Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पार्किंगसाठी आरक्षित भूखंडाचा विकास कधी होणार?

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीत पार्किंगसाठी नव्याने आरक्षित झालेला भूखंड विकसित होणार तरी कधी, असा सवाल उद्योजक उपस्थित करत आहेत. औद्योगिक वसाहतीत याआधीही एमआयडीसीने भूखंड आरक्षित केला होता.

अतिक्रमण मोहीमच ‘हटवा’

$
0
0
महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मुलन मोहिमेतंर्गत फेरीवाला व्यावसायिकांना लक्ष्य केले जात आहे. हॉकर्स कमिटीने आपले काम सुरू केलेले नसताना ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करीत शहरातील पक्के बांधकामे महापालिका का पाडत नाही, असा सवाल हॉकर्स संघटनांनी केला आहे.

अतिक्रमण अधिकाऱ्याला सभागृहातून काढले बाहेर

$
0
0
पार्थडी फाट्यावरील रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या चायनिज गाड्या मागणी करुनही हटविण्यात आल्या नाहीत. म्हणून नगरसेवकांनी केलेल्या जोरदार मागणीमुळे अतिक्रमण अधिकाऱ्यांना सिडको प्रभाग समितीच्या बैठकीतून सभागृहाबाहेरचा रस्ता धरावा लागला.

खासदार निधीची सीमा वाढली

$
0
0
आपल्या मतदारसंघाबाहेर विकासकामांसाठी निधी खर्च करण्याची मुभा खासदारांना देण्यात आली आहे. त्याचा लाभ घेत खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी कसबे सुकेणे येथे निधीचा पहिल्यांदाच वापर केला आहे.

वेगाने गाडी चालविणाऱ्यावर गुन्हा

$
0
0
पोलिसांनी थांबायला लावले म्हणून घाबरत वेगाने वाहन चालविल्याप्रकरणी एकावर सातपूरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारच्यावेळी घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची मात्र, चांगलीच दमछाक झाल्याचे पहायला मिळाले.

वकील अन् पोलिसात युक्त‌िवाद होतो तेव्हा!

$
0
0
वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वकीलाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत पोलिस अधिकाऱ्याने कारवाईचा बडगा उगारला. तर दंड भरण्यास तयार असतानाही मोटारीला टोचन लावणे कोणत्या कायद्यात आहे, असा प्रश्न उपस्थित करीत वकीलानेही पोलिस अधिकाऱ्याला फैलावर धरले. जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी सायंकाळी हा युक्त‌िवाद रंगला.

महानगरे घेणार मोकळा श्वास?

$
0
0
राज्याचा विकास मोठ्या गतीने होत असल्याचा दावा सरकारकडून होत असला तरी प्रत्यक्षात राज्यातील महानगरे वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. त्यामुळेच या महानगरांमधील वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

कोणार्क नगरमध्ये वाहनांची तोडफोड

$
0
0
शहरात वाहन तोडफोडीच्या घटना सुरूच असून कोणार्क नगरमध्ये दोन अॅमब्यूलन्ससह एका इनोव्हा मोटारीची तोडफोड करण्यात आली. शुक्रवारी रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

‘साई पॅलेस’ला १ लाखाचा दंड

$
0
0
मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल साई पॅलेसला एक लाख चार हजार रुपयांचा दंड केला असल्याचे महापालिका उपायुक्त आर. एम. बहिरम यांनी सांगितले. प्रत्यक्षात साई पॅलेसवर करण्यात आलेली कारवाई म्हणजे फक्त देखावा असून, ही कारवाई संशयास्पद असल्याचा आरोप नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांनी केला आहे.

नगरसेवक सहाणेंची सुरक्षा काढली

$
0
0
विधानपरिषद निवडणुकीतील वादातून जीविताला धोका असल्याच्या कारणास्तव शिवसेना नगरसेवक अॅड. शिवाजी सहाणे यांना देण्यात आलेली वैयक्तिक सुरक्षा पोलिसांनी मागे घेतल्याने संतप्त झालेल्या सहाणे यांनी ही कारवाई राजकीय दबावाखाली केल्याचा आरोप केला आहे.

