केले.

राजीव गांधी भवनाला भेट

$
0
0
सुसंस्कृत समाजात सक्षमपणे जगण्यासाठी नागरिकांद्वारे शासकीय प्रणालीचा विकास होणे आवश्यक आहे. या मुख्य संकल्पनेला अनुसरून रासबिहारी स्कूलच्या पाचवीच्या मुलांची नाशिक महानगरपालिकेची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी राजीव गांधी भवनला भेट दिली.

कॅप्रिहन्स कामगार संप सुरूच

$
0
0
भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी कॅप्रिहन्समधील कामगार आणि युनियन पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली.

सील गाळ्यांचा लवकरच लिलाव

$
0
0
महापालिका बाजार संकुलांमधील थकबाकीधारकांचे गाळे सील करूनही कर भरण्यास टाळटाळ केली गेल्यास अशा गाळ्याचा सात दिवसांनी लिलाव करण्यात येणार आहे. आजपर्यंत विविध कर विभागांच्या अधिकाऱ्यांनी थकबाकीदार असलेल्या २७ गाळ्यांना सील ठोकले आहे.

नाणेगाव रेल्वेमोरीला डबक्यामुळे धोका

$
0
0
देवळाली कॅम्प केंद्रीय विद्यालयाकडून नाणेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोरीखाली सांडपाण्याचे कायमस्वरुपी तळे झाल्याने रेल्वे अपघाताची शक्यता आहे. इगतपुरी अपघातापासून रेल्वेप्रशासनाने तसेच देवळाली छावणी परिषदेने धडा घेतला नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

गोरेवाडीच्या नागरिकांचा रस्त्यासाठी मोर्चा

$
0
0
गोरेवाडी येथील नागरिकांनी भारत प्रतिनिधी मुद्रणालयातून गोरेवाडीकडे जाणारा ब्रिटीशकालीन रस्ता पूर्ववत सुरू करावा, या मागणीसाठी आज प्रेसवर मोर्चा काढला. मजदूर संघाचे पदाधिकारी माधव लांडगे व अन्य पदाधिका‌री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

शेवटचा दिस गोड जाहला

$
0
0
महापालिका हद्दीत सुरू असलेल्या मोफत अंत्यसंस्कार योजनेपाठोपाठ आता मोफत दफनविधी योजनाही सुरू झाली आहे. मागील वर्षांत या योजनेला स्थायी समितीपाठोपाठ महासभेने हिरवा कंदील दर्शवला होता.

गंगापूररोड विस्तारीकरणाला मुहूर्त कधी?

$
0
0
नाशिक शहरातील सर्वात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गंगापूररोडचे विस्तारीकरणाला नेमका मुहूर्त कधी मिळणार असा सवाल वाहनचालक करत आहेत. रस्त्यासाठी महापालिकेने निधीही मंजूर केला असताना प्रत्यक्षात रस्त्याचे काम कधी करणार या प्रतीक्षेत वाहनचालक आहेत.

लाखलगावला जलशुद्धीकरण प्रकल्प

$
0
0
ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी मोन्सॅन्टो फंड व अॅक्शन फॉर फूड प्रॉडक्शन (अॅफ्प्रो) यांच्या संयुक्त विद्यमाने लाखलगाव येथे जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

होंडाची नवीन फोर्थ जनरेशन सिटी कार दाखल

$
0
0
प्रीमियम कार उत्पादकांमध्ये भारतात अग्रगण्य असणाऱ्या होंडा कार्स इंडिया लि.ची नवीन फोर्थ जनरेशन होंडा सिटी कारचे नाशिक शहरात नुकतेच होंडा कंपनीचे प्रमुख योशियुकी मॅटत्सुमोटो यांच्या हस्ते प्रथम ग्राहकांना कारची चावी देऊन लाँचिंग करण्यात आले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images