Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वन-वे कागदावरच

0
0
शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुढे आलेला वन-वेचा पर्याय कागदावरच राहत असल्याचे पहावयास मिळत आहे. सहा मार्ग सकाळी नऊ ते रात्री नऊ यावेळेत वन-वे म्हणून वापरात येतील असे आदेश पोलिस आयुक्तांनी काढल्यानंतरही मंगळवारी तेथे सर्रास दुहेरी वाहतूक सुरू असल्याचे पहावयास मिळाले.

‘स्थायी’ वर लोकसभेचा प्रभाव

0
0
महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार असून, नवीन सदस्यांची मार्च महिन्यात नियुक्ती होणार आहे. मागील वर्षी शिवसेनेच्या मदतीने स्थायी समितीच्या चाव्या ताब्यात घेणाऱ्या मनसेसाठी आगामी लोकसभा निवडणुका ‘अडचणीच्या’ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ATM कार्डधारकांनो सावधान!

0
0
बँकेच्या ग्राहक सेवाकेंद्राचे अधिकारी आहोत अशी बतावणी करीत व्हाईट कॉलर चोरट्यांनी नागरिकांच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारण्याची नामी युक्ती शोधून काढली आहे.

छोट्या घरांसाठी कायद्याचा अडसर

0
0
स्वस्त आणि छोट्या सदनिका तयार करण्यात कायदेशीर अडथळा असून यासाठी मंजूर विकास नियंत्रक व नियमावलीमध्ये बदल करण्याची मागणी आयुक्त संजय खंदारे यांच्याकडे करण्यात आली आहे. महापालिकेने यासाठी पुढाकार घेतल्यास स्वस्तातील घरे सर्वसामन्यांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

वर्षभरात IT उद्योग बहरणार

0
0
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) अंबड औद्योगिक वसाहतीत वितरित केलेल्या १८ भूखंडांवर आयटी उद्योग वर्षभरात कार्यन्वित होणार आहे. परिणामी, नाशिकच्या आयटी उद्योगाला चालना मिळणार आहे. अनेकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.

नामी शक्कल

0
0
शहरात सध्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरु आहे. त्याचे पडसाद सगळीकडेच उमटत असून अनेक राजकीय पक्षांनी या संधीचा फायदा घेणे सुरु केले आहे. एका राजकीय पक्षाकडून बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यांत्रिकीकरणाच्या वाटेवर

0
0
बांधकाम उद्योग हा देशातल्या सर्वच क्षेत्रामध्ये वीज, पाणी, रोड आदिंसाठी अग्रेसर आहे. त्यामुळे सरकारने वेगवेगळ्या योजनांमध्ये BOT, PPP, DBFOT इतर सरकारी धोरणांमधून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमधून प्रोत्साहन देऊन बांधकाम क्षेत्रात वेगळीच भरारी घेतली आहे.

सप्तशृंग गड घाट बनलाय धोकादायक

0
0
सप्तशृंग गडावरील घाटात दिशादर्शक फलकांची दुरवस्था झाली असून संरक्षक कठडे ढिसाळ झाले आहेत. दि.२८ जानेवारी रोजी घाटात जीप कोसळून तीन जण प्राणाला मुकले. असे असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल वसूल करणारी कंपनीचे घाटातील सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.सप्तशृंग गडावरील घाटात अनेक ठिकाणी कठडे नाहीत.

केळझर धरणातून सिंचनासाठी आवर्तन

0
0
केळझर धरणातून शेती सिंचनासाठी पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे आरम नदी काठावरील गावांनी समाधान व्यक्त केले असून पिण्याच्या पाण्याबरोबरच हजारो हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

औद्योगिक वसाहतीत रस्ते बनले `पार्किंगस्टॅण्ड`

0
0
सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत रस्त्यांवर उभ्या राहणारे कंटनेर, ट्रेलर यांच्याबरोबरच कंपन्यांच्या गेटवर रस्त्यांच्या दुर्तफा दुचाकींच्या रांगा लागत आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी मुख्य रस्त्यावरच पार्किंगची व्यवस्था केल्याने रहदारीला अडथळा होत आहे. विशेषकरुन मोठ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्ह्याचे फॉरेस्ट कलेक्टर व्हा

0
0
आयएएस आणि आयपीएस होण्याचे स्वप्न अनेक जण उराशी बाळगतात. मात्र, या दोन्ही सेवांसारखाच दर्जा असलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची फारशी ओळख मराठी विद्यार्थ्यांना नाही. त्यामुळेच या सेवेत मराठी टक्का फारसा दिसत नाही. पर्यावरणक्षेत्रातील आगामी आव्हाने पाहता आयएफएस मध्ये येवून स्वतःचे करिअर करण्यासह देशासाठीही काम करण्याची संधीही मिळणार आहे.

