Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विभागातून पकडले २६ कॉपीबहाद्दर

0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणा-या बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागातून २६ कॉपीबहाद्दर पकडण्यात आले. हिंदीच्या पेपरला मात्र नाशिकमधून एकही कॉपीबहाद्दर सापडला नाही.

नाशकात आज पहिले कृषी साहित्य संमेलन

0
0
महाराष्ट्र सरकारचा कृषी व पणन विभाग आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आज, रविवार २४ फेब्रुवारी रोजी पहिले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन होत आहे.

ये पब्लिक है बाबू...

0
0
चित्रपटाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्रभर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात नाशिकपासून करण्यात आली. कोणत्याही नियोजनाशिवाय हा कार्यक्रम घेतल्याने येथे प्रथमग्रासे मक्षिकापात म्हणावा असे वातावरण निर्माण झाले.

नाशिकच्या विकासाला खरे धुमारे फुटायचेत

0
0
'नाशिकमध्ये पोटेन्शिअल ठासून भरलयं. नाशिक-पुणे आणि मुंबई या सुवर्णत्रिकोणाच्या उभारल्या जाणाऱ्या चित्रापेक्षाही मुंबई-दिल्ली कॉरिडॉरच्या कार्याला जसजसा वेग मिळेल तसतसे नाशिकच्या विकासाला खरे धुमारे फुटतील.

अद्ययावत बसस्थानकांची पायाभरणी

0
0
ग्रामीण भागातल्या बसस्थानकांचे दशावतार थांबवण्यासाठी एसटीच्या स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री निधीतून सटाण्यात अद्ययावत बसस्थानक उभारण्यात आले आहे.

भटकरांच्या सहवासात

0
0
महिरावणीत जन्माला आलेल्या 'द एज्युकेशन ऑन व्हील' अर्थात फिरत्या शाळेला नुकतीच सुपर कम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर यांनी भेट दिली. गेल्या वर्षभरापासून ही फिरती शाळा आसपासच्या आठ खेड्यांमध्ये जाऊन गोरगरीब मुलांना शिक्षण देत आहे.

मुलीचा विनयभंग; एकाला अटक

0
0
सिडको परिसरातील मोरवाडी येथील नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी एका युवकास अटक केली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास पंडीतनगरमधील मंदिरात झाली होती.

सक्षम मंजुरी; एसीबीला डोकेदुखी

0
0
एसीबीने लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडूनही सक्षम मंजुरीच्या अभावी प्रशासनाकडून पुढील कारवाईचे घोंगडे भिजत ठेवण्याचा प्रकार कायमच घडतो आहे.

किती ही सुस्तता!

0
0
अवघ्या दोन वर्षावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला एव्हाना सुरुवात व्हायला हवी होती. प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनासह महापालिका आणि अन्य तत्सम संस्था कागदी घोडे नाचविण्यापलिकडे काहीही करताना दिसत नाही.

नाशिकमध्येही 'एकच वादा' ?

0
0
नाही म्हटलं तरी पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमधील नेते त्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून निवडणूकपूर्व चाचपणी करताहेत.

खाणी, खडीक्रशरवरील बडगा बांधकाम उद्योगाच्या मुळावर

0
0
जिल्ह्यातील गौण खनिजाच्या खाणी आणि खडी क्रशर महसूल विभागाने सील केल्याने जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय अडचणीत सापडला आहे. राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या नाशकात मोठ्या संख्येने सुरू असलेली बांधकामे कचाट्यात सापडल्याने या व्यवसायातील सर्वांवरच गदा आली आहे.

सिडको, सातपूरमध्ये पाणीपुरवठा खंडीत

0
0
गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशनमध्ये शुक्रवारी अचानक बिघाड झाल्याने शनिवारी सिडको आणि सातपूर परिसरातील पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे मोठे हाल झाले.

गोदाप्रदूषण निमूर्लनासाठी नाशिककरांचा अलाहाबाद दौरा

0
0
दक्षिणवाहिनी असणाऱ्या गोदावरीची प्रदूषणामुळे होणारी दुरवस्था रोखण्यासाठी शहरातील गटारीकरण विरोधी मंचच्या सदस्यांनी अलाहाबादला भेट दिली. तेथे त्यांनी प्रशासन, साधू संतांचे आखाडे आणि पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांशी संवाद साधत गोदेचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजनांची माहिती घेतली.

इंग्रजीच्या पेपरला कॉपी... छे !

0
0
बारावीच्या परीक्षेत मराठी विषयाच्या पेपरला पहिल्याच दिवशी नाशिक विभागातून तब्बल ४३ कॉपीबहाद्दर भरारी पथकाच्या हाती लागले. मात्र इंग्रजीच्या पेपरला विभागातून अवघे ३० कॉपीबहाद्दर पथकाच्या हाती लागले.

रासबिहारीवर उपसंचालकांचा बडगा

0
0
खासगी व विनाअनुदानित तत्त्वात रासबिहारी शाळा येत असल्याने ती उपसंचालकांच्या अखत्यारीत येत नाही. यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालय आमच्या शाळेची फी ठरवूच शकत नाही, या आशयाचे पत्रक शाळेने पालकांना दिल्यानंतर उपसंचालक कार्यालयाने शाळेवर बडगा उगारला आहे.

स्वतंत्र जलस्रोत असल्यास नव्या बांधकामांना परवानगी

0
0
बांधकाम क्षेत्रासाठी होणारा मुख्य जलस्रोतांचा वापर तातडीने थांबवून जुलैपर्यंत बोअरिंगसारखे पाण्याचे स्वतंत्र स्रोत असलेल्या नव्या बांधकामांनाच परवानगी द्यावी, असे स्पष्ट निर्देश पालक सचिव थॉमस बेंजामिन यांनी शनिवारी महापालिकेला दिले. पाणीबचतीसाठी महापालिकेने जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.

देशातील कुलगुरूंसाठी मुक्त विद्यापीठात कृतीसत्र

0
0
देशाभरातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंसाठी मुक्त विद्यापीठात २६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग, कॅनडा, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे कृतीसत्र होत असल्याची माहिती कृतीसत्राच्या समन्वयक डॉ. अनुराधा देशमुख यांनी दिली.

निम्म्या जागा महिलांसाठी हक्काच्या!

0
0
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षणानंतर, महिलांना आता एसटी बसमध्येही अर्धा वाटा मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार १ मार्चपासून शहर बससेवेतील प्रत्येक बसमध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील.

पंढरपूर, इंदापूर परिसरात पाऊस

0
0
पंढरपूर आणि इंदापूर परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे द्राक्षे, डाळिंब आणि ज्वारी या पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. गेले दोन दिवस ढगांचा गडगडाट होऊन वादळी वारे वाहत होते.

रेंज असूनही 'आऊट ऑफ'

0
0
मोबाइलवर रेंज असूनही कॉल ड्रॉप, नेटवर्क जॅमसह नंबर अस्तित्वात नसल्याची धक्कादायक अनुभूती बीएसएनएलच्या नाशिककर ग्राहकांनी घेतली. शुक्रवारी मध्यरात्रीपासून नेटवर्कमध्ये झालेला हा बिघाड शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता दूर झाला आणि स्वतःच्या मोबाइलवर शंका घेणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images