Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशकात आठ मंत्री

$
0
0
विविध बैठक व कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह विविध आठ मंत्री आज (शुक्रवार) नाशिक दौऱ्यावर आहे. अर्धा डझनहून अधिक मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासनासह पोलिस दल गुरूवारी नियोजनात व्यस्त होते.

नाशिक: नगरसेवकांवर ना'राज'

$
0
0
नाशिक महापालिकेतील निराशाजनक कारभारावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह नगरसेवकांना मुंबईत फैलावर घेतले तर त्यावेळी नाशिकमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शहर सुधारणेसाठी आक्रमक होण्याचा सल्ला दिला.

मनसे लागली कामाला

$
0
0
राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करताच नाशिक मनसे शहर समस्यामुक्त करण्यासाठी कामाला लागली.

पोलिसांसमोर बेकायदा पार्किंग

$
0
0
नाशिकरोड परिसरात महापालिकेने पार्किंगसाठी जागा आरक्षित केली नसल्याने पुलाखालच्या बाजारात येणाऱ्या ग्राहकांनी आपली वाहने सर्रास नाशिकरोड पोलिस स्टेशनच्या आवारात लावण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे पोलिस स्टेशन आहे की वाहनतळ, असा संभ्रम निर्माण होत आहे.

पालकमंत्र्यांवर नामुष्की?

$
0
0
फाटक्या पदरामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्री छगन भुजबळ यांना नामुष्कीचे धनी व्हावे लागण्याची शक्यता आहे.

१८ अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली?

$
0
0
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १८ अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्याबाहेर बदली होण्याची शक्यता आहे. यात अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या एक, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या पाच तर तहसीलदार दर्जाच्या १२ अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

रेल्वेची अॅम्ब्युलन्स हरवली!

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर काही दिवसांपूर्वी अॅम्ब्युलन्स सेवेचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले, मात्र स्टेशनच्या आवारात ही अॅम्ब्युलन्स दिसत नसल्यामुळे उद्घाटनाला आणलेली अॅम्ब्युलन्स गेली कुठे, असा सवाल प्रवाशी विचारत आहे.

वाळू लिलाव बोंबलला!

$
0
0
लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-ऑक्शन आणि ई-टेंडरिंगचा आग्रह धरणाऱ्या जिल्हा प्रशासनाला ठेकेदारांनी तोंडघशी पाडले आहे. त्यामुळेच तीनदा प्रक्रिया करूनही ४६ पैकी केवळ सातच ठेक्यांचे लिलाव होऊ शकले आहेत. शुक्रवारी यातील अवघ्या दोन ठेक्यांचे लिलाव झाले.

सप्तश्रृंग गडावर पाणीटंचाई

$
0
0
मागील पावसाळ्यात जोरदार पाऊस होवूनही सप्तश्रृंग गडाला पाणीपुरवठा करणारा भवानी तलाव अवघ्या पाच महिन्यांतच रिता होण्याच्या मार्गावर आहे. हा तलाव कोरडा झाला तर उन्हाळ्यापूर्वीच गडावर पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

कुंभथॉन २०१५

$
0
0
‘हॅके-थॉन’ तंत्राच्या धर्तीवर कुंभमेळ्याच्या न‌ियोजनासाठी ‘कुंभ-थॉन २०१५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन महासंगणकाचे न‌िर्माते डॉ. व‌िजय भटकर यांच्या हस्ते आज (द‌ि.२४) संदीप फाऊंडेशनमध्ये होणार आहे.

कळवण, मालेगावात पाऊस

$
0
0
कळवण तालुक्यात आज सांयकाळी पाच ते साडे सहा या दीड तासात मुसळधार पाऊस झाला. रात्री नऊच्या सुमारासही पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड तास पाऊस कोसळत होता. तर मालेगाव परिसरातही सायंकाळी साडेसातच्या सुमारास गारांच्या वर्षावासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.

बाळासाहेबांची मूर्ती मंदिरात

$
0
0
मनमाड येथील एका शिवसैनिकाने बाळासाहेब ठाकरे यांच्या चांदीच्या मूर्तीची तसेच माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या पंचधातूच्या मूर्तीची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक काढली. मुक्तांगण परिसरात उभारण्यात आलेल्या मंदिरात या मूर्तींची प्रतिष्ठापना शुक्रवारी श्रीगणेशासह केली जाणार आहे.

स्मृतिमंदिरातील सोनेरी दिवे

$
0
0
सटाणा येथील सेवानिवृत्त प्राध्यापक, कवी व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शं. क. कापडणीस लिखित ‘स्मृतीमंदिरातील सोनेरी दिवे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज, शनिवारी (ता. २५) कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे होणार आहे. त्यानिमित्ताने पुस्तकातील संपादीत अंश...

जोरदार आगमन

$
0
0
एखादा कार्यक्रम साजरा करायचा म्हणजे त्याचे मोठे टेंशन आयोजकाला असते. कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थापन अन् इतर सहकाऱ्यांना कामाचे वाटप करण्यापासून त्यांनी कामे व्यवस्थ‌ित पार पाडली आहेत की नाही याची पहाणी करणे आयोजकाला गरजेचे ठरते.

'पेसा'ची प्रभावी अंमलबजावणी करा

$
0
0
जिल्ह्यात वनाधिकार, पेसा(पंचायतराज एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया) कायद्याची परिणामकारकपणे अंमलबजावणी करण्यासह विकासकामांना गती द्या अशी सूचना देत राज्याचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

सातपूर कॉलनीत पिण्याचे पाणी रस्त्यावर

$
0
0
सातपूर कॉलनी भागात पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. दररोज हजारो लीटर पाणी रस्त्यावरून वाहताना दिसते. परिसरातील रहिवाशीच रस्त्यावर पाणी सोडत असल्याची वस्तुस्थिती आहे.

कुंभमेळ्यासाठी विशेष अधिकारी शक्य

$
0
0
पुढील वर्षी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून विशेष अधिकारी नेमण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असून कुंभमेळ्यासंदर्भात त्यांना काही अधिकार देणे शक्य आहे का याची चाचपणी सुरू असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

नागरिकांचे गैरकारभारविरोधात उपोषण

$
0
0
गिरणा विद्या प्रसारक मंडळ मेहुणबारे या संस्थेच्या संचालक मंडळाने केलेल्या गैरकारभारबदल चार महिन्यापासून गुन्हा दाखल होवूनही तपासकार्यासाठी होत असलेल्या दिरंगाईविरोधात मेहुणबारे येथील नागरिक गुरुवारपासून चाळीसगाव पोलिस स्थानकासमोर बेमुदत उपोषणला बसले आहेत.

तहसिल कार्यालय वर्षभरापासून वापराविना पडून

$
0
0
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या कचरा डेपोमुळे तहसिल कार्यालयाचे उद्घाटन अडकले आहे. गेल्या एक वर्षांपासून बांधून पडलेली तहसिल कार्यालयाची इमारत वापराविना पडून आहे. येत्या कुंभमेळ्यापूर्वी तरी या कार्यालयाचे उद्घाटन करावे, अशी मागणी होत आहे.

पावसाचा बेमोसमी कहर

$
0
0
बागलाण तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या गारपीट आणि पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील कांदा, डाळिंबसह गहू, हरभरा आणि इतर पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images