Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नारळ फोडला, पण नवनिर्माण होणार कधी?

$
0
0
नाशिक शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांचे भूमीपूजन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित पार पडले होते. परंतु, महिना उलटत आला तरी तरी रस्ता रुंदीकरणाची कामे अद्यापपर्यंत सुरू झालेली नाहीत. शहरात सात ठिकाणी झालेल्या भूमीपूजनांपैकी एकाही ठिकाणी काम सुरू झालेले नाही.

कलेला नसते सीमारेषेचे बंधन

$
0
0
‘कला ही मानवी समाजाला ईश्वरी देणगी असून त्यामुळेच व्यक्तीला आपले जीवन समृद्ध व समाधानकारक करता येते. कलेला कुठलीही सीमारेषा नसल्याने ती बंदिस्त नसते आणि त्यामुळेच कलाकारही बंदिस्त नसतो.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी कलानिकेतन वार्षिक कला प्रदर्शनाच्या उद्‌घाटन प्रसंगी केले.

स्पोर्टस्‍मन ऑलवेज स्पोर्टस्‍मन !

$
0
0
नाशिकमधील अनेक जुने खेळाडू आपला वेळ आणि श्रम विनामूल्य तरुण पिढीसाठी देताना दिसतात. आपल्या अनुभवाची शिदोरी ते आजच्या आणि उद्याच्या खेळाडूंसाठी रिती करण्यात धन्यता मानतात याला म्हणतात खेळावरील निष्ठा !

आनंद गान

$
0
0
अध्यात्मशास्त्रातील क्रांत‌िकारी व‌िचारवंत श्री आनंदमूर्ती गुरुमाँ यांची प्रवचन नाश‌िकच्या गंगापूर रोडवरील डोंगरे वसत‌िगृहाच्या मैदानात आजपासून (५ ते ९ फेब्रुवारी) होणार आहेत. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणाऱ्या या ‘अमृतवर्षा’च्या न‌िम‌ित्ताने...

जोडेच जातात तेव्हा !

$
0
0
कोणतीही गोष्ट चोरीला जाणे वाईटच, पण तरीही चोऱ्या होणे थांबत नाही. थांबणार तरी कसे? अनेकांच्या चरितार्थाचे साधन आहे ते. पण तरीही काय चोरावे आणि काय चोरू नये, याचे तारतम्य बरेचजण ठेवतात. ‘चोरी दिल की’ असो की संपत्तीची पण सावध असावं लागतं.

ट्रेंड सेटर सॉक्सची दुनिया मस्त

$
0
0
‌कॉलेज, कामाच्या निमित्ताने बहुतांश वेळ बाहेर राहावे लागते. प्रदूषण, धूळ, कचऱ्याने पायाची निगा राखणे अनिवार्य असते. तुम्ही कितीही स्मार्ट राहण्याचा प्रयत्न करा, पण तुमच्या पायाचे तळवे नितळ नसतील तर तुमची मेहनत गेली वाया.

निवृत्तीनाथ यात्रेत एसटीचा आलेख घसरला

$
0
0
त्र्यंबक रस्त्यावर सुरू असलेल्या कामांचा फटका यंदा एसटी महामंडळालाही बसला. अरुंद रस्ता आणि वाहतुकीची कोंडी यामुळे एसटीच्या नियोजनावर पाणी फिरले. बसफेऱ्यांवर परिणाम झाल्याने महामंडळाला अपेक्षेपेक्षा १३ लाख रुपये कमी आर्थिक उत्पन्नावर समाधान मानावे लागले.

सटाणा-मालेगाव रस्त्यावर झाडांची कत्तल

$
0
0
रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली सटाणा- मालेगाव रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या झाडांची राजरोस कत्तल सुरू आहे. या बेकायदा तोडलेल्या वृक्षांची कटाई थेट सॉमिलमध्ये होत असताना वन विभाग मात्र याकडे बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे वृक्ष मित्रांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

भटकंती पाण्यासाठी

$
0
0
बाजार समितीला लाखो रुपयांचे उत्पादन मिळवून देणाऱ्या शेतकऱ्यालाच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सटाणा बाजार समिती आवारात पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.

कांद्या​ने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

$
0
0
दोन महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या कांद्याने आता शेतकऱ्यांच्या डोळयात पुन्हा अश्रू आणले आहेत. मंगळवारी १०० रुपयांनी कांदा घसरला. सटाण्यात प्रतिक्विंटल ६00 रुपयांनी कांदा विकला गेला.

