Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पत्नीच्या खूनप्रकरणी जन्मठेप

$
0
0
स्वतःच्या मुलीवर औषधोपचारासाठी लागणाऱ्या खर्चाच्या वादावरून पत्नीचा खून करून विहिरीत फेकून दिल्याप्रकरणी बागलाण तालुक्यातील मोराणे येथील एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मालेगाव सेशन कोर्टचे न्यायमूर्ती के. जी. राठी यांनी ही शिक्षा ठोठावली.

चित्रांच्या दुनियेतून समाजकार्याचा वसा

$
0
0
सामाजिक प्रबोधन घडावे म्हणून समाजात अनेक संस्था कार्यरत असतात. समाजातील ज्वलंत समस्या अधोरेखित करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न अशा संस्था करत असतात. सामाजिक क्षेत्रात नावलौकीक असलेल्या अशाच एका संस्थेच्या कार्याचा आढावा ऑईल पेंटींग्जच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

मान्यवरांची फजिती !

$
0
0
काहीसे वेंधळे अन् काहीशा उतावळ्या लोकांमुळे सार्वजन‌िक ठ‌िकाणी अनेक गमती-जमती घडत असतात. एका सांस्कृतिक हॉलमध्ये एका पुस्तकाचा प्रकाश सोहळाही नुकताच पार पडला.

आरोग्य विद्यापीठात कामबंद आंदोलन

$
0
0
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील दैनंदिन वेतनावरील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारी कामबंद आंदोलन पुकारले. जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांना निवेदन दिले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.

गंगापूर धरणाची सुरक्षा रामभरोसे!

$
0
0
शहराला पिण्याचे पाणी पुर‌विणाऱ्या गंगापूर धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धरणावर कुणाही नागरिकांना प्रवेश नसल्याचे कर्मचारी सांगतात. परंतु धरणाच्या बॅक वॉटरजवळ तरुणाईचा राजरोस ‌धिंगाणा सुरू असल्याचे पहावयास ‌मिळत आहे.

कुंभमेळ्यापूर्वी उजळणार सातपूर बसस्थानकाचे भाग्य

$
0
0
सातपूर बसस्थानकाचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा वनवास आता संपणार असून येत्या कुंभमेळ्यापूर्वी बसस्थानकाचे भाग्य खुलणार आहे. सरकारच्या विशेष निधीतून आमदार नितीन भोसले यांनी तब्बल एक कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी या स्थानकासाठी मंजूर केला असून लवकरच काम सुरू होणार आहे.

...हा तर सुप्रीम कोर्टाचा अपमान

$
0
0
डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये काम करण्यास पोषक वातावरण नसल्यास त्याचा परिणाम कामावर होतो. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना पूरक वातावरण ठेवण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने प्रशासनावर टाकली आहे.

काँक्रिटीकरण धोकादायक

$
0
0
सध्या, गोदावरी नदीच्या उगमावरच काँक्र‌िटीकरणाचे जाळे तयार झाले असून त्यामुळे गतिमान पाण्याच्या प्रवाहाला बेक्र लागत आहे. परिणामी भविष्यात उत्तराखंडप्रमाणेच नाशिकलाही धोका पोहोचू शकतो, असा इशारा प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी सोमवारी दिला.

नाशिक महापालिकेचे इंजिनीअरिंग चुकले

$
0
0
महापालिकेचे इंजिनीअरिंग चुकल्याने भुयारी गटार योजनेचे पाइपलाइन फुटून पाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. ठेकेदारांच्या मोहापायी असे प्रकार घडतात. परंतु यात सुधारणा करण्यास खूप वाव आहे.

नद्या स्वच्छ ठेवणाऱ्यांनाच निवडून द्यावे

$
0
0
पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणाऱ्यांना तसेच नद्या स्वच्छ करणाऱ्यांनाच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यावे. नद्यांचे नकाशे तयार करावेत, खेळाचा वेळ गोदावरी स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी केले.

महापौर वाघ यांच्याकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

$
0
0
शहरातील डिव्हायडरची परिस्थिती सुधारणे, डेब्रिचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवणे तसेच शहरात स्वच्छता ठेवणे आदी बाबींवरून महापौर अॅड. यतीन वाघ यांनी विभागीय अधिकाऱ्यांची सोमवारी झाडाझडती घेतली. राज ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून महापौरांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती हे विशेष!

१ फेब्रुवारीला उपसंचालक कार्यालयावर मोर्चा

$
0
0
श‌िक्षकांच्या व‌िव‌िध प्रलंब‌ित मागण्यांसाठी उपसंचालक कार्यालयावर १ फेब्रुवारीला श‌िक्षक सेनेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. रव‌िवारी श‌िवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या श‌िक्षक सेनेच्या बैठकीत हा न‌िर्णय घेण्यात आला.

विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा

$
0
0
अल्पवयीन मुलींना बोलावून मोबाइलमधील अश्लिल चित्रफित दाखविल्याच्या आरोपावरून उपनगर पोलिसांनी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. विनोद गाडेकर (२५, रा. राजराजेश्वरी मंगल कार्यालय परिसर, जेलरोड) हा तरुण गेल्या काही दिवसांपासून सायखेडा रोड परिसरात लहान मुलींना बोलावून अश्लील चित्रफित दाखवत असल्याच्या तक्रारी होत्या.

मालेगावने टाकले थंडीत नाशिकला मागे

$
0
0
नाशकातील किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातील सर्वाधिक किमान तपमानाची नोंद मालेगावमध्ये झाली आहे. आगामी काही दिवस तापमानातील हे बदल असेच राहतील, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

मराठा आरक्षणप्रकरणी सरकारकडून फसवणूक

$
0
0
‘राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी निर्माण केलेल्या समितीला वारंवार देण्यात येणारी मुदतवाढ संशयास्पद असून, यामुळे आरक्षणाबाबत राज्य सरकार समाजाची फसवणूक करत आहे’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे.

‘पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कायदा करावा’

$
0
0
पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांनी केली. जिल्ह्यातील पत्रकार व छायाचित्रकारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी प्रेस क्लब ऑफ मीडिया सेंटरने आयोजित केलेले चर्चासत्र नुकतेच पार पडले. या वेळी ही मागणी करण्यात आली.

महापालिकेचे जम्बो स्कॅनिंग

$
0
0
आपल्याकडील सर्व कागदपत्रांचे अत्याधुनिक पद्धतीने जतन करण्यासाठी नाशिक महापालिकेने कंबर कसली असून फेब्रुवारीअखेरीस तब्बल एक कोटी​ कागदपत्रांचे स्कॅनिंग महापालिका पूर्ण करणार आहे.

परवान्यांसाठी FDA ‘आपल्या दारी’

$
0
0
भाजीपाला विक्रेत्यांपासून मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच नोंदणी किंवा परवाना देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘आपल्या दारी’ ही मोहीम सुरू केली आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये या मोहिमेसाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

धोकादायक वीजखांबांना कलरकोड

$
0
0
निष्काळजीपणामुळे होणाऱ्या वीज अपघातांना आळा बसावा, यासाठी डबल सप्लाय असणाऱ्या खाबांना महावितरण कलर कोडिंग करणार आहे. यामुळे नागरिकांना व खांबांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळीच धोक्याची सूचना मिळून होणाऱ्या संभाव्य अपघातात घट होणार आहे.

काँग्रेस भवनावर घरपट्टीचे ‘ओझे’!

$
0
0
देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या आणि नाशकात एका आमदारासह १६ नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाचे कार्यालय मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून कर बुडवेगिरी करीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images