Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गडावर देवीची सुरक्षा सीसीटिव्हीच्या हवाली

$
0
0
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचं महत्त्वं असलेला सप्तश्रुंग देवीचा गडदेखील अन्य धार्मिक स्थळांप्रमाणेच असुरक्षिततेच्या छायेत आहे. पार्किंगपासून ते देवीच्या गाभा-यापर्यंत कुठेही व्यक्तीशः तपासणी करणारी यंत्रणा अस्तित्त्वात नाही.

प्राचार्य परिषदेला अडकाठी कशाची?

$
0
0
थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वरला जाऊन परिषदेच्यानिमि‌त्ताने काही कालावधी व्यतीत करण्याच्या पुणे विद्यापीठातील प्राचार्यांच्या मनसुब्यांना अखेर सुरूंग लागला आहे.

विविध मागण्यांसाठी यंत्रमाग कारखानदारांचा मोर्चा

$
0
0
यंत्रमाग कारखानदारांचे वीज दर कमी करावे, या मुख्य मागणीसह लोडशेडिंग बंद करावे व वीज ग्राहकांशी संबधित प्रश्न सोडवावेत, या मागण्यांसाठी मालेगाव शहर काँग्रेस व यंत्रमाग कारखानदारांच्या १२ संघटनांनी माजी आ. शेख रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली मुशार्वत चौक ते प्रांत कार्यालय दरम्यान मोर्चा काढला.

परि भोगू नये जाणितले

$
0
0
मराठी भाषा दिन... मराठी भाषा 'दीन'... माझा मऱ्हाठाची बोल कवतुके... माय मराठी मरते इकडे... मराठी जगण्यासाठी प्रयत्नांची गरज... मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायला हवा...

'अशोका'च्या फीबाबत योग्य कार्यवाही करा

$
0
0
शहरातील इंग्लिश मीडिअमच्या शाळांची फीवाढ हा पालकांच्या चिंतेचा मुद्दा बनल्यामुळे अनेक शाळा शिक्षण विभागाकडे धाव घेत आहेत. चांदशीतील अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या फी वाढीबाबत पालकांनी शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन त्यांना याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निवेदन दिले.

मी सांगतो...!

$
0
0
अतिउत्साही वृध्द म्हणजे तरूणाईला लाजवणारं व्यक्तिमत्त्व असतं असं म्हटल्यास वावगं ठरू नये. कोणत्याही मोफत कार्यक्रमाला जाऊन बसणं यांचा बर्थरेट असतो. अशाच परवाच्या एका कार्यक्रमातला हा किस्सा. कार्यक्रम भाषेबाबतचा, त्यामुळे बोलण्याचा अधिकार केवळ आपलाच असं गृहीत धरून आलेल्या वृध्दांची संख्या लक्षणीय होती.

मार्चअखेरीस 'डीएड' तपासणीचा निकाल

$
0
0
राज्यभरातील डीएड कॉलेजच्या तपासणीचा अहवाल अद्याप पूर्ण न झाल्याने हा अहवाल मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.

पाच विषय समितींचे सभापती बिनविरोध

$
0
0
मनमाड नगरपालिकेच्या विविध विषय समितीच्या सभापतींची निवड पालिकेच्या सभागृहात शुक्रवारी बिनविरोध झाली. या पाच समितीच्या सभापतीच्या निवडीची घोषणा धान्य वितरण अधिकारी एस. बी. भाटे यांनी केली. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, मुख्याधिकारी संजय केदार उपस्थित होते.

नाशिकच्या व्हेंडर्सला 'एचएएल'चे वेलकम

$
0
0
सुखोई आणि मिग विमानासाठी लागणारे विविध सुटे पार्ट्स स्थानिक उद्योगांकडून खरेदी करण्याला हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) प्राधान्य दिले आहे. निमा पॉवर प्रदर्शनाद्वारे एचएएलला स्थानिक व्हेंडर्सचा शोध सुरू आहे.

स्काउटना बालमजुरीचा गाइडन्स

$
0
0
'खरी कमाई' या उपक्रमाच्या नावाखाली स्काउट गाइडच्या विद्यार्थ्यांकडून विटा उचलणे, भांडी धुणे अशी अतिश्रमाची कामे करवून घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे.

