Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रिक्षा परवान्यांसाठी प्रतिसाद कमीच

$
0
0
तब्बल १६ वर्षांनी रिक्षा परवान्यांच्या वाटपासाठी अर्ज निघूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रादे‌शिक परिवहन विभागाची निराशा झाली आहे. दहा दिवसांत नाशिकमध्ये ३ हजार जणांनी तर मालेगावात १४५ जणांनी परवान्यांसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत.

जीडीसी अँड ए परीक्षा मे मह‌िन्यात

$
0
0
राज्य सरकारच्या सहकार खात्याच्या वतीने घेण्यात येणारी गव्हर्न्मेंट ड‌िप्लोमा इन को-ऑपरेशन अॅण्ड अकौंटन्सी (जीडीसी अँड ए) परीक्षेचे आयोजन २४ ते २६ मे या कालावधीत करण्यात आले आहे.

यापुढे तडजोड शुल्काची सक्ती नाही

$
0
0
तडजोड शुल्क भरण्याची सक्ती न करता परवाना निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याने हे टाळण्यासाठी वाहनधारकांनी वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण मुदतीत करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे 'मिशन लोकसभा'

$
0
0
नाशिकची खासदारकी कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली असून लोकसभा निवडणुकीच्या तयारीनिमित्त मेळावे व बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रभागनिहाय मेळावे तसेच सर्व सेलच्या बैठका घेण्याचे ठरवत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश पक्षातर्फे देण्यात आले आहेत.

एअर व्हॉल्व खराबीमुळे पाण्याची नासाडी

$
0
0
गोविंदनगर परिसरातून जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरील एअर व्हॉल्वमध्ये खराबी निर्माण झाल्यामुळे लाखो लीटर पाणी वाहून गेले. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याने तातडीने काम हाती घेतल्याने पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुरस्कारापेक्षा कामाची दखल महत्त्वाची

$
0
0
आपल्याकडे लोकशाहीने निर्माण केलेली व्यवस्था मजबूत आहे. आपल्याकडील कायद्यांमुळे आणि तरतुदींमुळे कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतो, असे प्रतिपादन भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

प्रदूषण ठरतेय वटवाघुळांसाठी हानिकारक

$
0
0
सर्वत्र दुर्मिळ होत चाललेल्या वटवाघुळांचे सटाणा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातील जुनाट झाडांवरील वास्तव्य अजून कायम आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागातील आणि राज्यमार्गाला लागून असलेल्या या परिसरातील प्रदूषण वाढले आहे. यामुळे वटवाघुळांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे.

जळगावच्या २५ डाळ मिल्सला संजीवनी

$
0
0
काही वर्षांपूर्वी जळगाव शहरात डाळ प्रक्रिया उद्योग बहरला होता. मात्र, डाळींची निर्यात बंद केल्यामुळे यातील ४० डाळ मिल बंद पडल्या होत्या. मात्र, आता सरकारने निर्यातबंदी उठविल्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून बंद पडलेल्या ४० मिल्सपैकी २५ मिल्स पूर्ववत सुरू होणार आहेत.

उत्तर विभागाकडे नाही टोलवसुलीचे अपडेटस्

$
0
0
जळगाव जिल्ह्यात चार ठिकाणी टोल वसुली होत असून, या बाबतची अद्ययावत माहितीच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तर विभागाकडे नसल्यामुळे या खात्याचा हलगर्जीपणा समोर आला आहे. तथापि, जळगाव विभागाकडे सर्व माहिती उपलब्ध असल्याचे दिसून आले.

रोजगार मेळाव्याचे आयोजन

$
0
0
ज‌िल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र आण‌ि औद्योग‌िक प्रश‌िक्षण संस्था, उमराळे यांच्या वतीने मंगळवारी (द‌ि.११) एक द‌िवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

केळझरच्या पाण्यावरून संघर्ष

$
0
0
धरणातून खाजगी मालकीच्या पाईपलाईनला परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याने केळझरचे पाणी पुन्हा एकदा पेटले आहे.

