Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भाड्याच्या गोडावूनमध्ये चालतो कारभार

$
0
0
नविन नाशिक म्हणून नव्याने ओळख झालेल्या सिडकोत पोस्ट ऑफिस सिडकोच्याच गोडाऊनमध्ये भाड्याने चालविले जात आहे. तसेच त्रिमूर्ती चौकातील पोस्ट ऑफिसच्यावर इमारतीला प्रवेशद्वारच नसल्याने मद्यपींचा अड्डा तयार झाला आहे.

तोरणानगरमधील रस्त्याची दुरवस्था

$
0
0
सिडकोतील सर्वात जुना असलेल्या तोरणानगरमधील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यातच वीस वर्षांपूर्वी केलेले रस्ते पूर्णपणे उखडले असून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. महापा‌लिकेने या भागाकडे लक्ष देण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद विस्मरणात

$
0
0
शहरात छोट्या-मोठ्या राजकीय नेत्यांपासून विविध व्यक्तींचे वाढदिवस, जयंती उत्साहात साजऱ्या होतात. मात्र ब्रिटीशकाळात डफ व तबल्याच्या तालावर जनमाणसांत स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या कवी गोविंद यांचा त्यांच्या १४० व्या जयंतीदिनी नाशिकसह संपूर्ण राज्याला विसर पडला आहे.

‘पुनद’चे निर्बंध उठणार

$
0
0
पुनद धरणासाठी संपादित करण्यात आलेल्या कळवण आणि देवळा तालुक्यातील ६८ गावांच्या जमिनींवर लादण्यात आलेले निर्बंध तब्बल १९ वर्षांनी उठविण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींची खरेदी-विक्री करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवीन वीजजोडणी ऑनलाइन करणे बंधनकारक

$
0
0
विजेची नवीन जोडणी मिळण्यात ग्राहकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महावितरणने ही जोडणी ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला खरा; मात्र याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याने महावितरणने यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची ‌कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

नवनवीन संकल्पना पहिल्यांदाच फेस्टिव्हलमध्ये

$
0
0
इंडिया ग्रेप हार्वेस्ट वाइन फेस्टिव्हल १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान होणार असून देशभरातील वायनरींनी यात सहभाग घेतला आहे. तसेच, केंद्रीय फळ प्रक्रिया मंत्रालयापासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळापर्यंत अनेकांनी त्यास पाठिंबा दिला आहे.

कर्जाचे आमिष, १९ महिलांना गंडा

$
0
0
अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून कर्ज काढून देतो म्हणून १९ महिलांना प्रत्येकी पाच हजारांचा गंडा घातल्याची तक्रार उपनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलरोड येथे राहणारे सूर्यकांत चिंतामण भालेराव आणि औरंगाबाद येथे राहणारे शितला सूर्यकांत भालेराव, शेषराव वामनराव नाठे यांनी द्वारका येथे राहणाऱ्या निर्मला मधुकर मोरे यांना कर्ज मिळवून देतो, असे सांगितले.

एसटी बस वाढविणार मानव विकास निर्देशांक

$
0
0
मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या बसेस वाढवून त्या आता ५५ केल्या जाणार आहेत. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला असून ग्रामीण विद्यार्थिनींना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

पो. आतील संदेशवहन यंत्रणा ठप्प

$
0
0
पोलिस आयुक्तालयातील वायरलेस विभागात शॉर्टसर्किटमुळे आग लागून व्हीसॅट (व्हेरी स्मॉल अॅपरचर टर्मिनल) सेंटर जळून खाक झाले. त्यामुळे पोलिसांची दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे.

इंडिया ग्रेप हार्वेस्ट १४ फेब्रुवारीपासून

$
0
0
वाइन शौकिनांसाठी पर्वणी असलेला इंडिया ग्रेप हार्वेस्ट वाइन फेस्टिव्हल येत्या १४ फेब्रुवारीपासून विंचूर वाइन पार्क येथे होणार आहे. या फेस्टिव्हलची तयारी जय्यत सुरू असून देशी-परदेशी पर्यटक या फेस्टिव्हलला हजेरी लावणार आहेत.

गुणाजींकडे वाइन पर्यटन धुरा?

