Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दफनविधीचा खर्च न दिल्यास तीव्र आंदोलन

0
0
नाशिक महापालिकेतर्फे शहरातील स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्काराची योजना सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर लिंगायत, मुस्लिम, गोसावी समाजालाही मोफत अंत्यसंस्कारासाठीचा खर्च देण्याची घोषणा महापालिकेने केली.

NIT तील रॅगिंगविरोधात 'भाविसे'चा मोर्चा

0
0
म्हसरूळ परिसरातील एनआयटी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये रॅगिंग होत असल्याच्या तक्रारीवरून भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे शनिवारी कॉलेजवर मोर्चा नेण्यात आला. यावेळी प्राचार्यांना निवेदन देत रॅगिंग करणाऱ्यांवर सोमवारपर्यंत कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

ट्रॅफिक इंजिनीअरला हवा सरकारी ग्रीन सिग्नल

0
0
नाशिक महापालिकेत ट्रॅफिक इंजिनीअरचे पद निर्माण करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रालयात धूळखात पडला आहे. या पदाला मंजुरी मिळाली तर शहरातील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यास मदत मिळेल, अशी माहिती महापौरांनी दिली.

प्रायव्हेट कॉलेजला बी. फार्मच्या प्रवेश परीक्षेसाठी मान्यता

0
0
असोसिएशन ऑफ अनएडेड प्रायव्हेट फार्मसी कॉलेजेसतर्फे (एयूपीपीसी) आगामी शैक्षणिक वर्षापासून बी. फार्मसी व‌िद्याशाखेच्या पह‌िल्या वर्षासाठी संस्था पातळीवर राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने मान्यता द‌िली आहे.

तरुणीचे अपहरण करून विनयभंग

0
0
महाविद्यालयीन तरुणीला बळजबरीने मोटारीत बसवून तिचा विनयभंग करण्यात आला. गुरूवारी दुपारी साडेचारच्या सुमारास नाशिकरोड येथील आरंभ महाविद्यालयाजवळ हा प्रकार घडला.

बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक

0
0
मृत वृध्देच्या जागी अन्य महिलेला तहसिलदारासमोर उभे करून त्याआधारे कुळमधील नाव कमी करवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भद्रकाली पोलिसांनी चंद्रशेखर मधुकर पेठे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शहर स्वच्छतेसाठी SMS हेल्पलाइन

0
0
'स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक' ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी नाशिक महापालिकेने एसएमएस हेल्पलाइन कार्यन्वित केली असून त्याद्वारे शहरातील कचऱ्यासंबंधातील तक्रारी सोडविण्यात येणार आहे.

ई रिटर्नमुळे करात लक्षणीय वाढ

0
0
ई रिटर्नमुळे करदात्यांची मोठी सुव‌िधा झाली आहे. परिणामी सरकारच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती विक्रीकर खात्याचे सहआयुक्त एस. पी. काले यांनी दिली.

स्पीड ब्रेकरच्या उंचीने अपघातात वाढ

0
0
नाशिकरोडच्या जुन्या सायखेडारोडवर महापालिकेच्या वतीने स्पीड ब्रेकर टाकण्यात आले असून त्याची उंची जास्त असल्याने सतत अपघात होत आहे. या स्पीडब्रेकरची उंची कमी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

डीपी आणि कॅनॉल रोड होणार खुला

0
0
तिडके कॉलनीतून सिडकोकडे जाण्यासाठी मायको सर्कलला जाण्याची येत्या काळात गरज राहणार नाही. कारण, तिडके कॉलनीतून थेट दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोरच्या रस्त्याला जाऊन मिळणारा डीपी रोड आणि कॅनॉल रोड करण्याचा निर्णय महापौर यतीन वाघ यांनी जाहीर केला आहे.

ग्रामपंचायतींचे लवकरच सक्षमीकरण

0
0
ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी शासनाने जोरदार पावले उचलली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला आता ग्रामसेवकाबरोबरच पंचायत विकास अधिकारी नेमण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीचे तांत्रिक कामे विनाविलंब व्हावीत म्हणून पंचायत समितीस्तरावर स्वतंत्र अधिकारी नेमला जाणार आहे.

