Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सटाणा शहर राष्ट्रवादीत गटबाजीला उधाण

$
0
0
सहा महिन्यातच राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या बागलाण तालुकाध्यक्षासह सटाणा शहराध्यक्षला डच्चू दिला. त्यांच्या जागी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या गटातील किरण बिरारी आणि नितीन सोनवणे यांची वर्णी लागली आहे.

भाबडबारी ‘टोल फ्री’साठी आंदोलन

$
0
0
बागलाण तालुक्यातील वाहनधारकांना भावडबारी घाटातील टोल फ्री करावा या मागणीसाठी सोमवारी संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी सटाण्याच्या पी. डब्ल्यू. डी च्या डेप्युटी इंजिनीयरला अडीच तास घेराव घालत आंदोलन केले.

अतिपरिचय नको रे बाबा

$
0
0
भाषणांच्या गुऱ्हाळात मुख्य कार्यक्रम कधी कधी वाहतच जातो. नुकताच झालेला एक कार्यक्रम असाच लांबत गेला. झाले असे की कार्यक्रमाची प्रस्तावना दीर्घ झाली, त्यात या ठिकाणी झेंड्यावर पंढरपूर करण्यासाठी काही पुस्तकवाले हजर होते. त्यांनी प्रकाशन साधून घेतले.

मालमत्तेच्या वादातून महिलेला मारहाण

$
0
0
पती आणि सवत यांनी महिलेला तिच्याच अंगावरील नऊवारीने विजेच्या खांबाला बांधून दगडाने बेदम मारहाण करण्याचा प्रकार ना‌शिकजवळच्या गिरणारे गावात घडला. या महिलेची प्रकृती गंभीर असून मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.

पोलिस निरीक्षक अजूनही त्याच जागेवर

$
0
0
बदली करण्यात आलेल्या पो‌लिस अधिकाऱ्यांनी २४ तासांच्या आत रूजू व्हावे, असे आदेश गृहविभागाने दिले असतानाही हा आदेश सोमवारी अंमलात येऊ शकला नाही. त्यामुळे पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी गृह विभागाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याची चर्चा सोमवारी शहरात होती.

रामबंधु सुपर मार्केट नाशिककरांच्या सेवेत

$
0
0
विविध दर्जेदार मसालेदार पदार्थांच्या उत्पादनांमूळे अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या नाशिकच्या रामबंंधुने सुपर मार्केटच्या माध्यमातून आता नवीन सेवा सुरू केली आहे.

पाणीपट्टी वसुली अवघी २० टक्के

$
0
0
नाशिक महापालिकेकडून पाणीपट्टी, घरपट्टी व विविध करवसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात सातपूर विभागात अवघी २० टक्के पाणीपट्टी वसुली झाली आहे. त्यातुलनेत घरपट्टी वसुली ६५ टक्के झाली आहे. महापालिका आयुक्तांनी ठरवून दिलेले शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्टे साध्य होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

नाशिक-पुणे मार्गावर वाहतुकीची कोंडी

$
0
0
नाशिक-पुणे महामार्गावर अनेक दिवसांपासून वाहतुकीची कोंडी होत असून, नाशिककरांना त्याचा प्रत्यय गेल्या आठ दिवसांपासून येत आहे. सोमवारी सकाळी संगमनेर परिसरात अपघात झाल्याने त्याचे पडसाद नाशिकरोडपर्यंत उमटले.

महापालिका प्रशासनावर होणार कारवाई

$
0
0
महापालिकेकडून बेकायदेशीरपणे ठेका देत घंटागाडी चालविण्यात येत असल्याचा आरोप नाशिक महापालिका श्रमिक संघाने केला होता. यासाठी आज कामगार उपायुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी घंटागाडी कर्मचा-यांनी दालनातच ठिय्या आंदोनल केले.

अतिक्रमणाच्या मुद्द्यावर वादंग

$
0
0
नाशिक महापालिकेच्या नाशिकरोड प्रभागाची सभा नवीन कार्यालयात विविध मुद्यांवर गाजली. सोमवारी झालेल्या पहिल्या सभेत अतिक्रमाणाबाबत कार्यवाही होत नसल्याबद्दल सर्वच नगरसेवकांनी प्रशसनास धारेवर धरले.

अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना नोटिसा

$
0
0
नाशिक शहर, सुंदर शहर, या संकल्पनेलाच मूळात खो बसत आहे. त्याचे कारण म्हणजे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण. सातपूर विभागातील अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे दिवसेंदिवस त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अतिक्रमण वाढतच आहे.

​सारडा सर्कलवरील १६ अतिक्रमणधारकांना नोटिसा

$
0
0
सारडा सर्कलजवळील चांदखाँवली दर्ग्याजवळ असलेल्या १६ अतिक्रमणधारकांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोट‌िसा बजावल्या आहेत. अतिक्रमणधारकांना साहित्य हटविण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर थेट कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रतीक्षा ड‌िज‌िटल रिझर्वेशन बोर्डाची

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर लावण्यात येत असलेल्या आरक्षण चार्टची प्रिंटिंग खराब असल्याने तो वाचता येत नाही. त्यामुळे मध्य रेल्वेने मुंबईप्रमाणे नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरही ड‌िज‌िटल रिझर्वेशन सिस्टीम बोर्ड लावावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

वैजापूरकरांवर कारवाई न झाल्यास फरांदेंचा आंदोलनाचा इशारा

$
0
0
शहर विकास आराखडा चुकीच्या पध्दतीने बनविल्याचा ठपका असलेल्या नगररचना विभागाच्या सहायक संचालक सुलेखा वैजापूरकर यांना राज्य सरकार जाणुनबुजून पाठीशी घालत आहे.

मालमत्तेच्या वादातून महिलेला मारहाण

$
0
0
पती आणि सवत यांनी महिलेला तिच्याच अंगावरील नऊवारीने विजेच्या खांबाला बांधून दगडाने बेदम मारहाण करण्याचा प्रकार ना‌शिकजवळच्या गिरणारे गावात घडला. या महिलेची प्रकृती गंभीर असून मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.

‘आप’ आणि आव्हान? मुळीच नाही

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी आम आदमी पार्टीने (आप) विजय पांढरे यांचे नाव जाहीर केले आणि नाशिकमधील उमेदवार घोषणेचा पहिला मान पटकावला. पांढरे यांच्या उमेदवारीमुळे नाशिक ‘आप’मध्ये आनंदाचे वातावरण असले तरी विरोधकांनी दिल्लीचा अनुभव सांगत ‘आप’ची खिल्ली उडवली आहे.

विंधन विहिरींच्या खोलीवर मर्यादा

$
0
0
पावसाचे कमी होणारे प्रमाण आणि घटती भूजल पातळी याची दखल घेत टंचाई निवारणासाठी केल्या जाणाऱ्या विंधन विह‌िरींच्या खोलीवर मर्यादा आणण्यात आली आहे. या विह‌िरींच्या खोलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे.

पावणेतीन कोटींची वसुली

$
0
0
घरपट्टी वसुलीचा आकडा वाढविण्यासाठी विविधकर विभागाने २० हजार मिळकतधारकांना स्मरणपत्रे दिली आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत २ कोटी ८४ लाख रुपयांची भर पडल्याची माहिती उपायुक्त आर. एम. बहिरम यांनी दिली.

अन्यायग्रस्त ग्रामसेवकांचे धरणे

$
0
0
गाव पातळीवर घरपट्टी, पाणीपट्टीसारखी वसुली मोहीम राबविणे असो किंवा तंटामुक्ती अभियान, ग्रामस्वच्छता अभियानासह विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, या सर्वांसाठी ग्रामसेवकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो.

अन्य ठिकाणी टोलनाक्यावरही सवलतीचे आश्वासन

$
0
0
नाशिक येथून वणीला जाताना लागणारा ढाकांबे, लखमापूर टोलनाका बंद करावा, तसेच २ लेन असलेला हा रस्ता खराब असल्याची तक्रार सदस्यांनी केली. त्यावर या टोलचे मूल्यांकन करून हा नाका बंद करण्याचा प्रस्ताव सरकारला सादर करणार तसेच याबरोबर घोटीहून भंडारदऱ्याकडे जाताना लागणारा टोलनाका एमएसआरडीसीच्या अधिपत्याखाली असून त्यासंबंधीचे पत्रही देणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images