Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शैक्षणिक संस्थांच्या स्वायत्ततेची ऐशीतैशी

$
0
0
शैक्षण‌िक संस्थांनी स्वायत्तता अत्यंत जबाबदारपणे व व‌िधायक अंगाने जपली तरच ते समर्थनीय ठरु शकते, या आशयाचे भाष्य द‌िल्ली उच्च न्यायालयाने नुकतेच केले. स्वायत्ततेश‌िवाय शैक्षण‌िक क्षेत्रात सृजनशील उपक्रमांची अंमलबजावणी करणे शक्य नाही, ही वस्तुस्थ‌िती असली तरीही सध्या संस्थांच्या माध्यमातून या स्वायत्ततेचा उपयोग सोयीस्करपणे केला जातो.

फॅशनही झाली स्पिरिच्युअल

$
0
0
फॅशनच्या दुनियेत कधी काय प्रवेश करेल हे सांगता येत नाही. येथे दोन टोकाच्या गोष्टी सुध्दा एकत्र येऊ शकतात; त्यालाच तर फॅशन म्हटले जाते. फॅशन व धार्मिकता या तसे पाहता दोन टोकाच्या बाबी परंतु सध्या फॅशनमध्ये धार्मिकता घुसली असून यंगीस्तानच्या टी शर्टसवर देवी देवतांचे चित्र, गायत्री मंत्रापासून मृत्युंजय मंत्रापर्यंत सर्वच मंत्र तसेच ओम आद्याक्षर सर्रास पहावयास मिळत आहेत.

‘अक्षरा’च्या मेळाव्यात सांस्कृतिक मेजवानी

$
0
0
सजग वाचक मैत्रिणींनी एकत्र येऊन सुरू केलेल्या ‘अक्षरा वाचक मैत्रिण चळवळ’चा वार्षिक मेळवा नाशिककरांसाठी सांस्कृतिक मेजवानी देणारा ठरणार आहे. १ आणि २ फेब्रुवारीला कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा सभागृहात हा मेळावा होणार असून यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

ना‌शिक कला निकेतनचे मंगळवारपासून प्रदर्शन

$
0
0
नाशिक कला निकेतनतर्फे ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे ७१ वे कला प्रदर्शन असून गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे.

मुख्यालयातून पळ काढणाऱ्यांवर कारवाई

$
0
0
शिक्षक व कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नसल्याच्या तक्रारीवरून प्रकल्प अधिकारी यावल यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने जिल्ह्यातील १८ आश्रमशाळांची तपासणी केली. प्रसंगी गैरहजर असणाऱ्या १७९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती यावल येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी दुधाळ यांनी दिली.

आवक घटल्याने डाळिंब तेजीत

$
0
0
आवक घटल्यामुळे डाळिंब तेजीत आले आहे. गुरुवारी नामपुर उपबाजार आवारात डाळिंब १२० रुपये किलोने विकले गेले. गेल्या तीन महिन्यांपासून ढगाळ वातावरणामुळे आणि बेमोसमी पावसामुळे डाळिंबाचे आगार असलेल्या कसमादे पट्टयात यंदा डाळिंबाची प्रत घसरुन उत्पादनातही घट झाली आहे.

नवीन पूलाचा विचार

$
0
0
सुरक्षा, संरक्षा व प्रवासी सुविधा आदिबाबींमध्ये भुसावळ विभागाचे कार्य समाधानकारक सुरू असल्याचे प्रमाणपत्र मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस के सुद यांनी दिल्याने या ‘महा’ पाहणी दौऱ्यात भुसावळ विभाग ‘पास’ झाल्याचा अर्विभावात येथील अधिकारी होते.

जमीन मोजणीसाठी आता नवी पद्धती

$
0
0
राज्य सरकारने जमीन मोजणी पध्दतीत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पूर्वीची साधी, तातडीची आणि अतितातडीची मोजणी कायमस्वरुपी बंद करून यापुढे एकाच प्रकारची मोजणी होणार आहे. तसे आदेश महसूल खात्याने निर्गमित केले आहेत.

ड्रेनेज साफसफाईची बिले खासगी ठेकेदाराच्या नावाने?

