Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बोटक्लब रस्ता नव्हे,‘लव्हर पॉईंट’

0
0
शहरात प्रेमी युगुलांसाठी जागा कमी पडू लागली की काय म्हणून आता गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील रस्तेही या मंडळींसाठी कमी पडू लागले आहेत. कॉलेजरोड व गंगापूररोडच्या लगत असलेला आसाराम बापू आश्रमाशेजारील बोटक्लबचा रस्ता त्याचे उत्तम उदारहण म्हणता येईल.

देशांतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणार

0
0
'नमस्ते मोदीजी मै नासिकसे भीष्म कजरिया बोल रहा हूँ...' असे म्हणत नाशिकच्या सव्वीसवर्षीय भीष्म कजारिया या सॉफ्टवेअर इंजिनीअरने गुजरातचे मुख्यमंत्री तथा भाजपतील पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याशी बुधवारी थेट संवाद साधत देशभरात बुलेट ट्रेनचे जाळे व प्रमुख शहरात मोनोरेल-मेट्रो उभारण्याची इच्छा व्यक्त केली.

कर्मचाऱ्यांचा संप : टपालसेवा ठप्प

0
0
सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अनेक मागण्यांसाठी टपाल विभागातील कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला असून बुधवारी पहिल्याच दिवशी जीपीओसह जिल्ह्यातील सर्वच टपाल कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले. यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले.

घंटागाड्यांचे आरोग्य धोक्यात

0
0
शहरातील कचऱ्याचा भार वाहून नाशिककरांचे आरोग्य अबाधित राखणाऱ्या महापालिकेच्या घंटागाड्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गाड्या नादुरुस्त असल्याने कर्मचाऱ्यांचेही हाल होत आहेत.

सिंहस्थासाठी आज मुंबईत बैठक

0
0
पुढील वर्षी जुलैमध्ये सुरू होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक मुंबईत गुरुवारी होणार आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अक्षरशः फज्जा

0
0
'मनसे'च्या रास्ता रोकोचा बुधवारी शहर आणि जिल्ह्यात अक्षरशः फज्जा उडाला. शहर व ग्रामीण पोलिसांनी ठेवलेल्या नियोजनबध्द बंदोबस्तामुळे मनसेचे आंदोलन फार काळ टिकलेच नाही. आंदोलनादरम्यान शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याने या आंदोलनाचा फटकाही कुणाला बसला नाही.

सटाण्यात प्राध्यापकांवर हल्ला

0
0
सटाण्यात कॉलेजच्या आवारात सुरक्षारक्षक बालबहादूर सिंह याने दोन प्राध्यापकांवर कु-हाडीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात प्रा. सुनील सागर आणि प्रा. प्रफुल्ल ठाकरे यांच्यासह कॉलेजचा शिपाई मगरे जखमी झाला आहे.

प्राध्यापकांवर कु-हाड हल्ला

0
0
सटाण्यात कॉलेजच्या आवारात सुरक्षारक्षक बालबहादूर सिंह याने दोन प्राध्यापक आणि एका शिपायावर कु-हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात प्रा. सुनील सागर आणि कॉलेजचा शिपाई मगरे यांचा मृत्यू झाला, तर प्रा. प्रफुल्ल ठाकरे गंभीर जखमी झाले.

विश्वास ठाकूर यांना संचालक पद

0
0
नाशिकच्या विश्वास को-ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांची नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप. बँक्स अॅण्ड क्रेडिट सोसायटीज (नॅफकब) या सहकार क्षेत्रातील देशपातळीवरील संस्थेवर भारत सरकारच्या कृषी व सहकार खात्यातर्फे एकमेव ना‌मनिर्देशित असलेल्या संचालकपदावर निवड झाली आहे.

ग्रामपंचायतीतच होणार एसटी बुकिंग

0
0
राज्य सरकारच्या ग्राम विकास विभागातर्फे संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र योजनेंतर्गत नाशिक विभागातील ग्रामपंचायतींमध्ये एसटी ​तिकीट बुकींग केले जाणार आहे. त्यासाठी महामंडळाकडून ग्रामपंचायतीला चार टक्के कमिशन देण्यात येणार आहे.

