Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

$
0
0
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात पुकारलेला बेमुदत संप गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरू होता. त्यामुळे बागलाण तालुक्यातील साडेचारशेहून अधिक अंगणवाड्या चार दिवसांपासून बंदच आहेत.

रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी

$
0
0
सटाणा शहरातील ट्रॉमा केअर सेंटर आणि ग्रामीण हॉस्पिटलमधील मेडिकल ऑफिसरांच्या रिक्तपदांमुळे पेशन्ट्सची हेळसांड होत असल्याने शहर शिवसेना आक्रमक झाली आहे. शुक्रवारी संतप्त शिवसैनिकांनी तब्बल तीन तास कुलूप लावत हॉस्पिटल कामकाज बंद पाडले.

'विद्यार्थी राष्ट्रवादी'त बदलाचे संकेत

$
0
0
शहराध्यक्ष बदलाच्या मागणीवरून 'राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस'च्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामा प्रकरण शिगेला पोहोचले आहे. सर्व पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी आलेल्या निरीक्षकांसमोरही नाराज पदाधिकारी शहराध्यक्ष हटावसह राजीनामा मागे न घेण्यावर ठाम राहिल्याने वाद चिघळला आहे.

टेलिकॉम सेवेबाबत ग्राहकक्षोभ

$
0
0
भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणाने बोलविलेल्या बैठकीत ग्राहक संघटनांसह ग्राहकांनी तक्रारींचा पाऊस पडल्याने टेलिकॉम आणि केबल सेवेबाबत ग्राहक प्रचंड असमाधानी असल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रेसच्या निवडणुकीचे रणशिंग

$
0
0
आयएसपी-सीएनपी वर्क्स कमिटीच्या निवडणुकीसाठी आपला पॅनेल व कामगार पॅनेलचे उमेदवार आज जाहीर करण्यात आले. आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. रामभाऊ जगताप प्रणित आपला पॅनल आणि ज्ञानेश्वर जुंद्रेप्रणित कामगार पॅनल यांच्यात थेट लढत रंगणार आहे.

५१ टक्क्यात अडकले जलशुध्दीकरण

$
0
0
निलगिरी बाग येथील प्रस्तावित जलशुध्दीकरण केंद्राच्या कामासाठी ठेकेदाराने प्राकलन दरापेक्षा(इस्टिमेट) ५१ टक्के अधिक दराने निविदा सादर केल्याने प्रशासनाने नव्याने टेंडर मागवण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅप्रिहन्स कंपनीतील संप मिटला

$
0
0
औद्योगिक वसाहतीत गेल्या २४ दिवसांपासून चर्चेत असलेल्या कॅप्रिहन्स कंपनीतील कामगारांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. कंपनीत भारतीय कामगार सेनेचीच संघटना कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

ग्राहकांचा हल्लाबोल

$
0
0
भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणाने (ट्राय) विविध नियमांची माहिती देण्यासाठी बोलवलेल्या बैठकीत ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींनी ट्रायसह सर्व टेलिकॉम कंपन्यांवर शुक्रवारी हल्लाबोल केला.

किसन, दुर्गाला सुवर्णपदक

$
0
0
रांची येथे सुरू असलेल्या नॅशनल इंटरस्कूल स्पर्धेत नाशिकच्या धावपटू किसन तडवीने शुक्रवारी दुसऱ्या सुवर्णपदकावर आपली मोहर उमटवली. धावपटू दुर्गा देवरे हिनेसुद्धा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावले.

रॉँग नंबर

$
0
0
आजकाल माहितीचा विस्फोट झाल्याची चर्चा सर्वत्र होत असते. कारण, मोबाईलसारख्या यंत्रामुळे क्षणाक्षणाला माहिती मिळत राहते किंवा दिली जाते. नाशिकमध्येही पत्रकारांना माहिती कळविण्यासाठी एक ग्रुप तयार करण्यात आला आहे.

