Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अखेर सोनवणे कुटुंबियांना न्याय

$
0
0
मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या हत्याकांडाला तब्बल तीन वर्षे उलटल्यानंतर सरकारने त्यांच्या कुटुंबियांना न्याय दिला आहे. सोनवणे यांच्या पगाराइतकी रक्कम त्यांच्या कुटुंबियांना दरमहा दिली जाणार आहे.

मराठा आरक्षणासाठी गावांचे सर्वेक्षण

$
0
0
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत प्रत्येक जिल्ह्यातील १० टक्के गावांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून या सर्वेक्षणाला प्रारंभ होणार असून २५ फेब्रुवारीपर्यंत त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.

तीस हजार विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार

$
0
0
जागतिक सूर्यनमस्कार दिन, रथसप्तमी व युवा सप्ताहानिमित्त गुरूवारी शहराच्या विविध भागात सूर्यनमस्कार घालण्यात आले. यावेळी तीस हजार विद्यार्थ्यांनी भाग घेऊन नियमित सूर्यनमस्काराचा संकल्प केला.

पुन्हा एकदा भारत बनेल विश्वगुरू!

$
0
0
श्री श्री रविशंकर यांनी स्थापन केलेल्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' परिवारात गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ ऋषी नित्यप्रज्ञाजी कार्यरत आहेत. 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय शिबिरांमधून त्यांनी आजवर लक्षावधी लोकांना आनंदी जगण्याची सूत्रे शिकवली आहेत.

वीज कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढ

$
0
0
लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी वीज कर्मचाऱ्यांना पगारवाढीची खूषखबर मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वीज कामगारांच्या पगारवाढीबाबत वीज कंपनीतील प्रमुख आठ संघटनांची कृती समिती स्थापन करण्यात आली असून तिची प्रकाशगड येथे व्यवस्थापनासह बैठक झाली.

ग्रंथपाल आणखी संभ्रमात

$
0
0
ग्रंथपालांच्या च‌िवट लढ्यानंतरही केवळ माह‌िती गोळा करण्याचा फार्स सरकार उभे करते आहे. वेतन न‌िश्च‌िती आण‌ि सुधारीत वेतनश्रेणी अद्यापही न‌िश्च‌ित केलेली नसताना ग्रंथपालांच्या गोळा केलेल्या माह‌ितीचे फल‌ित सरकार दरबारी काय येणार, असा सवाल ग्रंथपालांनी उपस्थ‌ित केला आहे.

गोदाघाट : उशिरा सुचलेले शहाणपण

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. मात्र, त्याचे तितके सोयरसुतक प्रशासकीय यंत्रणेला नसल्याचे दिसून येते. प्रत्येकवेळी प्रधान सचिव किंवा मुख्यमंत्र्यांनी ‘धक्का’ दिल्याशिवाय योजनेला गती मिळत नाही अशी परिस्थिती तयार होत आहे.

बारावीच्या रिसीटमध्ये चुका

$
0
0
ऐन परीक्षेच्या तोंडावर शेकडो रिसीटवरील चुकलेल्या संदर्भांमुळे व‌िद्यार्थी संतपाले आहेत. या चुकांमधील दुरुस्तीच्या मागणीसाठी गुरुवारी काहींनी बोर्डाच्या ऑफ‌िसकडे धाव घेतली तर मनव‌िसेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यपद्धतीचा न‌िषेध नोंदव‌ित ठ‌िय्या आंदोलन केले.

महापालिकांमध्ये मुरतेय ‘पाणी’

$
0
0
राज्यातील महापालिकांकडून घरपट्टी आणि पाणीपट्टी बिलांची वसुली योग्य पद्धतीने होत नसल्याचा ठपका महालेखापरीक्षकांच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. २०११-१२ या वर्षांत घरपट्टी बिलांची अवघी ३१ तर पाणीपट्टीची अवघी ४१ टक्के वसुली झाली आहे.

महापौर चषक दोन वर्षात एकदाच

$
0
0
येणाऱ्या महापौर चषकाचे आयोजन दोन वर्षांनी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आर्थिक तरतुदीकडे बोट दाखवून या वर्षीच्या महापौर चषकाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे.

पक्षनिष्ठा !

$
0
0
गेल्या काही काळापासून वादात असलेल्या नाशिक काँग्रेस शहराध्यक्षपदावर अखेर नगरसेवक अश्विनी बोरस्ते यांची नियुक्ती झाली. पदभार स्विकारणार कधी असाही प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे पक्षांतर्गत अनेक वादविवाद यानिमित्ताने पुढेही आले.

