Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गौण खनिज वसुलीत महसूल चितपट

$
0
0
जिल्ह्यातील बेकायदा गौण खनिज उत्खनन रोखण्यात असमर्थ ठरलेले महसूल प्रशासन गौणखनिज कराची वसुली करण्यातही चितपट झाले आहे. जिल्ह्याला यंदा ६६ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी जिल्ह्यात केवळ १२ कोटी रुपयांचीच अद्याप वसुली झाली आहे.

‘सुंदरनारायणा’साठी हवे ५ कोटींचे अर्घ्य!

$
0
0
ऐतिहासिक ठेवा असलेल्या नाशकातील सुंदरनारायण मंदिराचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने या मंदिराच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याकडे राज्य सरकारचेही दुर्लक्ष झाले असून, मंदिराचा हा ठेवा जपला जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

विकास आराखडा : फौजदारी दाखल करा

$
0
0
चुकीचा शहर विकास आराखडा तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने आज राज्य सरकारकडे करण्यात आली.

नवीन सिडकोत ड्रेनेजलाइन थेट नाल्यात

$
0
0
नवीन नाशिकमधील सिडको भागात नैंर्सगिक नाल्यात ड्रेनेज लाइनमधील सांडपाणी सोडण्यात आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच शहराच्या वाढत्या विकासाचा विचार करुन टाकण्यात आलेल्या पावसाळी गटारींचा वापर सर्रासपणे सांडपाणी वाहून नेण्यासाठी होत आहे.

हिंदुस्थान ग्लास : ऐतिहासिक करार

$
0
0
सिन्नर औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान नॅशनल ग्लास अॅण्ड इंडिया लिमिटेड कंपनीत गेल्या सतरा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या ८० कामगारांना कायमस्वरुपी करण्यात आले. उर्वरित इतर कंत्राटी कामगारांनाही कायमस्वरुपी कामगारांच्या सर्व सुविधा देण्याचेही करारात ठरविण्यात आले आहे.

वाहनांमधील दोष लक्षात येणार अॅटोमॅटिक

$
0
0
आरटीओ कार्यालयातील ५ एकर जागेत साकारला जाणारा अॅटोमॅटिक व्हेईकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटर (एव्हीइएस) या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. एप्रिलच्या पंधरवड्यात हा प्रकल्प कार्यान्वित होईल, असा विश्वास आरटीओ कार्यालयातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.

अखेर पालकमंत्र्यांकडून शिफारस

$
0
0
निराधार व्यक्तींसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून राबविण्यात आलेल्या योजना पाच तालुक्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या शिफारशीविना अडखळल्याच्या ‘मटा’तील वृत्तानंतर अखेर पालकमंत्र्यांनी तीन जणांची अध्यक्षपदासाठी शिफारस केली आहे.

दोघांना पाच वर्ष सक्तमजुरी

$
0
0
किरकोळ कारणावरून युवकावर कोयत्याने वार करणाऱ्या दोघांना न्यायालयाने ५ वर्ष सक्तमजुरी आणि १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जानेवारी २०१० मध्ये विकास शांताराम नाईक (२८) याच्या त्रिमुर्ती चौकातील स्टेशनरी दुकानात टवाळखोर मुले येऊन बसली होती. मात्र या मुलांनी दुकानात येऊन बसू नये, असे विकासने त्यांना सांगितले.

विधीमंडळ रोहयो समितीकडे लोकप्रतिनिधींची पाठ

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेची स्थिती जाणून घेण्यासाठी नाशकात दाखल झालेल्या विधीमंडळ रोहयो समितीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली आहे. या समितीने बुधवारी जिल्ह्यात दौरा करून रोहयोच्या काही कामांची पाहणी केली.

'राज' अटकेच्या अफवेने कार्यकर्त्यांची धावपळ

$
0
0
सोमवारी राज्यभरात झालेल्या 'टोल'फोडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मंगळवारी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि राज यांच्या अटकेच्या चर्चेला सुरुवात झाली.

कुठल्या मेरिटवर बोरस्तेंची निवड केली?

$
0
0
अॅड. आकाश छाजेड यांना हटवत नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांची नाशिक शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या शहराध्यक्ष हटाव मोहिमेला विराम मिळाला.