...अन् कविता माऊलीही होते

$
0
0
ज्येष्ठ कवी फ. मुं. च्या कवितेच्या ओळी प्रस‌िध्द कवी अरूण म्हात्रेंच्या गंभीर आवाजातून श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेत होत्या. न‌िम‌ित्त होते कवी सुधाकर कुलकर्णी यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचे.

मनसेचे सत्तासन डळमळीत?

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकीकडे नाशिक महापालिकेतील पाठिंबा काढण्याची भाषा सुरू केली आहे.

नाशिकरोडचे विद्यार्थी करणार आता ऑनलाइन अभ्यास!

$
0
0
नाशिकरोडचे विद्यार्थी आता ऑनलाइन अभ्यास करताना दिसणार आहेत. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन गंधर्वनगरीत जिल्ह्यातील पहिली ई-अभ्यासिका उभी राहिली असून ती लवकरच खुली होणार आहे. या अभ्यासिकेबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालयसुद्धा उपलब्ध होणार आहे.

महिलेच्या खुनाचे गूढ उकलेना

$
0
0
कॉलेजरोड येथील उच्चभ्रू सोसायटीतील महिलेच्या खुनाचे गूढ उकलणे पोलिसांपुढे आव्हान ठरत आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशीदेखील तपासात पोलिसांच्या हाती काही लागलेले नाही. विवाह‌ितेला संपविण्याच्या उद्देशानेच तिच्यावर बंदुकीच्या तीन गोळ्या झाडण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

एसटी झाली ‘स्मार्ट’

$
0
0
कालानुरूप स्मार्ट बनू पाहणाऱ्या एसटीने आता प्रवासी आणि पासधारक विद्यार्थ्यांसाठी स्मार्टकार्ड आणले आहे. मासिक, त्रैमासिक पासधारक तसेच आवडेल तेथे प्रवास योजनेचे लाभार्थी यांना आता पासऐवजी स्मार्टकार्डच दिले जाणार असून या उपक्रमाचा श्रीगणेशा शनिवारी ठक्कर बाजार येथे करण्यात आला.

वीर सावरकरांना रांगोळीतून आदरांजली

$
0
0
देवळाली महोत्सवात शनिवारी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर कृष्णा लोखंडे, संदीप गायकवाड आणि विशाल शिरसाठ यांनी काढलेल्या कलात्मक रांगोळीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सुभाष हायस्कूलमध्ये झालेल्या रांगोळी स्पर्धेत सव्वादोनशे स्पर्धकांनी भाग घेतला. त्यामध्ये सव्वाशे विद्यार्थी पाचवी ते सातवीच्या गटातील होते.

मोकळ्या भूखंडांवर डेब्रिजचे साम्राज्य

$
0
0
नाशिकचा विस्तार झपाट्याने होत असला तरी महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले जात आहे. सातपूर भागात तर हा प्रश्न ऐरणीवर आहे. डेब्रिज व इतर कचऱ्यामुळे परिसराचे विदृपीकरण तर झालेच आहे, शिवाय नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

रेडीरेकनरचे दर कमी कराच

$
0
0
राज्य सरकारने रेडीरेकनरचे वाढलेले दर कमी न करता केवळ मार्गदर्शक सूचनांना स्थगितीच्या निर्णयाविरोधात सर्वसामान्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, रेडीरेकनरचे दर कमी करण्यातच यावे, अशी आग्रही मागणी सर्वसामान्यांसह ग्राहक पंचायतीनेही केली आहे.

मुक्त शिक्षण ठरले कामगारांसाठी प्रेरणादायी

$
0
0
भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात वस्त्रोद्योग नेहमीच आघाडीवर राहिला आहे. वर्षानुवर्षे यंत्रमागावर काम करणारे कामगार मात्र स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतरही शिक्षणापासून वंचित राहिले आहेत, ही खेदाची बाब आहे.

प्राथमिक मुख्याध्यापक महासंघाचे अधिवेशन आज

$
0
0
महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथम‌िक मुख्याध्यापक महासंघाचे एक द‌िवसीय राज्यस्तरीय अध‌िवेशन आज (द‌ि.१२) रोजी महाकवी काल‌िदास कलामंद‌िरात आयोज‌ित करण्यात आले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images