Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पत्नीसह चौघांवर गुन्हा

$
0
0
कल्याण तसेच नाशिक येथील सदनिका नावावर करून द्या, असा तगादा लावून पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून पत्नीसह चौघांवर गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

डाऊन स‌िंड्रोमग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्न करू

$
0
0
डाऊन स‌िंड्रोम या बालकांमध्ये आढळणाऱ्या आजारावर पोल‌िओसारख्या आजारांच्या तुलनेत अत्यंत तोकड्या उपाययोजना सरकारच्या स्तरावर केल्या जातात. नाश‌िक ज‌िल्ह्यासारख्या ठ‌िकाणीही या आजाराने त्रस्त असणाऱ्या च‌िमुरड्यांची संख्या चारशेंच्या घरात आहे.

आरोग्यतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थग‌ित

$
0
0
महाराष्ट्र आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोज एक तासाचा ओव्हरटाइम, व‌िद्यापीठात ये-जा करण्यासाठीची सुव‌िधा उपलब्ध करून देण्यासोबतच काही आश्वासनांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी छेडलेले आंदोलन पाचव्या द‌िवशी स्थग‌ित करण्यात आले.

ज्युन‌िअर कॉलेजचे प्राध्यापक आक्रमक

$
0
0
ज्युन‌िअर कॉलेजमधील प्राध्यापकांना आश्वासन देऊन त्यांची न‌िराशा केल्याच्या न‌िषेधार्थ येत्या सोमवारी राज्यभरात आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनाचा प्राथम‌िक टप्पा म्हणून सोमवारी नाश‌िकमध्येही उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला जाईल.

जनकल्याण रक्तपेढीतही आता नॅट टेस्टेड रक्त

$
0
0
जगातील सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये ‘नॅट’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रक्त तपासणीसाठी उपयोगात आणली जाणारी पध्दत आता नाश‌िकच्या जनकल्याण रक्तपेढीतही राबव‌िण्यात येणार आहे.

रघुनाथ माळीने राखली महाराष्ट्राची शान

$
0
0
कडाक्याच्या थंडीत शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेली चुरस. गोदावरी नदीपात्रात प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी झालेली गर्दी अन् खेळाडूंचा रनिंग, स्विमिंग आणि जलतरणात लागलेला कस हे राष्ट्रीय ट्रायथलॉन व अॅक्वाथॉन स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या खेळाचे वै‌शिष्ट्य ठरले.

अॅन्युअल रिटर्न १ फेब्रुवारीपर्यंत भरा

$
0
0
उद्योजकांनी कंपनी अॅक्ट १९४८ नुसार त्यांचे अॅन्युअल रिटर्न येत्या १ फेब्रुवारीपर्यंत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडे सादर करावे, अशी माहिती उपसंचालक देविदास गोरे यांनी दिली आहे.

मॉलमध्ये गर्दी उसळल्याने रेटारेटी

$
0
0
शहराच्या मध्यवर्ती भागातील मॉल बंद होणार असून तेथे अल्प किमतीत मालाची विक्री सुरू आहे. हा माल खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी उसळत असून मॉलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी शनिवारी अक्षरश: रेटारेटी झाली. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करून तेथे बंदोबस्त वाढवावा लागला.

‘BSNL’ सेवेचा खेळखंडोबा

$
0
0
तुम्ही मोबाईल कंपनीचे बिल अदा केले असताना तसेच तुमचा मोबाईल हँडसेट सुस्थितीत असतानाही मोबाईल स्क्रीनवर 'सिम नॉट अलाऊड' असे नोटिफिकेशन येत असेल तर तुम्ही नक्कीच चक्रावून जाल.

औद्योगिक वसाहतीत झाडांची कत्तल

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील सेवा क्षेत्राच्या भूखंड परिसरातील नागरिकांनी शनिवारी दुपारी काही वृक्षांची कत्तल केली. या वेळी जागरूक नागरिकांनी महापालिकेचा उद्यान विभाग व पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी उद्यान विभागाने कारवाई केली तर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

‘ट्री गार्ड’साठी ३.२५ कोटी

$
0
0
शहरातील हिरवाई टिकविण्यासाठी नाशिक महापालिकेने तीन कोटी २७ लाखाचे ट्री गार्ड(वृक्ष संरक्षक जाळ्या) घेण्यास मंजुरी दिली आहे. शनिवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत आयुक्त संजय खंदारे यांनी या निधीस मंजुरी दिली असून याद्वारे जवळपास १७ हजार ७३७ नवीन ट्री गार्ड खरेदी करण्यात येणार आहेत.