जीप दरीत कोसळून तिघांचा मृत्यू

$
0
0
सप्तशृंग गडावर देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या नांदुरी येथील भाविकांच्या जीपला अपघात होऊन एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार; तर चालक जखमी झाला. गडावरील गणपती पॉईंट वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने जीप लोखंडी रेलिंगला धडक देऊन २०० मीटर खोल दरीत कोसळली.

डॉ. म. बा. कुलकर्णी यांचे निधन

$
0
0
प्रसिध्द व्याकरणतज्ज्ञ, प्राचीन वैदिक वाङमयाचे गाढे अभ्यासक आणि संस्कृत तसेच मराठी साहित्याचे मानदंड म्हणून ओळखले जाणारे डॉ. म. बा. कुलकर्णी यांचे वेंकटेश सोसायटी, शिवाजी नगर येथील राहत्या घरी दुपारी साडेचार वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

मुक्तचाही श‌िष्यवृत्तीसाठी व‌िचार

$
0
0
समाजातील वंच‌ित घटकांना श‌िक्षणाच्या प्रवाहात सामावून घेण्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त व‌िद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे. या घटकांच्या शैक्षण‌िक उद्दिष्टांना प्रोत्साहन ‌म‌िळावे यासाठी विद्यापिठाच्या व‌िद्यार्थ्यांना श‌िष्यवृत्ती म‌िळवून देण्याच्या दृष्टिने प्रयत्न करू, असे आश्वासन सामाज‌िक न्यायमंत्री श‌िवाजीराव मोघे यांनी विद्यापीठ आण‌ि मनव‌िसेच्या श‌िष्टमंडळाला द‌िले.

अबला सबलीकरणाला तिलांजली

$
0
0
महाराष्ट्र सरकारने महिला सबलीकरणाचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्याचे ठरवले असून, त्यासाठी विशेष निधीची तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, नाशिक विभागातील तीन जिल्ह्यांनी महिलांच्या योजनांसाठी एकही रुपया खर्च केला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मुकेशसिंग राजपूतवर MPDA

$
0
0
अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सिडकोतल्या मुकेशसिंग दलपतसिंग राजपूतवर एमपीडीए अंतर्गत अटक करून एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास अंबड पोलिसांनी ही कारवाई केली.

गोदाघाटाचे काम अशक्य

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येवून टेपला असला तरी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या पाटबंधारे विभागाच्या नाकर्तेपणामुळे गोदाघाटाच्या विस्तारीकरणाचे काम मात्र अधांतरीच राहण्याची चिन्हे आहेत.

जगाला नाशिकचा ‘फेस्ट’ दाखवायचाय!

$
0
0
नाशिकला 'वाईन कॅपिटल'चं बिरूद मिळवून देणाऱ्या 'सुला'ने या 'फेस्ट'च्या निमित्ताने नाशिकचं नाव आघाडीच्या 'म्युझिक फेस्ट'च्या यादीत पोहोचवलं. या 'फेस्ट'मागची भूमिका स्पष्ट करताना 'मला जगाला नाशिक दाखवायचं आहे' असं सागंत या 'फेस्ट'चा आतापर्यंतचा प्रवास खास 'नाशिक टाइम्स'शी शेअर करताहेत 'सुला'चे सीईओ राजीव सामंत...

तबलावादनाने रसिक मंत्रमुग्ध

$
0
0
त्रितालातील पेशकार, चक्रदार, परण, तिहाई, तिस्त्रजाती कायदा, चलन अशा एकापेक्षा एक प्रकारच्या तबलावादनातील प्रकारांनी शंकराचार्य न्यास संकुलाचे सभागृह मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते गुरुकृपा तबला अकादमीच्या उद्‌घाटनाचे.

संवाद हरवत चाललाय

$
0
0
‘आजच्या सुखवस्तू घरांमध्ये वस्तू सुखी आहेत; परंतु माणसं मात्रं दु:खी आहेत. व्हर्च्युअल चॅटींगच्या युगात गप्पांना जागाच नसल्याने संवाद हरवला आहे’, अशी खंत गीतकार, लेखक प्रवीण दवणे यांनी व्यक्त केली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images