अवैध वाळू उपशावर 'बार कोडिंग'चा उतारा

$
0
0
वाळूचा बेसुमार उपसा व चोरटी वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वत्र 'बार कोडिंग' पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर यापूर्वीच जिल्ह्यातील दोन ठिय्यांवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. 'बार कोडिंग' अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासन 'जिओ टॅगिंग'चाही आधार घेणार आहे.

देवळाली कॅम्पला मिळणार वाचनाचा अभिजात ठेवा

$
0
0
ब्रिटिशकालीन संदर्भ असलेल्या आणि ऐतिहासिक खाणाखुणा जपणाऱ्या देवळाली कॅम्प परिसराचा लिखित ठेवाच उपलब्ध नाही, या विचारातून देवळाली कॅन्टोन्मेन्ट बोर्डतर्फे एक भव्य वाचनालय उभारण्याची कल्पना पुढे आली आणि ती आता येत्या एप्रिलमध्ये साकारही होते आहे.

क्लास वन अधिका-यांचे 'थर्ड ग्रेड' काम

$
0
0
गेल्या वर्षभरात अँटी करप्शन ब्युरोने ३६ अधिकाऱ्यांवर कारवाई करीत सुमारे १२५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. एकीकडे सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत असताना सरकारी अधिकारी मात्र घबाड कमवण्याच्या पाठीमागे लागले असल्याचे चित्र राज्यात दिसते आहे.

राज्यातील दक्षता अधिकारी निरुपयोगी

$
0
0
सरकारी विभागातील लाचखोरी संपवण्यासाठी नेमण्यात येणारे दक्षता अधिकारी निरुपयोगी असल्याचा आरोप अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस महासंचालक राज खिलानी यांनी केला. प्रशासकीय दौऱ्यानिमित्त शुक्रवारी ते नाशिकमध्ये आले होते.

जिल्हा बँकेचे सोमवारी फेरलेखापरीक्षण

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या गेल्या तीन वर्षांचे फेरलेखापरीक्षण सोमवारी करण्यात येणार आहे. तसे पत्र सहकार आयुक्तांनी दिले असून लेखापरीक्षण विभागातील विभागीय सहनिबंधक ए. एम. मोरे सोमवारी बँकेत दाखल होणार आहेत.

पदोन्नतीतील उपसूचनांना केराची टोपली

$
0
0
पदोन्नती प्रक्रियेच्या महासभेच्या ठरावात उपसूचना घुसविण्याचा प्रयत्न झाला असला तरीही आयुक्तांनी मात्र या सर्वच उपसूचनांना केराची टोपली दाखविली आहे.

महिलेचा खून पूर्ववैमनस्यातून?

$
0
0
सातपूर परिसरातील विश्वासनगर येथे झालेल्या खून प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत संशयितांना अटक करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू होते.

खोटे सोने देऊन बँकेची फसवणूक

$
0
0
नकली सोने तारण ठेऊन बँकेची फसवणूक करणा-या तिघांविरोधात अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे संशयित आरोपींमध्ये बँकेच्या व्हॅल्युअरचाही समावेश आहे.

ठेक्यांची मुदतवाढ फेटाळली

$
0
0
घंटागाडी ठेकेदारास मुदतवाढ न देण्याचा ठराव स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत करण्यात आला. आयुक्तांच्या अधिकारात मात्र काही काळासाठी मुदतवाढ होऊ शकते. त्यामुळे घंटागाड्यांची व्यवस्था लगेचच कोलमडणार नाही, अशी स्पष्टोक्ती प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.

मेट्रो ट्रेनसाठी सर्वेक्षणाची शिफारस

$
0
0
गेल्या अनेक बजेटमध्ये वारंवार फिरणा-या मेट्रो ट्रेनसाठीच्या सर्वेक्षणाची शिफारस स्थायी समितीने आपल्या बजेटमध्ये केली आहे. याशिवाय अनेक योजनांचा समावेश स्थायीने केल्याची माहिती सभापती उद्धव निमसे यांनी पत्रकार परिषदेत केली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images