महिलांना मिळणार जलद न्याय

$
0
0
महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे त्वरीत निकाली काढून या महिलांना न्याय देण्यासाठी राज्यात आणखी १४ जिल्ह्यांमध्ये स्पेशल कोर्ट लवकरच सुरू होणार आहेत. सद्यस्थितीत १३ जिल्ह्यांत हे कोर्ट असून प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता या कोर्टांमध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पोहण्यासाठी गेले आणि बुडाले

$
0
0
मित्रांसमवेत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या युवकासह चौघेजण हरसुलजवळ कश्यपी धरणात बुडाले. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. ते चौघेही म्हसरुळ परिसरातील स्नेहनगरमध्ये राहावयास होते. त्यामुळे सायंकाळपासून येथे चिंतचे वातावरण होते.

जाणीव ‘आपबीती’ची

$
0
0
माणसाच्या गैरन‌ियोजनाचा फटका त्याला कधी अन् कोठे बसतो हे आपबीती होते तेव्हाच काहींना समजते. शहरातील एका बसस्थानकात रात्रीच्या वेळी एक नागरिक मोठ्या आशेने बसची वाट बघत बराच वेळ उभा होता. कोणतीही बस आली की त‌िच्यामागे पळत जाऊन बसवरची पाटी वाचावी अन् अस्वस्थता वाढीला लागावी हा प्रकार सातत्याने बघायला म‌िळत होता.

विभागीय आयुक्तपदाचा निर्णय बुधवारी?

$
0
0
नाशिक विभागाचे महसूल आयुक्त रवींद्र जाधव यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त असलेल्या या पदासाठी अद्याप कोणाचीही नेमणूक झाली नसल्याने आयुक्तालयाचा कारभार थंडावला आहे. त्यामुळे कार्यालयातली अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत.

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे केळी वाहतूक महाग

$
0
0
तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था झाल्याने केळी वाहतूक महागली आहे. परिसरात केळीचा व्यापार मोठ्या प्रमाणात असल्याने रावेर, सावदा येथून मोठ्या प्रमाणात ट्रकमध्ये केळी भरून देशभरात पाठविली जाते. रस्त्याची दुरवस्था झाल्याने ट्रकलाही जास्तीचे भाडे मोजावे लागत आहे.

ग्रामीण भागातही लागला श्वानाचा लळा

$
0
0
हौसेला मोल नसते असे म्हटले जाते. शहरात विविध जातीचे श्वान पाळण्याचे फॅड आता ग्रामीण भागातही पोहचले आहे. हौसेपोटी ग्रामीण भागातील नागरिकही आता देश-विदेशी श्वान पाळत आहेत.

भारनियमनाने मनमाडकर त्रस्त

$
0
0
मनमाड शहरात गेल्या काही दिवसांपासून सक्तीचे भारनियमन सुरू आहे. रात्रीच्या भारनियमनामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. या भारनियमनामुळे प्रमुख बाजारपेठेसह बहुतांश शहर अंधारात बुडत असल्याने व्यापारी वर्गामध्ये असंतोष पसरला आहे.

वाहतूकदार, टँकरचालकांचा संप मागे

$
0
0
वाहतूकदर वाढवून मिळावे या मागणीसाठी पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कंपनीतील वाहतूकदार व टँकरचालकांनी शुक्रवारी रात्रीपासून पुकारलेला संप शनिवारी रात्री मागे घेतला.

३ डीपीरोडमध्ये कॉलनी रस्त्याचा खोडा

$
0
0
इंदिरानगरमधील चार्वाक चौकात येणाऱ्या चार रस्त्यांपैकी तीन डीपी (विकास आराखड्यानुसार) रोड आहेत. या तीन रोडपैकी दोन रस्ते रूंद असून उर्वरीत इंदिरानगर जाँगिंग ट्रॅककडून येणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण नुकतेच सुरू करण्यात आले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images