‘भुजबळांना विचारांचा लकवा मारलाय का’

$
0
0
'राज्यात आपली सत्ता असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात आपल्याकडे बघायला तयार नाही. पालकमंत्री छगन भुजबळ मनमानी कारभार करतात, आमच्या जीवावर सत्ता उपभोगत असतानाही काँग्रेसच्या मतदारसंघातील कार्यक्रमात काँग्रेसच्याच पदाधिका-यांना वगळतात' असे आरोप करत 'एरवी वैचारीक गप्पा मारणा-यांच्या विचारांना लकवा मारलाय का' असा टोला सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी 'राष्ट्रवादी'सह पालकमंत्री भुजबळ यांना लगावला.

आमच्या अस्तित्वाला आव्हान देऊ नका

$
0
0
'खालचा थर लावल्याशिवाय हंडी फोडता येत नाही, नाशिकमध्ये खालचा थर काँग्रेसचा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला सतत गृहीत धरून आमच्या अस्तित्वाला धक्का देऊ नका' असे थेट आव्हान देत काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार भाई जगताप यांनी 'राष्ट्रवादी'वर शरसंधान साधले आहे.

पालिकेचा रोगापेक्षा इलाज भयंकर

$
0
0
महापालिका आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठात होणारा प्रस्तावित करार म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ या प्रकारातील असल्याची टीका अपक्ष आघाडीचे गटनेते गुरमीत बग्गा यांनी केली आहे.

मनसेचा 'पुणे पॅटर्न' नाशिकमध्येही

$
0
0
लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षातील संघटनात्मक बळकटी वाढविण्यासाठी 'मनसे'तर्फे(महाराष्ट्र नवनिर्माण सेना) कार्यकारिणी विस्तारावर भर दिला जातो आहे. नाशिक शहरातील मुख्य कार्यकारिणीपाठोपाठ महिला सेनेची कार्यकारिणी 'मनसे'कडून जाहीर करण्यात आली आहे.

काँक्रिट काढा अन् स्लॅबही टाका!

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीचे पात्र काँक्रिटीकरणाद्वारे बंद करण्यात आल्याच्या प्रश्नाने आता वाद-विवादांचे स्वरुप प्राप्त केले असले तरी शिवसेनेच्या युवा सेनेने मात्र अजब मागणी करून त्यांची विद्वत्ता सर्वांसमोर आणली आहे.

तडकाफडकीची पनिशमेंट!

$
0
0
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी विलास पाटील यांची नियुक्ती होऊन अठरा महिन्यांचा कालावधी होत नाही तोच पाटील यांना वेटिंगवर जावे लागणे आणि बी राधाकृष्णन यांना नाशकात धाडण्यात येणे हा काही योगायोग नाही.

घाईघाईत मराठा समाजावर अन्याय?

$
0
0
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षणासंदर्भात जलद सर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला असला तरी अशा प्रकारच्या जलद कारभारातून मराठा समाजावर अन्याय होणार का, अशी शंका उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, सरकारी अधिकाऱ्यांनीही या सर्वेक्षणाबाबत साशंकता उपस्थित केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

$
0
0
राज्य सरकारने जिल्हाधिकारी विलास पाटील यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली केली असून जालना जिल्हा परिषदेचे सीईओ बी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, पाटील यांना कुठलीही नियुक्ती देण्यात आलेली नसून त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.

घरासाठी गरिबांना नरकयातना

$
0
0
‘लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’ असे गमतीने म्हटले जाते. मात्र यातील गांभीर्य लग्न करणाऱ्यास आणि घर बांधणाऱ्यास नक्कीच कळते. पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेला मात्र यातील गांभीर्यापेक्षा कोट्यवधी रुपयांच्या निधीत रस असल्याने आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर असलेल्या हजारो नागरिकांना छळछावणीत अक्षरशः जीवंतपणीच नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images