Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शिक्षकांच्या सुट्यांना चाप

$
0
0
दिवाळीच्या सुट्यांचा मनसोक्त फराळ, उन्हाळ्याच्या सुट्यांची सफर आणि वर्षभरातील अनेक सरकारी व निमसरकारी सुट्यांचा लाभ उठविणाऱ्या शिक्षकांना यंदा मात्र थोडी तडजोड करावी लागणार आहे.

तारीख पे तारीख

$
0
0
नाशिक ते सिन्नर या हायवेच्या चौपदरीकरणासाठी आवश्यक भूसंपादनाबाबत हायकोर्टात सोमवारीही निकाल न लागल्याने या प्रश्नाला तारीख पे तारीख मिळत आहे. परिणामी, या हायवेचे काम रेंगाळत असल्याचे दिसून येत आहे.

महिंद्राच्या नव्या कारचा प्रकल्प नाशकात

$
0
0
साऊथ कोरियन कंपनीला टेक ओव्हर केल्यानंतर भारतातील पहिली कॉम्पॅक्ट स्पोर्टस युटिलिटी व्हेईकलची नाशकातून निर्मिती करण्याचा निर्णय महिंद्रा कंपनीने घेतला आहे.

त्र्यंबक रस्त्याचे काम ४ दिवस बंद

$
0
0
पुढील सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी नाशिक-त्र्यंबक रस्त्याचे चौपदरीकरण चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. हे चार दिवस या रस्त्यावर दिवसातून चारवेळा टँकरने पाणी मारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

देवळालीतील ते बॉम्ब केले निकामी

$
0
0
देवळाली कॅम्प परिसरात शनिवारी कचराकुंडीत सापडलेला दुसरा बॉम्ब निकामी करण्यात आला आहे. हॅण्डग्रेनेड आणि काडतुसे सापडलेल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची पोलिस आणि लष्करी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून अजूनही हाती ठोस माहिती लागली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिस ठाण्यांतील सुलभ शौचालये वापराविना

$
0
0
नाशिक पोलिस आयुक्तालयासाठी सर्व पोलिस ठाण्यांत अत्याधुनिक सुलभ शौचालये धूळखात पडून आहेत. महिला पोलिसांसाठी सॅमसोनाईट कंपनीने सुलभ शौचालये दिलेली आहेत. परंतु, कंपनीचा मूळ हेतूच पोलिसांकडून पूर्ण झालेला नाही.

शहरात रोज ४ घटस्फोट!

$
0
0
पती-पत्नीमधील भांडणे विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसान घटस्फोट घेण्यात होते. हे टाळण्यासाठी नाशिकरोड येथे समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली. मात्र या केंद्रात दिवसाला सरासरी भांडणाच्या पाच केसेस दाखल होतात आणि त्यातील चार जोडपी घटस्फोट घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सिंहस्थापर्यंत येणार फ्लड व्हॅन

$
0
0
पूरपरिस्थितीमध्ये काम करणारी प्लड व्हॅन खरेदी करण्यासाठी महापालिकेने २०११-१२मध्ये प्रस्ताव तयार केला होता. चिखल किंवा थेट पाण्यात उतरून बचावकार्य करणारी ही व्हॅन कुंभमेळ्यावेळी उपयोगी पडू शकते. मात्र, मागील दोन वर्षांपासून प्रशासकीय कारभारात फ्लड व्हॅन अडकून पडली आहे.

विकासकामांचे ‘राज’ होणार उघड

$
0
0
मागील दोन वर्षांत प्रभागात केलेली विकास कामे, सध्या मंजूर असलेली कामे आणि प्रस्तावित विकास कामांची जंत्री घेऊन मनसेचे ४० नगरसेवक आज, मंगळवारी मुंबईकडे रवाना होणार आहेत.

रिक्षाचालकांना अखेर लागली शिस्त

$
0
0
चाळीसगाव रेल्वे स्थानक जंक्शनचे ठिकाण असल्याने धुळे, जळगाव व नाशिक येथे अप-डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अन्य प्रवाशांची संख्याही मोठी असल्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांचीही गर्दीत वर्दी होत असल्यामुळे सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली होती.

