Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अनोखा बर्ड फेस्ट

0
0
तळ्याच्या मधोमध बसलेला पानकावळा, ब्राम्हणी बदक, स्पॉटबील बदक, परीट पक्षी, गप्पीदास म्हणजेच स्टोनचॅट आणि आयबीस या पक्ष्यांच्या दर्शनाने पक्षीमित्रांची रविवारची सकाळ प्रसन्न झाली निमित्त होते बर्ड फेस्टिव्हलचे.

संस्कारभारतीतर्फे नाट्यसंगीत

0
0
संस्कारभारतीच्या पश्चिम विभागातर्फे भरतमुनी जयंतीनिमित्त बुधवारी (१९ फेब्रुवारी) शंकराचार्य न्यास संकुल येथे संध्याकाळी ६ वाजता नाट्य संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका विद्या ओक या गाजलेल्या नाट्यपदांचे सादरीकरण करणार आहेत.

प्रेमवीरांची गांधीग‌िरी

0
0
अंगावर आलेल्याला श‌िंगावर घेण्याऐवजी थंड रक्ताने त्याला सामोरे जाण्याची हातोटी काहींजवळ असते. प्रत्येक ठ‌िकाणी वाद घालून नसती आफत ओढावून घेण्यापेक्षा वेगळे फंडे वापरण्यावर शक्कलवंतांचा भर असतो. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या द‌िवशीही अनेक प्रेमवीरांच्या गंजलेल्या बुध्दीला अशीच चालना म‌िळत होती.

अतिक्रमणविरोधी मोहीम बासनात

0
0
गेल्या महिन्यात महापालिका प्रशासनाने गाजावाजा करत सुरू केलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम बासनात गुंडळण्यात आली आहे. मुंबईनाका परिसरानंतर शहरात कोठेही अतिक्रमण मोहिमेचे अस्तित्व जाणवले नाही.

जखमी प्राध्यापकाचाही मृत्यू

0
0
सटाणा कॉलेजमधील रखवालदाराच्या खुनी हल्यात गंभीर जखमी झाले प्राध्यापक सुनील सागर यांचाही रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

९२ कोटींची विकासकामे

0
0
मालेगाव तालुक्यात मागील तीन वर्षांत ९२ कोटी रुपयांची विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून झाली आहेत. याशिवाय विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी येथे दिली.

ड्रेनेजमुळे नागरिक त्रस्त

0
0
सातपूर अंबडलिंकरोडवरील दत्त मंदिर शेजारील ड्रेनेजमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या ड्रेनेज विभागाला कळवून देखील चोकअप झालेल्या ड्रेनेजची साफसफाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.

गंगापूरमध्ये एकावर जीवघेणा हल्ला

0
0
खुन्नसने का पाहातो, अशी विचारणा करीत शिवीगाळ केल्याच्या कारणावरून तरुणावर चाकूने वार केल्याची घटना घडली. यामध्ये त्याच्या साथीदारासही मारहाण करण्यात आली आहे. गंगापूररोडवरील अयोध्या कॉलनीत शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. दिनेश आवारे, गणेश पवार, अंकुश कडलग, विशाल मोरे अशी त्यांची नावे आहेत.

रेल्वेचे आता व्हॉट्स अप कम्युनिकेशन

0
0
मध्य रेल्वेच्या भुसावळ मार्गावरील टीसींनी व्हॉट्स अपद्वारे एकमेकांशी संपर्क साधणे सुरू केले आहे. यामुळे जलदगतीने संदेशाची देवाणघेवाण होत असून अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

बस चारीत गेल्याने चौघे जखमी

0
0
भरधाव बस रस्ता सोडून चारीमध्ये उलटल्याने चौघेजण जखमी झाले. सुरगाणा तालुक्यात बोरगाव उंडवड मार्गावर रविवारी दुपारी हा अपघात झाला. जखमींवर नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

एसटी संघटनेच्या अधिवेशनामुळे वाहतुकीवर परिणाम

0
0
एसटीच्या मान्यताप्राप्त संघटनेचे अधिवेशन पुणे येथे सुरू असून त्यासाठी ना‌शिक जिल्ह्यातील सुमारे एक हजार कामगार गेले आहेत. त्यामध्ये चालक-वाहकांचे प्रमाण मोठे असल्याने जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे.

