Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

त्र्यंबक रोडवर फेरीवाले, विक्रेत्यांचे अतिक्रमण

$
0
0
नाशिक शहरातील सर्वांत रुंद व प्रशस्त रस्ता अशी त्र्यंबकरोडची ओळख आहे. मात्र, सध्या या रस्त्यावर कोणीही या आणि काहीही विका, असे चित्र पहायला मिळत आहे. महापालिका प्रशासन मात्र अनधिकृत व अतिक्रमण या नावाखाली पावत्या फाडण्यातच धन्यता मानत आहे.

जमीन व्यवहारात ८९ लाखांची फसवणूक

$
0
0
जमिनीचा ९० लाखांत व्यवहार ठरलेला असताना केवळ ५५ हजार रुपये देऊन जमीन हस्तांतरीत करवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेने उपनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

उद्यान की कचराकुंडी?

$
0
0
इंदिरानगरमधील बापू बंगल्याजवळील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरालगत असलेल्या उद्यानाची पुरती दूरवस्था झाली आहे. गवतात दडलेली खेळणी आणि कचऱ्याबाबत स्थानिकांनी महापौर अॅड. यतीन वाघ यांच्यासमोर तक्रारीचा पाढाच वाचला.

कॅनॉलरोडला झोपडपट्ट्यांचा विळखा

$
0
0
नाशिक शहरातून जाणारा कॅनॉलरोडला झोपडपट्ट्यांचा विळखा पडला आहे. झोपडपट्ट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. मात्र, जलसिंचन विभाग व महापालिकाने या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

कॉम्बिंगमध्ये १८ मोटरसायकली जप्त

$
0
0
नाशिकरोड आणि उपनगर पोलिसांच्या वतीने रविवारी पहाटे कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये राबविण्यात आले. त्यामध्ये कागदपत्रे न बाळगणाऱ्यांच्या १८ मोटरसायकल‌ी जप्त करण्यात आल्या.

आता आग आणि बंबही रामेश्वरी

$
0
0
आग लागण्याचा कॉल येताच अग्निशमन दलाची होणारी धावपळ सर्वश्रृत आहे. या धावपळीत कधीकधी आग एकीकडे आणि बंब दुसरीकडे पोहचण्याची शक्यता असते. मात्र, लवकरच आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वर असा प्रकार बंद होण्याची चिन्हे आहेत.

साई पॅलेस हॉटेलकडून पाण्याची चोरी

$
0
0
पाणी पुरवठा करणाऱ्या १८ इंच पाइपलाइनमधून अनाधिकृतपणे २ इंच कनेक्शन घेऊन पाण्याची चोरी करणाऱ्या हॉटेलच्या कृत्याचा रविवारी पर्दाफाश झाला. याप्रकरणात पाणी पुरवठा विभागातील अधिकारी देखील समावेश असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते लक्ष्मण जायभावे यांनी केली आहे.

बाळासाहेबांची मूर्ती मंदिरात!

$
0
0
तमाम शिवसैनिकांचे दैवत आणि राज ठाकरे यांचा ‘विठ्ठल’ असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आता नाशिकमधल्या एका मंदिरात विराजमान होणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी बाळासाहेब आणि मीनाताईंच्या मूर्तींची प्रतिष्ठापना शिवमंदिरात करायचा जंगी कार्यक्रम शिवसैनिकांनी आखलाय.

नव्या अनधिकृत बांधकामांना स्थगिती द्या

$
0
0
पिंपळगाव बसवंत परिसरातील अनधिकृत बांधकामांची दखल घेत नव्याने सुरू होणाऱ्या अशा कामांना स्थगिती देण्यात यावी, अशी शिफारस मंडल अधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

फायर ऑडिटबाबत अधिकारी अनभिज्ञ

$
0
0
राज्य व केंद्र सरकारने आदेश देऊनही इगतपुरी ते मनमाड दरम्यानच्या स्टेशन्सचे फायर ऑडिट मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील अधिकाऱ्यांनी केलेले नाही. अशा सूचनांच्या कार्यवाहीबाबत अधिकारी अनभिज्ञ असल्याचे समजते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

$
0
0
गेल्या पंधरा दिवसांपासून संपावर असलेल्या बागलाण तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून मागण्या तत्काळ मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली. तहसिलदार तसेच आमदार उमाजी बोरसे यांनाही निवेदन सादर देण्यात आले.

रेसिडेन्शियल स्कूलच्या जमिनीचे हस्तांतरण

$
0
0
बागलाण तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेले वसतीगृह आणि एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल उभारणीसाठी लागणारी जागा सोमवारी महसूलखात्याकडून आदिवासी विकासकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे इमारतीच्या कामाला गती मिळणार आहे.

वाहतूक बेटे... खायला काळ अन् भुईला भार

$
0
0
नाशिकरोड परिसरातील वाहतूक बेटांची (आयलँड) देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. या बेटांची दुरूस्ती आणि देखभाल नियमितपणे व्हावी, अशी मागीण नागरिकांनी केली आहे. द्वारका चौक आणि मुंबई नाका चौक येथील वाहतूक बेटांचा अद्याप श्रीगणेशाच झालेला नाही.

सातपूर बससेवेचे वेळापत्रक कोलमडतेय

$
0
0
सातपूर विभागातून शहर बससेवेने शरणपूर येथील रचना विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. आठवड्यातून चार दिवस बससेवेचे वेळापत्रक कोलमडत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

बुडालेल्या चौघांचे मृतदेह सापडले

$
0
0
कश्यपी धरणात बुडालेल्या चौघा युवकांचे मृतदेह शोधण्यात सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास यश आले. त्यापैकी तिघांच्या मृतदेहावर नाशिक येथे तर महेश मौले याच्या मृतदेहावर हरसूलजवळील त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

रेल्वे ट्रॅकवर लवकरच संरक्षित जाळ्या

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर गेल्या अनेक दिवसांपासून रूळ ओलंडणाऱ्यांच्या अपघातात वाढ होत आहे. हे अपघात टाळण्यासाठी मुंबई, इगतपुरी, मनमाड रेल्वे स्टेशनच्या धर्तीवर नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर दोन ट्रॅकमध्ये संरक्षित जाळ्या लावण्यात येणार आहे.

प्राध्यापकांचा १२ वी परीक्षांवर बहिष्काराचा इशारा

$
0
0
राज्य सरकारने दिलेले अश्वासन पाळले नसल्याच्या निषेधार्थ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने नाशिकरोडच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आले.

प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीवर परिणाम

$
0
0
गेल्या १ जानेवारीपासून लागू झालेल्या रेडिरेकनरची दरवाढ प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीवर परिणाम करणारी असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्याच्या महसूलातही यामुळे घट होण्याची चिन्हे असून नाशकातील रिअल इस्टेट क्षेत्रही अडचणीतून मार्गक्रमण करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

शिक्षकेतरांना नागरी सेवा नियम लागू

$
0
0
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकारचा नागरी सेवा नियम लागू करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी या निर्णयाची वाट पाहात होते. हा नियम लागू झाल्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक लाभ मिळणार आहे.

जाहिरात धोरणातून ‘लुटमार्ट’

$
0
0
महापालिकेच्या प्रस्तावित जाहिरात धोरणामुळे शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर मोठा आर्थिक भार पडण्याची चिन्हे आहेत. हा प्रस्ताव महासभेवर आला असून दोन वेळा तहकूब करण्यात आला होता. जाहिरात धोरणात महापालिकेने अवाच्यासव्वा दर प्रस्ताव‌ित केले आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images