दोन दिवसांत कोटीचे व्यवहार ठप्प

0
0
टपाल विभागात‌ील कर्मचारी संपावर असल्याने दुसऱ्या दिवशीही नागरिकांचे हाल झाले. काम न झाल्याने ग्राहकांना निराश होऊन माघारी परतावे लागले. या दोन दिवसांत टपाल विभागाच्या माध्यमातून होणारे सुमारे १ कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले.

एसटी महामंडळातर्फे उद्या सत्कार सोहळा

0
0
अपघात विरहित सेवा देणाऱ्या नाशिक प्रदेशातील १०० चालकांना एसटी महामंडळातर्फे शुक्रवारी गौरविण्यात येणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गुरुपुष्यामृतच्या दरात स्थिरता

0
0
पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर अनेक ग्राहकांनी सराफ बाजारात गुरुवारी सोने खरेदी केले. भावात स्थिरता असल्याने नेहमीपेक्षा सोने खरेदीचा जोर स्थिर होता. अनेक ग्राहकांनी सोन्याबरोबरच गुंतवणूक म्हणून चांदीचीही खरेदी केली.

...तर कांदा व्यापाऱ्यांवर कारवाई

0
0
नाशिक अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वारंवार आवाहन करूनही कांदा व्यापारी नोंदणी किंवा परवाना घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा एफडीएने दिला आहे.

गल्फ सुपरक्रॉसची २२ व २३ फेब्रुवारीला धूम

0
0
मुंबईच्या स्पोर्टस् क्राफ्ट व नाशिक ऑटोमो‌टिव्ह स्पोर्टस् असोसिएशन (नासा) यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ फेब्रुवारी रोजी गल्फ सुपरक्रॉस-२०१४ या ही दुचाकी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेनिमित्त देशभरातील नामांकित स्पर्धकांमध्ये विजयासाठी होणारी मोठी चुरस मोटरसायकलप्रेमींना पहावयास मिळणार आहे.

विकास आराखड्याबाबत १८ मार्चला फैसला

0
0
शहर विकास आराखडा तयार करताना महापालिकेला बाजुला सारत राज्य सरकारने अस्तित्वात नसलेल्या कलमान्वये निर्णय घेतल्याच्या आरोपावरून हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर १८ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

देवकरांच्या जामीनसाठी ‘तारीख पे तारीख’

0
0
जळगाव नगरपालिका घरकुल खटल्यातील संशय‌ित आरोपी माजी मंत्री आमदार गुलाबराव देवकर यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी कामकाज होऊ शकले नाही. आता २६ फेब्रुवारी रोजी कामकाज होणार आहे. दरम्यान, गुलाबराव देवकरांसह अन्य ४७ संशयित आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात यावेत, असा अर्ज विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी दाखल केला आहे.

निलंबित एपीआयवर हल्ला

0
0
जिल्हा कारागृहात दाखल असलेल्या एका वेडसर मुलावर करण्यात आलेल्या अनैसर्गिक कृत्याची वाच्यता केल्यामुळे कारागृहातील अट्टल गुन्हेगाराने दोंडाईचा येथील योगेश धनगर खून प्रकरणातील संशयित आरोपी निलंबित सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश महाजन यांच्यावर बुधवारी रात्री प्राणघातक हल्ला चढविला.

‘इन्स्ट्रुबॉटिक्स २०१४’ चे आज उद्‍घाटन

0
0
मविप्र संस्थेच्या इंजिनीअरिंग कॉलेजातील इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनीअरिंग शाखेच्या वतीने ‘इन्स्ट्रुबॉटिक्स २०१४’ या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचे आयोजन शुक्रवारपासून करण्यात आले आहे. या उपक्रमात ‘महाराष्ट्र टाइम्स’ म‌ीडिया पार्टनर आहे.

प्रशासनाची दिरंगाई सिंहस्थाच्या मूळावर

0
0
अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांकडून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, पाटबंधारे, वीज वितरण यासारखे विभाग निधीची उपलब्धता किंवा अनियोजनाच्या गुंत्यात गुरफटत चालले आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images