सरकार आणि राज यांचे संगनमत

$
0
0
मनसेने केलेले ‘टोलफोड’ आंदोलन ही राज्य सरकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मिलीभगत असून राज्यातील महायुतीची ताकद कमी करण्यासाठीचा हा डाव असल्याचा थेट आरोप प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी शुक्रवारी येथे केला.

आणखी ५ ठिकाणी होणार जलकुंभ

$
0
0
विस्तारीत लोकसंख्येच्या तुलनेत पाणी पुरवठा व्हावा यासाठी महापालिकेने पाच ठिकाणी जलकुंभ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. जलकुंभ उभारणी व त्यादृष्टीने जल​ वाहिन्या टाकणे यासाठी सुमारे ४३ कोटी रूपये खर्चास शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.

वीसपैकी दोघींनाच 'मनोधैर्य'

$
0
0
बलात्कारित महिला, बालकांवरील लैंगिक अत्याचार व अॅसिड हल्ल्यातील महिलांना मानसिक आघातामधून बाहेर काढण्याच्या उद्देशाने महिला बालविकास विभागातर्फे 'मनोधैर्य' ही योजना सुरू करण्यात आली आहे.

आरोग्यने काढली, आणखी ३ कॉलेजची मान्यता

$
0
0
आरोग्य व‌िज्ञानाशी न‌िगडीत व‌िव‌िध अभ्यासक्रमांच्या रचनेत मुलभूत सुव‌िधांचा असणारा अभाव आण‌ि इतर त्रुटींचा ठपका ठेवत महाराष्ट्र आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाने राज्यातील आणखी तीन कॉलेजेसची संलग्नता यंदाच्या शैक्षण‌िक वर्षापासून कायमसाठी रद्द केली आहे.

ज्युनियर इंजि‌नीअरला लाच घेताना पकडले

$
0
0
कृषी पंपाच्या वीज कनेक्शनसाठी आदिवासी शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी विरगाव सबस्टेशनच्या ज्युनियर इंजिनीअरला अॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा

$
0
0
शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे आज नाशिकरोड येथे मोर्चा काढण्यात आला. शिक्षण सहसंचालक (माध्यमिक) आर. आर. मारवाडी यांना निवेदन देण्यात आले. बिटको येथून सुरू झालेला हा मोर्चा विभागीय महसूल खात्यातील शिक्षण संचालक कार्यालयावर नेण्यात आला.

दिवसा पाणीपुरवठा करा

$
0
0
सिडको प्रभागातील प्रभाग ५२ व ५३ मध्ये रात्री उशिरा येणाऱ्या पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार मागणी करूनही मनपा प्रशासन दखल घेत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना महाले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी सिडको विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

अनधिकृत पार्किंगमुळे उद्योजक त्रस्त

$
0
0
औद्योगिक वसाहतीतील सर्वच मुख्य रस्त्यांवर मोठे ट्रेलर व इतर वाहने अनाधिकृतपणे उभे राहतात. एमआयडीसीने नाममात्र दरात अधिकृत वाहनतळ खाजगी विकसकाकडून बनविले आहे. मात्र, या वाहनतळाचा कोणीही उपयोग करीत नाही.

रेल्वे स्टेशनच्या आवारात वाहनांना प्रवेश नको

$
0
0
रेल्वे स्थानकाच्या आवारात कोणत्याही वाहनांना प्रवेश न देता प्रवासी उतरल्यावर वाहने ताबडतोब बाहेर जाऊ द्या. रेल्वे स्थानकाच्या आवारात कोणत्याही वाहनाचा प्रवेश होता कामा नये.

शेतकऱ्यांना १५ दिवसात मोबदला

$
0
0
मालेगाव आणि येवला या दोन तालुक्यातील औद्योगिक भूसंपादनाचा मोबदला येथील शेतकऱ्यांना येत्या १५ दिवसात देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दीड-दोन महिन्यात ही जमीन उद्योगांसाठी उपलब्ध होऊ शकणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images