Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिक जिल्हा अव्वल

$
0
0
भारतातील सर्व खेड्यांमध्ये शौचालयाचा वापर वाढावा यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने निर्मल भारत अभियानाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानात नाशिक जिल्ह्याने विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. जिल्ह्याने ९१ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

एअरफोर्सच्या ‘रडार’वर सिन्नर

$
0
0
मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सिन्नर येथे रडार उभारण्यासाठी भारतीय हवाई दलाने वनविभागाकडे जागेची मागणी केली आहे. त्यानुसार वनविभागाने या जागेवरील वृक्षांचे मूल्यांकन आणि सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.

बीएसएनएलकडून अन्याय

$
0
0
बीएसएनएलमार्फत शेतकरी वर्गासाठी देण्यात आलेल्या कृषी प्लॅन मोबाईलधारकांना सेवा देताना कंपनीकडून अन्याय होत असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेद्र सोनवणे यांनी राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

सिन्नर पंसच्या कारभाराची चौकशी करा

$
0
0
सिन्नर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी मोहन बागुल व शाखा अभियंता चंद्रकांत घुगे यांना एक लाख ७० हजारांची लाच घेताना पकडल्यानंतर पंचायत समितीच्या एकूणच कारभारावर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

सिन्नरला केबलचे दर ५० ने वाढले

$
0
0
सिन्नर तालुक्यातील टीव्ही केबल कनेक्शनमध्ये केलेली ५० रुपये दरवाढ ही अन्यायकारक आहे. ती तातडीने रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी जनशक्ती संघटनेतर्फे तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लासलगावला एकाचा रेल्वेतून पडून मृत्यू

$
0
0
लासलगाव रेल्वे स्थानकात गुरुवारी दुपारी वेफकोच्या एका कर्मचाऱ्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील मनोहर कुलकर्णी (४९) असे असून ते लासलगाव येथील रहिवासी होते.

कॉफी...

$
0
0
नाशिक...मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे झालेली नाशिकची वाटचाल अवलोकताना अनेक बदल आपल्याला दिसतात. या बदलांवर प्रकाशझोत टाकला असता अनेक कंगोरे दृष्टीपथास येतात. त्या-त्या क्षेत्रामध्ये बदलाचे अनेक पोत दर्शविणारा कॉलम ‘मेट्रो व्ह्यू’ वाचकांसाठी रोज देत आहोत. त्यात आहे तरूण पिढीला भावणारे सर्वकाही. ज्येष्ठांना वाचायला आवडणाऱ्याचाही त्यात समावेश आहे. सध्याचे ट्रेंड, जुन्या नव्याची लिंक, वाटचाल असे सारेच असणारा कॉलम म्हणजे मेट्रो व्ह्यू...

प्रवाशी वाहन चोरी : दोघांना अटक

$
0
0
येथील बसस्थानक परिसरात प्रवासी वाहतुकीसाठी लावलेली व्हॅन चोरट्यांनी पळवून नेल्यानंतर काही तासातच गाडीच्या मालकानेच आपली स्वतःची फिल्डींग लावून चोरट्यांना पकडून देत पोलिसांच्या हवाली केले. शहर पोलिसांनी प्रवाशी व्हॅनसह येवला येथील दोघांना अटक केली आहे.

मिटींगचा भुंगा

$
0
0
नाशिकमध्ये नुकतीच विधीमंडळ रोहयो समितीने भेट दिली. या समितीच्या भेटीसाठी लोकप्रतिनिधींबरोबरच सरकारी अधिकारीही उत्सुक होते. पण या उत्साहाच्या भरात भलताच किस्सा घडला. समितीने पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची वेगवेगळी बैठक आयोजित केली होती. लोकप्रतिनिधींची बैठक आधी व अधिकाऱ्यांची त्यानंतर असं ठरवलं गेलं.