एक ‘PNR’ वर गर्दी बेसुमार

0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर एकमेव पीएनआर (पॅसेंजर नेम रेकॉर्ड) मशिन असून त्यावर तिकिटाची स्थिती बघण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत आहे. मात्र, या मशिनच्या आपरेटींग सिस्टीमबाबत माहिती देण्यास तेथे कोणीही कर्मचारी नाही. यामुळे प्रवाशांचा मशिनची सिस्टीम समजून घेण्यातच वेळ जातो.

‘त्यांना’ मतदारच धडा शिकवतील

0
0
भुजबळांना बलाढ्य म्हणण्याचे कारण नाही. नागरिकांना पेट्रोल घोटाळा, तेलगी प्रकरण चांगलेच लक्षात आहे. कोणतेही भुजबळ असो, येत्या निवडणुकीत निवडून येणार नाहीत, कारण शहरातील नागरिक त्यांचे धंदे ओळखून आहेत; त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आम आदमी पार्टीचे नाशिक शहरातील उमेदवार विजय पांढरे यांनी दिला.

तातडीची बैठक तातडीने रद्द

0
0
राज्यातील रेशन दुकानदारांच्या मागण्यांप्रश्नी अत्यंत तातडीने आयोजित करण्यात आलेली बैठक अन्न व नागरी पुरवठा विभागाने तेवढ्याच तातडीने रद्दही केली. त्यामुळे रेशनदुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर बैठक घेण्याची मागणी केली आहे.

अखेर फ्लेमिंगो आले!

0
0
गुजरातच्या कच्छ भागातून दरवर्षी डिसेंबर-जानेवारीत नांदूरमध्यमेश्वरला दाखल होणाऱ्या फ्लेमिंगोंनी अखेर महिन्याभराच्या उश‌िराने अखेर रविवारी हजेरी लावली. त्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

राज्याचे नवे आयटी धोरण लवकरच

0
0
प्रदूषणविरहीत आणि सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) उद्योगासाठीचे नवे धोरण राज्य सरकार लवकरच जाहीर करणार आहे. हे धोरण तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून क्रेडाई ही बांधकाम व्यावसायिकांची संघटनाही त्यात सक्र‌िय झाली आहे.

कळवणला प्रबोधन पत्रके धूळखात

0
0
कळवण पंचायत समितीतील महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयातील प्रवेशद्वाराजवळ जिन्याखाली महिला बाल विकासासाठी प्रबोधन करणारे पत्रके धूळखात पडले आहेत. महिला व बाल विकासाच्या गप्पा मारणाऱ्या अधिकारी व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास सरकार उदासिन

0
0
शिक्षण क्षेत्राकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. शिक्षक, शाळा आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्न अडीअडचणीला हो म्हणायचे, पण प्रत्यक्षात एकही निर्णय घ्यायचा नाही. हीच आजच्या शासन व्यवस्थेची शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याची मनोवृत्ती आहे.

मनमाड नगरपालिका बरखास्त करा

0
0
येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी गटाचे नगरसेवक रवींद्र घोडेस्वार यांनीच नगरपालिका प्रशासनाला घरचा आहेर देवून नगरपरिषद बरखास्त करुन टाका, अशी जोरदार मागणी केली. विरोधक शिवसेनेनेही त्यांची री ओढल्याने सभेत एकदमच खळबळ उडाली.

बलदेवसिंह पालला न्यायालयीन कोठडी

0
0
येथील महाविद्यालयातील प्राचार्यांसह प्राध्यापक आणि शिपायावर खुनी हल्ला चढविणाऱ्या सुरक्षा रक्षकास न्यायाल्याने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. बलदेवसिंह पाल यास सोमवारी सटाणा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images