प्रदूषण ठरतेय वटवाघुळांसाठी हानिकारक

0
0
सर्वत्र दुर्मिळ होत चाललेल्या वटवाघुळांचे सटाणा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातील जुनाट झाडांवरील वास्तव्य अजून कायम आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागातील आणि राज्यमार्गाला लागून असलेल्या या परिसरातील प्रदूषण वाढले आहे. यामुळे वटवाघुळांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे.

धूर पडला १२ लाखांना!

0
0
रस्त्यांवर धूर ओकणारी ३१३५ वाहने प्रादेशिक परिवहन विभागाला आढळून आली आहेत. त्यापैकी २५४२ वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात विभागाला यश आले आहे. कारवाईला दाद न देणाऱ्या उर्वरित ५९३ वाहनधारकांना नोटीस बजाण्यात आल्या आहेत. या कारवाईंतर्गत ११ लाख ८९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

‘साधुग्राम’बाबत विशेष महासभेचे आयोजन

0
0
साधुग्रामसाठी संपादीत करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबादल्यात देण्यात येणाऱ्या टीडीआरबाबत चर्चा करण्यासाठी पुढील ​आठवड्यात विशेष महासभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर अॅड. यतीन वाघ यांनी महासभेदरम्यान केली.

त्र्यंबकची फलकबाजी चव्हाट्यावर

0
0
त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीवर करण्यात आलेल्या कॉँक्रिटीकरणाचा मुद्दा चांगलाच तापला असून याप्रकरणी काँक्रिटीकरणास विरोध असलेल्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाल्याची बाब पुढे आली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून हा प्रश्न कोर्टातही असल्याने त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

व‌िव‌िध मागण्यांसाठी व‌िद्यार्थ्यांचा मोर्चा

0
0
बारावीच्या परीक्षा न‌िर्व‌िघ्नपणे पार पडाव्यात, यातील पूर्वन‌ियोज‌ित वेळापत्रकात ब‌िघाड व्हायला नको यासह व‌िव‌िध मागण्यांसाठी व‌िद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाने कलेक्टर ऑफ‌िसचा परिसर दणाणला. महाराष्ट्र राज्य व‌िद्यार्थी व‌िकास सम‌ितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन केले होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना जोर

0
0
महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून मनसेने शहरातील रस्ते, पूल, समाजमंदीर यासारख्या कामांना श्रीगणेशा केला. मनसेच्या या कार्यक्रमांना 'निवडणूक स्टंट' म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही शहरातील विकासकामांना सुरूवात केली आहे. खासदार समीर भुजबळ यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या विविध सभागृहांच्या उद्घाटनासह रस्ते व व्यायामशाळा भूमिपुजन कार्यक्रमांचा धडाका राष्ट्रवादीतर्फे लावण्यात आला आहे.

माजी संचालकांवर दावा दाखल

0
0
श्रीराम सहकारी बँकेचे अवसायक आणि मायको एम्प्लॉईज सोसायटीच्या माजी संचालकांवर दाखल करण्यात आला आहे. यासंबंधीचा ठराव सोसायच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता.

अनधिकृत होर्डिंग्जचा ‘भार’ सर्वसामान्यांवर

0
0
गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या जाहिरात धोरणाची अंमलबजावणी करण्यात प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे जागोजागी अनधिकृत होर्डिंग्जचे पीक तयार झाले. अधिकाऱ्यांनी पैसे खाण्यात धन्यता मिळविल्याने त्याचा भार आता सर्वसामन्यांवर पडत असल्याची टीका विरोधकांनी महासभेच्या चर्चेदरम्यान केली.

PG अभ्यासक्रमाच्या करारास अखेर मान्यता

0
0
महापालिका आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यात मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतच्या करारास अखेर महासभेने बुधवारी मंजुरी दिली. महापालिकेच्या हॉस्पिटलमधील पेशंटवर उपचार करतानाच पदव्युत्तर शिक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुमारे अडीच ते तीन वर्षापूर्वी महापालिकेकडे प्रस्ताव पाठविला होता.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images