$
0
0
राज्यात वाइन पर्यटनाला चालना आणि या पर्यटनाची सर्वांना ओळख करुन देण्यासाठी भटकंतीकार, अभिनेता मिलिंद गुणाजी यांना ब्रँड अॅम्बेसेडर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव वन पर्यटन सल्लागार समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.

क्रिकेटवर सट्टा लावणारे अटकेत

$
0
0
क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या चार जणांना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून बेटिंगसाठी वापरण्यात आलेले साहित्य व रोकड जप्त करण्यात आली आहे.

बोर्डाने दुरुस्तीचा भुर्दंड केला रद्द

$
0
0
बारावीच्या शेकडो ओळखप‌त्रांमध्ये बोर्डाकडूनच घोळ झाल्यानंतर त्याची श‌िक्षा ज्युन‌िअर कॉलेजेसने व‌िद्यार्थ्यांनाच देऊ केली. कॉलेजेसच्या या भूमिकेचा जोरदार न‌िषेध करीत व‌िद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यम‌िक आण‌ि उच्च माध्यम‌िक बोर्डाच्या व‌िभागीय कार्यालयाकडे धाव घेतली.

स्मारकाच्या फक्त घोषणाच

$
0
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाबाबत राज्य सरकार केवळ फसव्या घोषणा करत असल्याचा आरोप करत स्मारकासाठी सरकारने पर्यावरण विभागाची आवश्यक परवानगी तरी घेतली आहे का? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

नाशिक-चिंचोली अंधारात

$
0
0
सिन्नरकडून नाशिककडे येणाऱ्या क्रेनने चिंचोली फाट्याजवळ उच्चदाब वाहिनीच्या खांबाला धडक दिल्याने शुक्रवारी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. हा पुरवठा शनिवारी संध्याकाळपर्यंत सुरळीत न झाल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. याबाबत क्रेन चालकाविरुद्ध नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे.

मन आणि बुद्धी चित्रात झाली एकरुप

$
0
0
सध्याच्या धकाधकीच्या युगात आपल्या दैनंदिन कामातून, धावपळीतून शांतता, एकांत मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण सध्याच्या परिस्थितीत ते शक्य होत नाही. याच ताणतणावातून मुक्त होण्यासाठी आपण निसर्गाचा आधार शोधत असतो. पण

फॅशनेबल फूटवेअरचा जमाना!

$
0
0
फॅशन म्हणजे फक्त फॅशनेबल किंवा डिझायनर कपडे नाही, तर अॅक्सेसरीजपासून अगदी फूटवेअरपर्यंतच्या फॅशनचाही समावेश आहे. आजकालच्या फॅशन डिझाइनर्सचा कल एक परिपूर्ण लूक देण्याकडे असतो.

बालनाट्य स्पर्धेची अंत‌िम फेरी कालिदासमध्ये

$
0
0
महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे संपूर्ण राज्यात ११ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा आयोजीत केली होती. या स्पर्धांमधून प्राथमिक फेरीत प्रवेश केलेल्या नाटकांच्या अंत‌िम स्पर्धा १० ते १४ फेब्रुवारी कालिदास कलामंदीरात सादर होणार आहे.

भारताचा मेरुदंड अध्यात्मच

$
0
0
‘प्रत्येक राष्ट्राचा एक मेरुदंड असतो. त्या देशाची संस्कृती आण‌ि सभ्यता ट‌िकव‌िणारा हा मेरुदंड दुभंगला तर त्या राष्ट्राचा मृत्यू अटळ असतो. भारताचा मेरुदंड अध्यात्म‌िक ऊर्जा आहे. ही ऊर्जा जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रकार्यात योगदान हवे,’ असे आवाहन पुण्यातील रामकृष्ण मठाचे प्रत‌िन‌िधी स्वामी बुध्दानंद यांनी केले.

सुमितच्या जादूवर मलाईका खूश!

$
0
0
जगभरातील जादूगारांना त्याच्या जादूच्या ट्रिक्स हव्या असतात. मलाईका, मुग्धा गोडसे अशा अनेक स्टार कलाकारांनाही ज्याच्या जादूने भुरळ घातली आहे, असा हा अफलातून जादूगार जळगावचा तरुण उद्योजक आहे यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. हा तरुण आहे जळगावातील महावीर पॅकेजिंग कंपनीचा संचालक.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images