सिन्नर तहसिलवर भिल्ल समाजाचा मोर्चा

$
0
0
सिन्नर तालुका भिल्ल समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सिन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

प्रकाश होळकरांना जगतगुरू पुरस्कार

$
0
0
पारनेर येथील मातोश्री प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा जगतगुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार यंदा सुप्रसिध्द कवी प्रकाश होळकर यांना जाहीर झाला आहे. मातोश्री प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

बह‌िष्काराचा प्राध्यापकांचा न‌िर्धार कायम

$
0
0
दहावी आण‌ि बारावीच्या परीक्षांच्या न‌ियोजनासाठी माध्यम‌िक व उच्च माध्यम‌िक मंडळाच्या तयारीला वेग आला असला तरीही बारावीच्या परीक्षेवर बह‌िष्काराचा ज्युन‌िअर कॉलेजमधील प्राध्यापकांचा न‌िर्धार कायम आहे.

‘अनसिन’चे होणार सादरीकरण

$
0
0
केरळ संगीत नाटक अकादमीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या सहाव्या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात गोवा येथील प्रोसेस थिएटर्स तर्फे ‘अनसिन’ या नाटिकेचे ३ फेब्रुवारी रोजी सादरीकरण करण्यात येणार आहे. या नाटकामध्ये प्रमुख भूमिका मूळची नाशिकची व दिल्लीच्या एनएसडीमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेली कल्याणी मुळे साकारणार आहे.

मनसे युतीबाबत निर्णय निवडणुकीपूर्वी

$
0
0
नाशिक महापालिकेतील मनसेसोबतच्या युतीबाबतचा निर्णय प्रलंबित असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याबाबत निर्णय होणार असल्याचे सांगत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यानी मनसे व भाजपमधील वाद कायम असल्याचे स्पष्ट केले.

हात दाखवा, एसटी थांबवा

$
0
0
एसटीतील फुकट्या प्रवाशांवर कारवाई करणाऱ्या भरारी पथकाला स्वतंत्र वाहनाऐवजी एसटीनेच फिरावे लागत आहे. भरारी पथकाची आठही वाहने भंगारात जमा झाल्याने पथकातील अधिकाऱ्यांना एसटीनेच प्रवास करावा लागत आहे.

अन्नसुरक्षा आजपासून

$
0
0
जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेची अंमलबाजवणी शनिवारपासून केली जाणार आहे. जिल्ह्यातील ३८ लाख ५६ हजार ३३९ जणांना याचा प्रत्यक्षलाभ मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले असले तरी या योजनेच्या लाभावरून मोठे वावविवाद होण्याची चिन्हे आहेत.

सी-फॉर्म आता ई-मेलवर

$
0
0
राज्याबाहेर खरेदी करायच्या मालासाठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांना आवश्यक असेला सी फॉर्म आता ई-मेलद्वारे उपलब्ध होणार आहे. पोस्टाच्या ढिसाळ कारभाराला फाटा देत ई-मेलच्या या पद्धतीमुळे व्यापारी आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

व्यक्तिगत कनेक्शनवर निर्बंध आणणे चुकीचे

$
0
0
सोसायटीकडे थकबाकी असल्याचे कारण सांगून सोसायटीत वैयक्तिक स्वरूपाचे नळ कनेक्शन न देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत आयुक्तांच्या अशा परस्पर आदेशांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याची टीका नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी स्थायी समितीच्या बैठकी दरम्यान केली.

बालक आणि मातेला मोफत वाहन सुविधा

$
0
0
माता व बालक यांची आरोग्यविषयक विशेष काळजी घेऊन त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेली जननी-शिशु सुरक्षा योजना राबविण्यास स्थायी समितीने शुक्रवारी हिरवा कंदील दर्शवला.

शविआवर हरकतींचा पडला पाऊस

$
0
0
शहर विकासाचा प्रारुप आराखडा अन्यायकारक व चुकीचा असल्याचा दावा करत तब्बल एक हजार जणांनी त्याविरोधात हरकती नोंदविल्या आहेत. नाशिकरोड येथील नगररचना कार्यालयात हरकती अर्ज देण्याचा आज शेवटचा दिवस होता. सहाय्यक नगररचनाकार अमर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सुमारे एक हजार हरकती आल्या आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images