$
0
0
नाशिक महापालिकेकडे ड्रेनेजच्या साफसफाईसाठी जुन्या दोन व नवीन चार अशा सहा जेट मशिन आहेत. या मशिनच्या सहाय्याने ड्रेनेजची साफसफाई केली जात असली तरी प्रत्यक्षात महापालिकेकडून खासगी ठेकेदाराला बिले दिली जात असल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

‘साई पॅलेस’वर कारवाईला टाळाटाळ

$
0
0
मुंबई- आग्रा महामार्गावरील हॉटेल साई पॅलेसने महापालिकेच्या पिण्याच्या पाईपलाईनमधून दोन इंची पाईपलाइन टाकून पिण्याचे पाणी चोरी केल्याचे उघड झाले होते. महापालिकेचे विभागीय अधिकीरी व पाणी पुरवठा अधिकारीऱ्यांनी साई पॅलेस हॉटेल व्यवस्थापनाला याबद्दल नोटीसही बजावली होती.

झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे महिनाभरात पुसट

$
0
0
नाशिक महापालिकेकडून नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यात आले आहेत. परंतु, ते महिनाभराच्या आतच पुसट झाले आहेत. झेब्रापट्यांची गुणवत्ता तपासणार तरी कोण, असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करत आहेत.

महापालिकेला जड झाले ‘साधुग्राम’

$
0
0
सिंहस्थ पर्वण्यांच्या तारखांचा अंदाज घेता सिंहस्थाच्या कामांसाठी महापालिकेच्या हाती जेमतेम दीड वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. यानिमित्ताने नाशिक शहरात येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा पुरविणे जितके गरजेचे आहे, तितकेच साधूसंतांची निवास व्यवस्था व कथा-कीर्तनासाठी साधुग्रामच्या उभारणीसाठी जागा अधिग्रहीत करणे महत्त्वाचे आहे.

तीन व‌िद्याशाखांचे मार्कशीट रखडले

$
0
0
पुणे व‌िद्यापीठांतर्गत तीन व‌िद्याशाखांचे न‌िकाल काही द‌िवसांपूर्वी उशिराने ऑनलाइन पध्दतीने लागले. मात्र, या न‌िकालांच्या हार्डकॉपीज पंधरा द‌िवसांनंतरही व‌िद्यार्थ्यांच्या हातात आलेल्या नाहीत.

जुन्या शहराध्यक्षांचा बोर्डही गायब!

$
0
0
गेल्या दोन वर्षापासून वादात असलेल्या काँग्रेस शहराध्यक्षपदाच्या वादावर पडदा टाकण्यासाठी प्रदेश काँग्रेसने अॅड. आकाश छाजेड यांना हटवत नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांना शहराध्यक्षपदाची नियुक्ती केली.

रोहयो समिती आली आणि गेलीही

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आलेली विधीमंडळ रोहयो समिती आली आणि गेली असेच काहीसे चित्र आहे. रोहयोसाठी वादग्रस्त असलेल्या सिन्नर तालुक्यात ही समिती जाणे अपेक्षित असताना समितीने केवळ कसमादेचा दौरा केला आहे.

टेंडर प्रक्रिया देखील सुरू

$
0
0
जर्मन सरकारच्या आर्थिक मदतीने साकारण्यात येणाऱ्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी पाऊणेदोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. गेल्या महिन्यातच हा निधी मिळाला असून प्रत्यक्ष कामास सुरूवात करण्यासाठी महापालिकेने टेंडर प्रक्रीया सुरू केली आहे.

एलबीटी अडकणार ६०० कोटींवर

$
0
0
एलबीटी अर्थात स्थानिक संस्था कराने जानेवारी अखेरीस ५०१ कोटी रूपयांचा पल्ला गाठला आहे. एप्रिल २०१३ ते २२ मे २०१३ या कालावधीत वसूल करण्यात आलेल्या जकात महसूलाचा देखील यात समावेश असून उद्दीष्टापेक्षा वसूलीचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट होत आहे.

निवडणुकीचा आज समारोप

$
0
0
युवक काँग्रेसअंतर्गत घेण्यात येणाऱ्या विधानसभा व लोकसभा पदाधिकारी निवडणुकीतील पहिला टप्पा गुरूवारी पार पडला. यात नाशिक लोकसभा मतदारसंघासह सिन्नर, देवळाली व इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी निवडीसाठी मतदान झाले.

एकाच रात्रीत चार दरोडे

$
0
0
वडनेर खाकुर्डी येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडेखोरांनी बाजारपेठेतील दोन सराफी दुकानांसह चार ठिकाणी दरोडे टाकून लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक सराफ जखमी झाला आहे. पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून चार दरोडेखोरांना शिताफीने अटक केली.

निर्माण होणार 'असुरक्षा'

$
0
0
निवडणुकीच्या तोंडावर केंद्र आणि राज्य सरकारने येत्या १ फेब्रुवारीपासून अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले असले तरी ही योजना प्रत्यक्षात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारीच ठरणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images