Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दारोदारी

$
0
0
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महापालिकेच्या बी. डी. भालेकर शाळेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी आणि हे विद्यालय कायमस्वरूपी सुरू राहण्याच्या दृष्टिकोनातून शाळेच्या शिक्षकांनी परिसरातील घरांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची शोध मोहिम हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी भालेकर हायस्कूल मागील वर्षांपासून बंद आहे.

वीरप्पा मोईलींना 'क्रेडाई'तर्फे साकडे

$
0
0
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील आठशेहून अधिक बांधकाम प्रकल्प रखडले असून यात नाशिकमधील पंचवीस मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांना मुदतीत घरे मिळालेली नाहीत शिवाय गृहकर्जाच्या हप्त्याचा भुर्दंड सोसावा लागत असल्याची तक्रार घेऊन क्रेडाई नाशिकच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पर्यावरणमंत्री वीरप्पा मोर्इली यांची भेट घेतली.

किमान तपमानात लक्षणीय बदल

$
0
0
गेल्या काही दिवसात नाशिकच्या किमान तपमानात लक्षणीय बदल झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे नाशिककर थंडीचा अनुभव घेण्याऐवजी आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जात आहेत. उत्तरेत थंडीची लाट आल्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे.

मतदान यंत्र तयार ठेवा

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीच्या लगबगीला सुरुवात झाली असून या निवडणुकीसाठी मतदान यंत्र सज्ज ठेवण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार नाशकात येत्या १६ जानेवारीपासून या यंत्रांच्या सज्जतेची मोहीम सुरू होणार आहे.

जिल्ह्यात ३९ लाख जणांना अन्नसुरक्षा

$
0
0
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबाजवणी येत्या २६ जानेवारीपासून करण्याचे राज्य सरकारने निश्चित केल्याने जिल्ह्यातील जवळपास ३९ लाख जणांना त्याचा लाभ मिळणार आहे.

रेडीरेकनरबाबत आज बैठक

$
0
0
रेडीरेकनरमध्ये अवास्तव वाढ झाल्याप्रश्नी नोंदणी महानिरीक्षकांकडे गुरुवारी बैठक झाल्यानंतर महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज, शुक्रवारी पुन्हा पुण्यात बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

वर्षभर गंगा मैलीच

$
0
0
शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनच्या क्षमतेपेक्षा जास्त सांडपाणी वाहून जात असल्याने ठिकाठिकाणी ओव्हर फ्लो होऊन सांडपाणी थेट नदीपात्रात जात आहे. नदीपात्रात मिसळणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण वाढले असून पंपिंग स्टेशन तसेच गंगापूर गावातील सिव्हेज ट्रिटमेंट प्लांट पूर्ण होईपर्यंत ही परिस्थिती कायम राहणार आहे.

‘बीआरटीएस’ राबवणार कशी?

$
0
0
महापालिका आयुक्तांसह अधिकारी वर्ग गुजरातच्या धर्तीवर नाशिकमध्ये ‘बीआरटीएस’ (बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम) राबविण्यासाठी आग्रही असताना नाशिकमध्ये तसे रस्तेच नसल्याचे सांगत बीआरटीएस राबवणार कशी, असा प्रश्न उपस्थित करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयुक्तांच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला आहे.

चिमुकले बसले उपोषणाला

$
0
0
पाचोरा परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. शहरातील आशीर्वाद ड्रिम सिटीमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरी तक्रार देण्यासाठी नगरसेवक किशोर बारावकर यांनी पोलिस स्थानक गाठले. मात्र त्यांची तक्रार घेण्याऐवजी तुमच्या मालमत्तेची तुम्हीच काळजी घ्या, असा सला प्रशासनामार्फत देण्यात आला.

त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्याचे काम महिन्याभरात

$
0
0
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या गाभाऱ्यातील फरशी बदलण्याच्या प्रश्नावरुन निर्माण झालेल्या वादानंतर अखेर हे काम येत्या महिन्याभरात होण्याची शक्यता आहे. याठिकाणी अर्धा इंच जाडीची फरशी बसविली जाणार आहे.

लासलगावजवळ दरोडेखोरांचा धूमाकूळ

$
0
0
लासलगाव शहराजवळील निमगाव- वाकडा येथील पोटे वस्तीतील मजुरांच्या घरावर बुधवारी रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे २४ हजार रुपयांचा ऐवज लुटत घरातील तिघांना मारहाण करीत पोबारा केला आहे. दरोडेखोरांनी आणखी तीन ठिकाणी घरे फोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.

खासदारांचा भयभीत नागरिकांना दिलासा

$
0
0
कळवणसह सुरगाणा, देवळा, बागलाण तालुक्यात दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७.२१ दरम्यान बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांची खासदार हरिश्चंद्र चव्हाण, सहाय्यक जिल्हाधिकारी आस्तिक पांडेय, तहसीलदार अनिल पुरे यांनी भेट घेवून दिलासा दिला.

तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन होणार

$
0
0
विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तंत्रशिक्षण मिळावे आणि तंत्रशिक्षण देणाऱ्या कॉलेजांमध्ये समन्वय, सुसूत्रता रहावी यासाठी तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला.

शिंगाडा भागात सामूहिक आत्महत्या

$
0
0
शिंगाडा तलाव परिसरातील अपूर्वा सोसायटीत राहणाऱ्या काळे कुटुंबियांपैकी असलेल्या तिघांनी सामुहिक आत्महत्त्या केल्याची घटना गुरुवारी उजेडात आली.

सध्या तरी एकला चलो रे

$
0
0
लोकसभा निवडणुकीत 'फुल्ल अँड फायनल' तयारीनिशी उतरताना 'एकला चलो रे'ची भूमिका योग्य असल्याचा सूर मनसे पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.

सिंगल स्क्रीनचे जीवदान संकटात!

$
0
0
सिंगल स्क्रीन चित्रपटगृह चालकांच्या या व्यवसायाने तग धरावा यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. मात्र जाचक अटींमुळे करमणूक कर माफीची योजना बासनात गुंडाळली जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

ओझर विमानतळासाठी ८४ कोटी

$
0
0
नाशिक शहराजवळील ओझर येथे प्रगतीपथावर असलेल्या पॅसेंजर टर्मिनलसह तेथील सुरक्षा व्यवस्थेसाठी एकूण ८४.५४ कोटी रुपयांच्या निधीला राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकार आणि हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. (एचएएल) यांच्यात नव्याने सामंजस्य करार होणार आहे.

चार शिक्षण संस्थांची मान्यता रद्द

$
0
0
वैद्यकीय श‌िक्षणासाठी लागणाऱ्या मुलभूत सुव‌िधांची पूर्तता न करू शकणाऱ्या राज्यातील चार वैद्यकीय श‌िक्षण संस्थांची मान्यता महाराष्ट्र आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाने रद्द केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या संस्थांमध्ये नाश‌िकच्याही नर्सिंग कॉलेजचा यात समावेश आहे.

मोदींवर बरसले राज

$
0
0
‘पंतप्रधान हा देशाचा असतो, कुठल्या एका राज्याचा नाही. त्यामुळे ज्या दिवशी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाली; त्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता’, या शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी नरेंद्र मोदी यांच्यावर बरसले.

भाजपही मनसेला भिडला!

$
0
0
नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून अंगावर येणाऱ्या मनसेला भाजपनेही शिंगावर घेतले आहे. नाशिक महापालिकेतील मैत्री विसरून भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावर बहिष्कार टाकला आहे. राज यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images