नंदुरबारमध्ये साकारणार कम्युनिटी कॉलेज

$
0
0
नंदुरबारमधील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एकलव्य प्रशिक्षण केंद्रामध्ये कम्युनिटी कॉलेज सुरू करण्यासाठी राज्य सरकारमार्फत मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास विभागाच्या सूचनेनुसार हे कॉलेज सुरू केले जाणार असून राज्यात अन्य १० ठिकाणीही अशी कॉलेजेस सुरू केली जाणार आहेत.

नाशिकरोडला टपरीधारकांचा बंद

$
0
0
नाशिक महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला सुरवात करणार असल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा हॉकर्स व टपरीधारक युनियनच्यावतीने मंगळवारी नाशिकरोजमध्ये बंद पाळण्यात आला. टपरीधारकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिल्याने प्रमुख रस्ते व बाजारपेठांतही शुकशुकाट होता.

सेट टॉप बॉक्स विक्रीत फसवणूक

$
0
0
केबलचे वार्षिक व सहामाही भाडे कंपनीस जमा करण्याऐवजी स्वत:च्या फायद्याकरीता वापरून सुमारे पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राहुल तांगडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सप्टेंबर २०११ ते जून २०१३ दरम्यान सेट टॉप बॉक्सच्या विक्रीची किंमत ७५० रुपये ठरवून दिली असताना त्याने ग्राहकांकडून जास्त पैसे घेऊन त्यांची विक्री केली.

CCNS ला गाठायचाय मोठा पल्ला

$
0
0
सर्व पोलिस स्टेशन्सला ऑनलाइन जोडणारी सीसीटीएनएस यंत्रणा शहरातील सर्व पोलिस स्टेशन्समध्ये प्रायोगिक स्तरावर कार्या‌न्वित करण्यात आली आहे. ‌तिच्यामध्ये काही प्राथ‌मिक अडचणी येत असून त्यावर ११ पोलिस स्टेशनमध्ये ११ अधिकारी लक्ष ठेऊन आहेत.

२० हजार नागरिकांकडून ‘अस्वच्छता’

$
0
0
शहरात अस्वच्छता करणाऱ्या २० हजार नागरिकांकडून वर्षभरात २८ लाख रूपये वसूल करण्यात आले आहे. अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेने गेल्यावर्षी ‘अमूल्य क्लिनअप’ संस्थेची नियुक्ती केली होती.

प्राध्यापकांनी स्वीकारलेच नाही बारावी परीक्षांचे सा‌ह‌ित्य

$
0
0
प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन देऊनही सरकार पुन्हा दुर्लक्ष करत असल्याच्या न‌िषेधार्थ यंदा बारावीच्या परीक्षांवर टाकलेल्या बह‌िष्कारावर ज्युन‌िअर कॉलेजचे प्राध्यापक ठाम आहेत. मंगळवारी व‌िव‌िध केंद्रांवर वाटप करण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा साह‌ित्याला हातही न लावण्याची भूमिका या प्राध्यापकांनी घेतली.

घरकुलातील अपहार दडपण्याचा प्रयत्न!

$
0
0
चुंचाळे शिवारातील घरकुलांच्या कामासंदर्भांत बेकायदेशीर​ ठेकेदाराला ५ कोटी ५५ लाख रूपये दिल्याबद्दल मुख्य लेखा परीक्षकांनी ताशेरे ओढले असून ही रक्कम स्थापत्य इंजिनीअरकडून वसूल करण्याची मागणी धनजंय तरटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

​ रेल्वे कर्मचाऱ्यांना हवे हक्काचे हॉस्प‌िटल

$
0
0
नाशिकरोडच्या रेल्वे कर्मचाऱ्यांना हक्काचे हॉस्पिटल नसल्याने दारोदार भटकावे लागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी हक्काचे हॉस्प‌िटल बांधावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. नाशिकरोड येथे वास्तव्यास असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी इगतपुरी येथे हॉस्प‌िटल बांधण्यात आले; परंतु तिथे अत्याधुनिक सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांना भुसावळ किंवा मुंबर्इला जावे लागत असून रुग्णांचे हाल होत आहेत.

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या सुविधांना चाप

$
0
0
राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना बंद करण्याचा निर्णय अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत घेतला आहे. यामुळे शहरातील जवळपास २० हजार विद्यार्थी प्रोत्साहन भत्ता व गणवेश यासारख्या लाभापासून वंचित राहणार आहेत.

८२ अस्थायी पदांना मुदतवाढ

$
0
0
जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेच्या (सीडीओ) कार्यालयातील ८२ अस्थायी पदांना सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. नाशिकच्या सीडीओचा आकृतीबंध सरकारने निश्चित केलेला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images