Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गौतम छात्रालयात विद्यार्थ्यांचे हाल

$
0
0
देवळाली गावातील गुलाबवाडी भागात असलेल्या गौतम छात्रालयात मूलभूत सुविधांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर मुलांचा आहार व आरोग्याकडे संस्थेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत.

राज्यातील कोतवालांचे बेमुदत उपोषण

$
0
0
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत चतुर्थ श्रेणीबाबत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

लोककलेच्या संवर्धनासाठी शिक्षण महत्त्वाचा घटक

$
0
0
‘तमाशा या लोककलेला उज्ज्वल परंपरा लाभली असून, या कलाप्रकाराला वेगळी अशी ओळख न मिळाल्याने समाजात या कलाप्रकाराविषयी आजही चुकीचा समज आहे. या लोककलेच्या संवर्धन व संरक्षणासाठी शिक्षण हा घटक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

बालनाट्य स्पर्धा फुलवतेय व्यक्त‌िमत्त्व

$
0
0
बालनाट्य म्हटलं की लहान मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ ही साधी व्याख्या. पण, यातील कलाकार आपली भूमिका निभावताना त्यात हरखून जात आहेत. यातून या चिमुकल्यांच्या भावविश्वाला असंख्य पैलू पाडण्याची आणि व्यक्त‌िमत्त्व घडविण्यात महत्त्वाची भूमिका पारपाडत असल्याचे दिसत आहे.

संघवी इंज‌िन‌ीअरींग धूम

$
0
0
म्हसरुळ येथील संघवी कॉलेज ऑफ इंज‌िन‌ीअरींगमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या ‘डे’ज् ची सांगता गॅदरींगने झाली. तरुणाईने व‌िव‌िध कलागुणांचा आव‌िष्कार सादर करीत परशुराम सायखेडकर सभागृहात ‘अंतरंग : २०१४’ महोत्सवात गॅदरींगचा आनंद लुटला.

किस्सा 'डॉक्टर'चा

$
0
0
कधी-कधी दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्याला मनस्ताप करण्याची वेळ येते. कॉलेजरोडजवळील 'सलीम टी स्टॉल'जवळ असाच एक किस्सा झाला. दिवसभराच्या कामातून ब्रेक मिळालेले एक महाशय चहाची तलफ भागविण्यासाठी टी स्टॉलवर पोहोचले.

महापौर चषकाची परवड

$
0
0
नाशिकला १९८२ साली महापालिका स्थापन झाली. पण, १९९२ साली नाशिकला प्रथम महापौर मिळाले आणि त्यांनी मुंबई, पुणे आणि ठाणे महापालिका यांचे अनुकरण करुन प्रथम महापौर चषक क्रीडा स्पर्धा दरवर्षी भरविण्याचा पायंडा पाडला.

सरासरी तपमानात घट

$
0
0
राज्यातील सर्वात निच्चांकी तपमानाची नोंद सोमवारी झाल्यानंतर नाशिकच्या किमान तपमानात काहीशी वाढ झाली असली तरी हवेतील गारठा कायम आहे. त्यामुळे नाशिककरांना पुन्हा उबदार कपडे बाहेर काढावे लागले आहेत.

सौरपथदीपांकडे नाशिकची पाठ

$
0
0
अपारंपारिक ऊर्जास्रोताच्या वापरासाठी राज्य सरकारने विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या असून ग्रामपंचायतींसाठी सौर पथदीप योजना सुरू केली आहे. या योजनेत धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्याने शंभर टक्के उद्दीष्ट पूर्ण केले आहे तर नाशिक व अहमदनगर जिल्हा मात्र पिछाडीवर आहे.

नगरपालिकांनी थकविला कोट्यवधींचा कर

$
0
0
शिक्षण आणि रोजगार हमी योजनेचा कर सर्वसामान्यांकडून वसूल केल्यानंतरही जिल्ह्यातील सात नगरपालिकांनी हा कर राज्य सरकारला देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळेच या सातही नगरपालिकांकडे तब्बल पावणेतीन कोटींची थकबाकी असल्याची बाब पुढे आली आहे.

