Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जिद्दीने गाठलं चंदेरी दुनियेचे जग

$
0
0
खरं तर मालेगावच्या त्या तरुणाने डॉक्टर, इंजिनीअर व्हावं अशी त्याच्या कुटुंबियांची इच्छा. त्याची हुषारी पाहून त्याला हौसेने विज्ञान शाखेतही टाकलं. पण, त्यांचं मन प्रयोगशाळेत काही रमलं नाही. उलट चित्रपटाची, नाटकाची मनोहारी दुनिया त्याला खुणावत राहिली. कलेच्या क्षेत्रात काहीतरी करुन दाखवण्याचं त्याच स्वप्न छायाचित्रणाने बहरलं खरं, पण दुसऱ्याची छायाचित्रे काढण्यापेक्षा स्वतःच रुपेरी पडद्यावर, सप्तरंगी रंगमंचावर येण्यात त्याला अधिक स्वारस्य होतं.

डॉ. देशमुखांची राजवाडेत शोधमोहीम

$
0
0
१९९५-९६काळात लंडन शहराचे मेयरपद भूषविलेले डॉ. सदाशिवराव देशमुख सध्या धुळ्यातील इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळात ऐतिहासिक दस्तवेजाचा धांडोळा घेत आहेत. डॉ. देशमुख हे निमसोडच्या देशमुख घराण्याशी संबंधित आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांचे नाशिकरोडला आंदोलन

$
0
0
नाशिक जिल्हा राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, नाशिक जिल्हा राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागाव्यात म्हणून १३ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

पंचवटीतील लिंकरोडची दैना संपणार कधी?

$
0
0
पंचवटीत बाजार समिती शेजारील मखमलाबादरोड-पेठरोड लिंकरोड रस्त्याची अनेक महिन्यांपासून वाट लागली आहे. पेठरोड किंवा दिंडोरीरोडला जाण्यासाठी असलेला हा पर्यायी रस्ता म्हणून हा रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु, सध्याच्या स्थितीत या रस्त्यावरुन वाहनचालकांना मोठ्या `अग्निदिव्या`ला सामोरे जावे लागते.

रहिवाशांची पाणीपुरवठा कार्यालयावर धडक

$
0
0
जुन्या झालेल्या पिण्याच्या पाइपलाइनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने मोरवाडीतील रहिवाशांनी आज थेट आंदोलनाचा मार्ग पत्करला. संतापलेल्या रहिवाशांनी मोरवाडीतून मोर्चा काढत सिडको विभागाच्या पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

महापालिका खरेदी करणार ३५ नव्या घंटागाड्या

$
0
0
शहरातील कचरा संकलित करण्यासाठी घंटागाड्या कमी पडत असल्याचे स्पष्ट करुन महापालिका प्रशासनाने नवीन घंटागाड्या खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार ३५ नवीन घंटागाड्या खरेदी करण्यात येणार असून, यासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे.

माथाडींना हवी रेल्वे भाड्यात ५० टक्के सवलत

$
0
0
माथाडी कामगारांना रेल्वे भाड्यात पन्नास टक्के सवलत द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. याबाबत युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन खर्गे यांनी दिले.

छगन भुजबळ यांचा राज ठाकरेंना टोला

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून मनसेची हवा कमी झाल्याचे स्पष्ट झाल्यानेच राज ठाकरे टोलविरोधात आंदोलन करत असून हे केवळ निवडणुकीसाठीचे राजकारण असल्याची टीका करत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले.

...त्या मृतदेहाची ओळख पटली

$
0
0
येथील बसस्थानकासमोर सोमवारी आढळून आलेला मृतदेह अमरावती येथील जीवन प्राधीकरण विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी हरिष टोपरे यांचा असून त्यांचा मनमाड शहरात खून झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

मनसेचा ‘रास्तारोको’ प्लॅन तयार

$
0
0
टोलवसुलीवरून 'मनसे'तर्फे आज, बुधवारी राज्यभरात होणाऱ्या रास्तारोको आंदोलनाअंतर्गत नाशिकमध्येही तीव्र आंदोलन छेडण्यासाठी मनसे कार्यकर्ते तयारीत असून, बुधवारी सकाळपासूनच शहराला जोडणारे प्रमुख हायवे रोखण्यासाठी रणनिती आखण्यात आली आहे. एका गुप्त बैठकीत शहराला जोडणारे सर्व हायवे व प्रमुख मार्गांवर आंदोनल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नको तो विकास अन् दुभाजक

