Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लाखभर कागदांचे स्कॅनिंग पूर्ण

0
0
जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून गेल्या १५ दिवसात एक लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण करण्यात आले आहे. येत्या मार्चपर्यंत ही मोहीम सुरू राहण्याची शक्यता आहे.

आणखी ६ दरोडेखोरांना अटक

0
0
अंबड आणि आडगावात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चालल्याच्या संशयावरून अंबड पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. जीवन तुकाराम धनगर (२४, रा. कामठवाडे), सुनिल अप्पा जाधव (२१) आणि सुनिल लक्ष्मण पाटील (२०, दोघेही. रा. सातपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वाइन पर्यटनासाठी अखेर सल्लागार समिती

0
0
नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात मोठी क्षमता असलेल्या वाइन पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) अखेर सल्लागार समितीची स्थापना केली आहे.

आदिवासी महिलेवर बलात्कार

0
0
संक्रांतीचा गोड सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असतानाच एका आदिवासी मजूर महिलेवर संक्रांतीच्या दिवशीच बलात्कार करण्यात आल्याची कटू घटना निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे उघडकीस आली आहे. लासलगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सटाण्यात कांद्याला १,१७५ चा भाव

0
0
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी कांद्याला सरासरी १,१७५ रुपयांचा बाजारभाव मिळाला. आवक पाच ते साडेपाच हजार क्विंटल होती. तालुक्यात रांगडी कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे. परंतु, रोगराईमुळे उत्पन्नात घट झाली आहे.

नांदगावला १५ दिवसाआड पाणी

0
0
मनमाड शहरापाठोपाठ आता नांदगाव शहरालाही पाणी समस्येने ग्रासले आहे. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या बारा ते पंधरा दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिक व विशेषतः महिला वर्गात कमालीची नाराजी आहे.

शताब्दी एक्सप्रेसने ३ प्रवाशांना चिरडले

0
0
इगतपुरी तालुक्यातील अस्वली रेल्वे स्टेशनजवळ शुक्रवारी सकाळी शताब्दी एक्सप्रेसच्या धडकेमुळे रूळावर बसलेला एक प्रवासी ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक असून हे सर्वजण झारखंडचे मजूर असल्याचे समजते.

आरटीओच्या कामाचे ट्रॅकिंग

0
0
आरटीओ कार्यालयातील आपले काम कोणत्या टप्प्यावर आहे, याचे अपडेट्स नागरिकांना आता एसएमएसद्वारे मिळू लागले आहेत. आरटीओ कार्यालय अधिकाधिक टेक्नोसॅव्ही होत असून त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रमांचीही बचत होण्यास मदत होणार आहे.

योजना निराधार

0
0
निराधार व्यक्तींसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून एकूण पाच योजना सुरू असल्या तरी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या शिफारशीविना पाच तालुक्यांच्या समित्यांना अध्यक्षच मिळालेले नाहीत.

खाऊगल्लीत येणार अंशुमनची बुलेट

0
0
कॉमेडीच्या मंचावर धुमाकूळ घालणारा अंशुमन विचारे सध्या खवय्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याची खाउगल्ली बुलेट महाराष्ट्रातल्या सगळ्या टपऱ्यांपासून ते हॉटेल्सच्या किचनमध्ये धावणार आहे.

डिस्को डिस्को...

0
0
नुकत्याच विद्युत महामंडळाच्या जागा निघाल्यामुळे अनेकजण हे फॉर्म भरण्याच्या प्रयत्नात आहेत. पण हे फॉर्म ऑनलाइन असल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडतोय. असाच एक किस्सा परवा घडला.

‘बीवायके’त रंगला हॉरर डे

0
0
एरव्ही व‌िद्यार्थ्यांच्या लगबगीने गजबजणारा ‘बीवायके’चा ग्रीन कॅम्पस शुक्रवारी थरारला तो हॉरर डे ने. जागोजागी जमलेली भूतं अन् मांत्र‌िकांमुळे ‘बीवायके’चा माहोलच काहीवेळ वेगळ्या दुन‌ियेत हरवला होता.

शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर श‌िक्षकांची निदर्शने

0
0
अंशदायी पेन्शन योजनेसारख्या न‌िर्णयामुळे श‌िक्षण व‌िभागाचे धोरणच श‌िक्षकांसाठी जाचक ठरत असल्याच्या न‌िषेधार्थ श‌िक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संतप्त श‌िक्षकांनी न‌िदर्शने केली.

'पाण्याचे ऑडिट महत्वाचे'

0
0
पाण्याचा वापर जपून करणे काळाची गरज आहे. पाण्याची गळती हा ज्वलंत विषय असून ग्रामीण भागासह मोठ्या शहरात यापुढे पाण्याचे ऑडिट करणे आवश्यक असल्याचे मत मुंबई महापालिकेचे सेवानिवृत्त मुख्य इं​जिनीअर मनोहर सोहनी यांनी व्यक्त केले आहे.

कर्मचारी महासंघाचीही आक्रमक भूमिका

0
0
व‌िद्यापीठावर अत‌िरीक्त भार बनणारी अनावश्यक पदेच रद्द करण्यात यावी यासह पदोन्नती आण‌ि इतर मुद्द्यांशी न‌िगडीत मागण्यांसाठी मुक्त व‌िद्यापीठातील कर्मचारी महासंघाने आक्रमक भूम‌िका घेतली आहे. या मागण्यांसाठी सोमवारी कुलसच‌िवांशी कर्मचारी चर्चा करणार आहेत.

‘आर्ट‌िझन टू टेक्नोक्रॅट’ च्या व‌िद्यार्थ्यांना लवकरच मिळणार सर्टिफिकेट

0
0
अकुशल कारागिरांना कुशल बनव‌िण्याच्या उद्दिष्टाने सरकारने आर्ट‌िझन टू टेक्नोक्रॅट या योजनेंतर्गत सुरू केलेल्या अभ्यासक्रमाचे सर्टिफिकेट म‌िळव‌िण्यासाठी व‌िद्यार्थ्यांना तीन वर्षांपासून प्रत‌ीक्षा करावी लागली आहे.

घंटागाडीत सापडले २ बॉम्ब, २७ काडतुसे!

0
0
देवळाली कॅम्प प‌रिसरात एका घंटागाडीत प्लॅस्टिकच्या ‌‌पिशवीमध्ये दोन हातबॉम्ब आणि २७ काडतुसे सापडली. श‌निवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. एक बॉम्ब निकामी करण्यात यश आले; तर दुसरा बॉम्ब निकामी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

आधी भाजपशास‌ित राज्यांत टोलमाफ करा

0
0
‘राज्यात आमचे सरकार आले तर आम्ही टोलमाफी करू’, असे सांगत भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी मुंडेंच्या या घोषणेवर पलटवार करताना महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीनेच टोलसंस्कृती आणल्याचा टोला लगावला.

पेट्रोल, डिझेलच्या टंचाईची शक्यता

0
0
मनमाडजवळील पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कंपनीतील १६० टँकर वाहतूकदारांनी कंपनी प्रशासनाने वाहतूक दर वाढवून न दिल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी रात्रीपासून अचानक संप पुकारला आहे. यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

शाहिरांना विविध सुविधा द्या

0
0
शाहीर लोककलावंतांचे प्रश्न तातडीने सोडवावेत आणि त्यांना विविध सुविधा द्यावात आदी मागण्यांचा ठराव करत जेलरोड येथे शाहीर परिषदेचा शनिवारी समारोप झाला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images