जॉगिंग, फिट राहण्याचा नवा मार्ग

$
0
0
गेल्या चार-पाच वर्षांपासून नाशिककरांच्या तोंडी एक नवीन शब्द रुळला आहे तो म्हणजे 'जॉगिंग'. सकाळी लवकर उठून छानपैकी आवरत बरीच मंडळी जॉगिंगला जातात. परिणामी जॉगिंग नाशिकमधलं नवं कल्चर झालं आहे.

नाशिककर अनुभवणार पुरातन खाद्यसंस्कृती

$
0
0
जुन्या काळातील कोकणी किंवा मुगलई पदार्थ मिस करणाऱ्या खाद्यशौकींना लवकरच पुरातन पदार्थांची चव अनुभवता येणार आहे. मुळचे नाशिककर मात्र सध्या औरंगाबादच्या हॉटेल इंडस्ट्रीत दबदबा निर्माण करणारे हॉटेल 'मॅनोर'चे संजय दाणी हे 'फूड फेस्टिव्हल'द्वारे नाशिककरांना पुरातन काळातील कोकणी व मुगलई पदार्थांची सफर घडवणार आहेत.

कुपमंडूकतेच्या परिसीमा पुसून टाका

$
0
0
सक्षम आण‌ि सर्वांगाने व‌िकस‌ित असणाऱ्या समाजाचे शक्तीकेंद्र केवळ स्त्री आहे. तर, या बलवान समाजाची द‌िशा युवक आहे. परंपरांचा अपभ्रंश आण‌ि त्यातून न‌िर्माण होणारा न्यूनगंड यामुळे देशाचे बलस्थान असणारे हे घटक प्रसंगी दबले जातात. या घटकांच्या पुनरुत्थानासाठी त्यांच्या अंतरीच्या जाणीवांना साद घालण्याचे ऋषीपरंपरेतील राष्ट्रकार्य अव‌िरत सुरु आहे.

मार्केटला व्हॅलेंटाईनचा फिव्हर !

$
0
0
फेब्रुवारी महिना म्हटला की तरुणाईमध्ये जल्लोष भरतो तो व्हॅलेंटाईनच्या फिव्हरमुळे. १४ फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस हटके सेलिब्रेट करण्यासाठी आठवडाभर आधीच तयारी सुरू होते. यंदाही व्हॅलेंटाईनसाठी मार्केट बहरले असून यंगस्टर्सच्या आवडीप्रमाणे ट्रेंडी गिफ्ट्स दाखल झाल्या आहेत.

उन्हाळी फळे 'भाव' खाणार

$
0
0
यंदा थंडीचा मुक्काम आणखी काही दिवस राहण्याची शक्यता असली तरी बाजारात रसाळ फळांची आवकही सुरू झाली आहे. संत्री, मोसंबी, खरबूज व टरबूज बाजारात दाखल झाले असून, मागणीही हळूहळू वाढत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

मूलभूत सुविधांची वानवा

$
0
0
नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गंगापूररोड व कॉलेडरोडवरील भाड्याच्या जागेत असलेल्या पोस्ट ऑफिसमुळे सर्वच त्रस्त आहेत. जागेची कमतरता असल्याने पोस्टमन, कर्मचारी यांच्याबरोबर ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये पिण्याचे पाणी व सुलभ शौचालय नसल्याने पोस्ट कर्मचाऱ्यांची अडचण होते.

कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य हवे

$
0
0
कारखान्यांमध्ये काम करताना कामगारांच्या सुरक्षेला प्राध्यान्य देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिंद्र अॅण्ड महिंद्रचे उपाध्यक्ष हिरामण आहेर यांनी केले.

गंगापूर धरणावर सावळा गोंधळ

$
0
0
नाशिक शहरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी गंगापूर धरणाच्या बाजूला बोटक्लबचे काम सुरू आहे. परंतु, पर्यटन विभागाच्या या बांधकामासाठी संबंधित ठेकेदाराने स्वतंत्र वीज जोडणी न घेता जलसिंचन विभागाच्या कनेक्शनमधून वीज वापरण्याचा सपाटा लावला असल्याचा संशय परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

येशू यात्रास्थळ सुरक्षेचा आढावा

$
0
0
बाळ येशूची यात्रा आज (ता. ८ ) पासून नाशिकरोडच्या सेंट झेवियर्स शाळेच्या परिसरात सुरू होत आहे. भारतात सर्वांत प्रथम स्थापन झालेल्या या मंदिरात दशर्नासाठी देशभरातून दोन लाखावर भाविक येणार असल्याने पोलिसांनी सुरक्षेच्यादृष्टीने आज कसून तपासणी केली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images