$
0
0
शहरातील भडगाव रोडवरील वैभव मंगल कार्यालयापासून ओझर गावापर्यंत रस्त्यात दुभाजक टाकून साईड पट्ट्यांचे काम गेल्या चार महिन्यांपासून सुरू असले तरी रस्त्यात दुभाजकांसाठी केलेले मोठमोठे खड्डे, रस्त्याच्या कडेला पसरलेली वाळू, डबर, मुरूम यांचे पडलेले खच अपघाताला निमंत्रण देत आहेत.

जाहिरात कर वाढीस विरोध

$
0
0
महापालिकेने प्रस्तावित केलेले जाहिरात कर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. यामुळे जाहिरात एजन्सीवर कुऱ्हाड कोसळण्याचा दावा करीत या प्रस्तावावर फेरविचार करण्याची मागणी नाशिक आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशनेने महापौर अॅड. यतीन वाघ यांच्याकडे केली आहे.

घोषणा : वाढीव सिलिंडरचे तीनतेरा

$
0
0
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी केंद्र सरकारने सवलतीच्या सिलिंडरची संख्या १२ केली असली तरी यासंदर्भात अद्यापही आदेश काढण्यात न आल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

कार्यकर्त्यांची ‘हवा’

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकाजवळ येत असल्याने आंदोलनांच्या संख्येत वाढू होऊ लागली आहे. मनसेतर्फे बुधवारी रास्ता रोको करण्यात आले. चेहडी येथे आंदोलन सुरु असताना कार्यकर्त्यांनी गाड्या आडवायला सुरुवात केली. पोलिसांनी हस्तक्षेप करताच गाड्यांच्या हवा सोडण्यात आल्या.

विभागालाच हवा रेशनकार्डचा 'पुरवठा'

$
0
0
जिल्ह्याच्या पुरवठा विभागाकडे रेशनकार्डचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्या तालुक्यांकडे रेशनकार्ड आहेत तेथून मागवून जुळवाजुळव केली जात आहे.गेल्या १ फेब्रुवारीपासून अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. मात्र, या योजनेच्या लाभार्थ्यांच्या निकषावरून अनेक रेशनकार्डधारकांवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे.

उद्योग भवन होणार सुरक्षित

$
0
0
अग्निप्रतिबंधक उपाययोजना नसलेल्या उद्योगांना जबर दंड करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला त्यांनीच उभारलेल्या उद्योग भवनाची सुरक्षिततेसाठी पाऊल उचलावे लागले आहे. महामंडळाने या भवनासाठी अग्निप्रतिबंधक उपकरणे खरेदीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

डाळिंब @ १३०

$
0
0
एकीकडे कांदा आणि मक्याचे भाव कोसळत आहेत तर दुसरीकडे डाळिंब तेजीत आल्यामुळे कसमादे पट्टयातील शेतकऱ्यामध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे. बुधवारी सटाण्यात डाळिंबाला किलोला १३० रुपये भाव मिळाला.

नामपूरला ५ मोटरसायकली जाळल्या

$
0
0
नाशिक शहरातील मोटरसायकल जाळपोळचे लोन ग्रामीण भागातही पसरले आहे. बागलाण तालुक्यातील नामपूर येथे अज्ञात समाजकंटकांनी एका गॅरेजवर दुरुस्तीसाठी ठेवलेल्या पाच मोटरसायकली पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी पहाटे समजली.

मोसम नदीपात्र बनले कचराकुंडी

$
0
0
मालेगाव शहरातून जाणाऱ्या मोसम नदीत कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तसचे डासांच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे सांडवा पुलावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला.

कांदा तीनशे रुपयांनी घसरला

$
0
0
एकवर्षानंतर कांद्याचा भाव पुन्हा गडगडला. बुधवारी बागलाण तालुक्यातील नामपूर उपबाजारात कांदा तीनशे रुपयांनी घसरला. प्रतिक्विंटल ४२५ रुपये दराने कांद्याची विक्री झाली. अचानक भाव कोसल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images