मांसभक्षी प्राण्यांचे अस्तित्व

$
0
0
सातपुड्यातील रावेर वनक्षेत्र परिमंडळात १६ ते २१ जानेवारी दरम्यान जंगलातील मासभक्षी व तृणभक्षी प्राण्यांच्या गणनेचे काम सुरू आहे. यापूर्वी मांसभक्षी व तृणभक्षी प्राणी खूपच कमी प्रमाणात दिसत होते, मात्र या भागात असलेल्या विविध प्रकारच्या प्राण्यांची वनविभागामार्फत होणाऱ्या गणनेतील उपस्थिती अचंबित करणारी आहे.

भाबडबारी टोलवर वाहनधारकांची लूट

$
0
0
विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील भाबडबारी टोल नाक्यावरील वाहनांना परतीचा टोल मिळावा, तसेच इतर मागण्या येत्या सात दिवसांच्या आत मार्गी लावाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आला आहे.

भांडणात कुंदलगावला १६ जखमी

$
0
0
मनमाड-मालेगाव रस्त्यावरील कुंदलगाव (ता.चांदवड) येथील म्हसोबा मंदिरात नवस फेडण्यासाठी आलेल्या धुळे व मनमाडच्या भाविकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने एकूण १६ जण जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.

प्लॉट खरेदी-वि‌क्रीत फसवणूक

$
0
0
एन - ए साठी लागणारी शासकीय नजराणा रक्कम न भरता बोगस लेआऊट दाखवून प्लॉट खरेदी- विक्री केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सटाणा कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.

बेमोसमी पावसामुळे द्राक्ष उत्पादक चिंताक्रांत

$
0
0
दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर मंगळवारी नाशिक जिल्ह्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागात रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. हा पाऊस द्राक्ष, कांदा, डाळिंब व टोमॅटो या पिकांना नुकसानकारक असून शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे.

सेनेचा भगवा सप्ताह; मनसेकडून महानाट्य

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त यंदा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शिवसेनेकडून भगवा सप्ताहअंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात असताना मनसेने शहरात आयोजित विशेष महानाट्यात बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ सहभाग घेतला आहे.

ना‌शिकरोडच्या दोघांवर खंडणीचा गुन्हा

$
0
0
तरुणाकडे १२ लाख रुपयांची मागणी करून न दिल्यास जीवे ठार मारू, अशी धमकी देणाऱ्या दोघांवर उपनगर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. उमेश रामदास देसले आणि सचिन देसले अशी आरोपींची नावे आहेत. दोघे नाशिकरोडच्या पवारवाडी भागात राहतात. शिवरामनगरमध्ये राहणाऱ्या नितीन भास्कर माळोदे (२८) यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

दिवसाकाठी गरज सव्वा कोटींची

$
0
0
घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडे अवघे ७० दिवस ​शिल्लक आहेत. आतापर्यंत महापालिकेने घरपट्टीची ५० टक्के वसुली पूर्ण केली असून उर्वरित उद्दिष्ट गाठण्यासाठी दिवसाकाठी किमान एक कोटी २८ लाख रूपयांची वसूल होणे अपेक्षित आहे.

म्हसरूळमध्ये वाहनांची तोडफोड

$
0
0
म्हसरूळच्या बोरगड परिसरातील एका सोसायटीत मोटरसायकलच्या बॅटरी चोरीला गेल्याचा तसेच वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. संतप्त रहिवाशांनी पंचवटी पोलिसांकडे धाव घेऊन त्यांना तक्रार अर्ज दिला आहे.

हायमास्ट बनला मृत्यूचा सापळा

$
0
0
राजराजेश्वरी चौकातील हायमास्टमुळे अपघात होत असून आतापर्यंत अनेकांचे बळी घेणारा धोकादायक हायमास्ट हटवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images