Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सारडा सर्कलजवळील डीपीरोडवर ‘मार्किंग’

0
0
सारडा सर्कलवरील विकास आराखड्यानुसार (डीपीरोड) आरक्षित असलेल्या जागेवर झालेली अतिक्रमणे काढून टाकण्याचे आदेश महापौर अॅड. यतीन वाघ यांनी सोमवारी प्रशासनाला दिले. त्यानुसार नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्किंगचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत पूर्ण केले.

कामाच्या दिरंगाईबद्दल नाराजी

0
0
गोदाघाटाच्या कामाबाबत नाशिक मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण आणि पाटबंधारे विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांच्यातील चर्चेनंतर जिल्हाधिकारी विलास पाटील यांना गोदाघाटाच्या कामाचा जाब विचारण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी जिल्हाधिकारी व पाटबंधारे प्रशासनाच्या मोठ्या प्रमाणात बैठका झाल्या.

पत्नीचा खून; पतीसह दोघांना अटक

0
0
साथीदाराच्या मदतीने पत्नीचा खून करून पोलिसांची दिशाभूल करू पाहणाऱ्या पतीचे पितळ लासलगाव पोलिसांनी सोमवारी उघडे पाडले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीशी असलेल्या वादातूनच तिचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली आहे.

पक्षाचा ‘सोशल मीडिया’ बळकट करा

0
0
विद्यमान सरकारच्या कारभारावरून युवकांसह देशवासियांमध्ये असलेली खदखद मांडण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी व्यासपीठ बनले आहे. या माध्यमाच्या सहाय्याने कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे पोहोचविण्यासह त्यांना जागरूक करावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.

विद्यापीठ, महापालिका एकत्र येणार?

0
0
महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत.

हिशोबबाह्य पाण्याचा लागणार शोध

0
0
आजमितीस नाशिक शहरात १ लाख ७४ हजार ८५९ नळ कनेक्शन आहेत. रेकॉर्डवरील नळ कनेक्शनसाठी महापालिका दररोज ३८० दशलक्ष घनफुट पाणी पुरवठा करते. जेवढा पाणी पुरवठा होतो, त्याच्या ४० टक्केही बिले वसूल होत नाही ही वस्तुस्थिती आहे.

मोटरसायकलच्या धडकेने सायकलस्वाराचा मृत्यू

0
0
भरधाव मोटरसायकलने धडक दिल्याने सायकलस्वाराचा मृत्यू झाला. त्र्यंबक रस्त्यावर सातपूर येथे हा अपघात झाला. उपेंद्र रामेश्वर शहा (४०) असे मृत्यू झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. ते राजवाडा परिसरात राहातात. रवी पंडीत पाटील (३२) या मोटरसायकलस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ATVM : वापर वाढावा म्हणून नेमणार मार्गदर्शक

0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ऑटोमॅट‌िक तिकीट व्हेंडिंग मशिन (एटीव्हीएम) बसविण्यात आले आहे. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने येथे मार्गदर्शक नेमण्यात येणार आहे. त्यामुळे तरी प्रवासी या मशिनचा वापर करतील, अशी आशा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

अजय मेहतांना हाकलण्याची मागणी

0
0
गेल्या १८ वर्षांपासून राज्याच्या ऊर्जा खात्याचा कारभार सांभाळणाऱ्या अजय मेहता यांना तातडीने हाकला, अशी आग्रही मागणी वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीने केली आहे.

स्थायीला मिळणार १० फेब्रुवारीपर्यंत बजेट

0
0
महापालिकेचे २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत सोमवारी बैठक पार पडली. आयुक्त संजय खंदारे यांनी विविध विभागप्रमुखांकडून प्रस्तावीत योजनांची तसेच उत्पन्न बाजूंची माहिती घेतली.

खड्डे बुजवण्यासाठी ३९ कोटी

0
0
शहर परिसरातील रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाने ३९ कोटी ३१ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून बुधवारच्या महासभेत त्यावर चर्चा होणार आहे.

कुंभ शुभारंभ

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये महापालिकेने आघाडी घेतली असून एकूण ९६ पैकी १८ कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. ४४२ कोटी ११ लाख रूपये यासाठी खर्च होणार असून आणखी ९४ कोटी ४३ लाख रूपयांची ११ कामे टेंडर प्रक्रियेत आहेत.

नाशिकला मागे टाकत औरंगाबाद, नगरची उद्योग भरारी

0
0
सुवर्ण त्रिकोणातील एक कोन असलेल्या नाशिकला औद्योगिक विकासात मागे टाकत औरंगाबाद, अहमदनगर, पुणे यांनी भरारी घेतली आहे. औरंगाबादेतील शेंद्रा येथे इंडस्ट्रिअल सिटी तर नगरला जपानी इन्व्हेस्टमेंट झोन साकारला जात असताना नाशकची पिछेहाटच होत आहे.

आता ‘मिशन गोदावरी’

0
0
विविध कारणांनी प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या गोदावरीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी ‘आम आदमी पार्टी’तर्फे (आप) ‘मिशन गोदावरी’ हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात नदीपात्रात सोडले जाणारे गटारीचे पाणी रोखण्याच्या मागणीने करण्यात आले.

गोरेवाडी रस्ता तात्पुरता खुला

0
0
प्रेसला आलेल्या निनावी धमकीमुळे बंद करण्यात आलेला गोरेवाडी ते नाशिकरोड हा रस्ता रविवारपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाने सुरक्षेच्या कारणास्तव हा रस्ता बंद केला होता.

२० पोस्टमन वाहताहेत नाशिकरोडचा भार

0
0
अनेकांना नोकऱ्यांचे कॉल येवूनही ते मिळत नाहीत, टेलिफोन बिल भरण्याची अखेरची तारीख उलटून गेली तरी बिल भरता येत नाही, अशा एक ना अनेक तक्रारी नाशिकरोड पोस्टऑफिससंदर्भात आहेत.

प्रधान सचिवांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

0
0
गोदाघाटाच्या कामाबाबत नाशिक पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभाराची थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी गंभीर दखल घेतल्याने हे काम मार्च २०१५ पूर्वी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तशी ग्वाहीच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधान सचिवांना यांनी दिली आहे.

गौण खनिजांची अवैध वाहतूक जोरात

0
0
नाशिक जिल्ह्यात गौण खनिजांची अवैध वाहतूक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असले तरी महसूल विभागाने त्याकडे फारसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळेच गेल्या ९ महिन्यांत विभागाने केवळ ३ कोटी २२ लाख रुपये इतका दंड वसूल केला आहे.

६ वर्षांनंतर पाण्याचे ऑडिट

0
0
शहराचा एकूण पाणीपुरवठा, पाण्याची गळती आणि हिशोबबाह्य पाण्याचा शोध घेण्यासाठी महापालिकेने पाण्याचे ऑडिट घेण्याचे ठरविले आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून बुधवारच्या महासभेत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीचे पंचनामे करा

0
0
अवकाळी पावसाने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानभरपाईचा शासनाला योग्य अहवाल सादर करावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहरध्यक्ष संदीप पगार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वेय केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images