वेलकम टू मॅनेजमेंट गुरू डवले!

$
0
0
एकनाथ डवले यांनी नाशिक विभागाच्या महसूल आयुक्तपदाची सूत्रे मंगळवारी स्वीकारली. समूहाला घेऊन सौहार्दपूर्णरित्या यशस्वीपणे काम करण्याच्या हातोटीमुळे डवले यांची मॅनेजमेंट गुरू म्हणून प्रतिमा झाली आहे. लोकसहभागातून ग्रामविकास साधण्यात त्यांचा हातखंडा आहे.

अनधिकृत होर्डिंग्ज कर्मचाऱ्यांच्या जीवावर

$
0
0
द्वारका येथील अनधिकृत होर्डिंग्ज हटवताना झालेल्या दुर्घटनेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला. हाणामारी, अपघात यासारख्या घटनांना जबाबदार ठरणाऱ्या होर्डिंग्जमुळे महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतू लागल्याने आतातरी अनाधिकृत होर्डिग्जबाबत महापालिका कडक भूमिका स्वीकारणार का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

२ मह‌िन्यांनंतरही PG च्या न‌िकालांची प्रत‌ीक्षा

$
0
0
ड‌िसेंबर मह‌िन्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या परीक्षा पार पडूनही व‌िद्यार्थ्यांना अद्याप न‌िकालाची प्र‌त‌ीक्षा आहे. सर्वच व‌िद्याशाखांच्या बाबतीत हा प्रकार होत असल्याने पुढील प्रक्र‌ियेत अडथळे न‌िर्माण होत आहेत.

शेतकऱ्यांना पेन्शन द्या

$
0
0
वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, आळंदी उपसा जलसिंचन योजनेला कर्जमाफी द्या, तसेच असंघटीत कार्यकर्त्यांना पेन्शन देण्यासह शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा कायदा करा, अशी आग्रही मागणी करत अखिल 'भारतीय किसान सभे'ने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

मुख्यमंत्री चव्हाण की राज ठाकरे?

$
0
0
पंचवटी विभागीय कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून शिवसेनेत सुंदोपसुंदी झाली होती. आता कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून कार्यालयाचे उद्‌घाटन कोणाच्या हस्ते करायचे, याची चढाओढ राजकीय पक्षांत लागली आहे.

क्रीडा जीवनगौरव पुरस्कार भीष्मराज बाम यांना प्रदान

$
0
0
राज्य सरकारतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मंगळवारी क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नाशिकच्या सात जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

नियंत्रण कक्षाच्या पदांना मान्यता द्या

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवण्यासाठी एकूण २६ पदांना कायमस्वरुपी मान्यता द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय महसूल आयुक्तांकडे केली आहे.

‘राज्यानेही श‌िष्यवृत्तीची मर्यादा वाढवावी’

$
0
0
राज्य सरकारनेही केंद्राच्या धर्तीवर व‌िद्यार्थ्यांच्या श‌िष्यवृत्तीसाठी पालकांच्या उत्पन्नमर्यादेत वाढ करावी, अशी मागणी पालकांमधून जोर धरते आहे. चालू शैक्षण‌िक वर्ष संपत आल्याने श‌िष्यवृत्ती अर्जांची पूर्ती सुरू आहे.

वाहनाच्या धडकेने ज्येष्ठाचा मृत्यू

$
0
0
अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या इसमाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

‘...तर १० वी, १२ वी च्या परीक्षांवर बह‌िष्कार’

$
0
0
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत समाजाच्या जनगणनेसाठी सरकारने आदेश द‌िले आहेत. मात्र, या कामाची जबाबदारी श‌िक्षकांनाही देण्यात येत आहे. दहावी आण‌ि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा न‌िर्णय अत्यंत असंयुक्त‌िक आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images