क-हेच्या शेतक-याने फुलवली मोसंबी शेती

0
0
डाळिंबाचे आगार असलेल्या कसमादेपट्टयात आता मोसंबी पिकू लागली आहे. रविवारी सटाणा बाजार समितीत प्रथमच मोसंबी विक्रीसाठी दाखल झाली. तिनशे रुपये क्रेट इतका मोसंबीला भाव मिळाला.

अनैतिक संबंधातून पतीचा खून

0
0
प्रजासत्ताकदिनी नांदगाव परिसरातील बेलदार वस्तीनजीक झालेल्या अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा तपास करण्यात नांदगाव पोलिसांना यश आले आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सोळा गावांना बेमोसमी फटका

0
0
बागलाण तालुक्यात गेल्या सप्ताहात झालेल्या बेमोसमी पाऊस आणि गारपीटमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

प्राचार्यपदाची आसक्ती !

0
0
व‌िद्यापीठ अनुदान आयोगाच्या एका सम‌ितीने प्राचार्यपदाची कालमर्यादा पाचवरुन दहा वर्षे करण्याची श‌िफारस नुकतीच केली. २०१० सालापूर्वी प्राचार्यपदाला कालमर्यादा नव्हती. २०१० साली ‘युजीसी’ने ती पाच वर्षे केली. पाच वर्षांची मर्यादा कायम राह‌िली तर पुढील वर्षी अनेक महाव‌िद्यालयांमध्ये नेत्वृत्त्व पालट होत तरुण पिढीला संधी मिळेल.

हुश्श ....सुटलो रे बाबा

0
0
व‌िव‌िध प्रवृत्तींच्या समुहातून समाज आकाराला येतो. येथे तऱ्हेतऱ्हेचे लोक सापडतात. त्यातही काही प्रवृत्ती लक्षवेधी ठरतात. काही सकारात्मक अंगाने तर काही उपहासात्मक अंगाने. आत्मस्तुती प्र‌िय असणारा एक वर्ग जगाच्या पाठीवर कुठेही जा कायमच असतो.

कैलाश खेर नाईट रॉक्स...

0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित कैलाश खेर नाईट कार्यक्रम शनिवारी नाशिककरांनी एन्जॉय केला. कैलाशच्या गाण्यांवर तरुणाई थिरकली तर सारे नाशिककर कैलाशमय झाले होते. यानिमित्ताने कैलाशच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाविषयी व्यक्त केलेल्या भावना.

कैलाश फिर आएगा...!

0
0
स्टेजवरचे लाइट वेगाने फिरू लागतात...‘तो आला.. तो आला’ म्हणत तरुणाईकडून आरोळ्या ठोकल्या जातात, तब्बल वीस हजारांपेक्षा अधिक असलेले उत्सुक प्रेक्षक जागेवर उठून उभे राहतात... स्टेजवर कुणी दिसत नाही त्यामुळे जरासा अपेक्षाभंग होत सर्वजण खाली बसतात. डोळ्यात प्राण आणून ही वाट पाह‌िली जात असते सुफी गीतांचा बादशहा, दैवी स्वरांचा सरताज कैलाश खेर याची.

...तर सत्तेची स्वप्ने पाहू देणार नाही

0
0
महाराष्ट्र सरकारने येत्या निवडणुकीअगोदर मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास सत्तेची स्वप्न पाहू देणार नाही, असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिला. बी. डी. भालेकर मैदानात झालेल्या मराठा आरक्षण इशारा महामेळाव्यात ते बोलत होते.

९७० पैकी ६८१ पोलिस तंदुरुस्त!

0
0
ढेरपोटे पोलिस चेष्टेचा आणि टीकेचा विषय ठरतात. असे पोलिस काय कायदा आणि सुवव्यवस्था राखणार आणि गुन्हेगारी रोखणार, असा प्रश्न कायम विचारला जातो. परंतु नाशिक शहर पोलिस दलातील पोलिस मात्र अन्य शहरांच्या तुलनेतील पोलिसांपेक्षा तंदुरुस्त असल्याचे दिसून आले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images