Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

0
0
सातपूर परिसरातील विश्वासनगर येथे झालेल्या महिलेच्या खून प्रकरणात पोलिसांनी याच ठिकाणी राहणाऱ्या तीन संशयितांना शनिवारी अटक केली. या महिलेने संशयितावर घरफोडी, हाणामारी असे अनेक गुन्हे दाखल केले होते. या वादातूनच हा प्रकार झाल्याची कबुली संशयितांनी ​पोलिसांना दिली आहे.

सरकारी सबसिडी हवी कशाला?

0
0
'जळगाव जिल्ह्यातील बहादरपूर गावात समाजसेवेचा श्रीगणेशा करताना काही बाबी मनाशी घट्ट बांधल्या होत्या. त्यात सरकारी मदत कधीच स्वीकारायची नाही, ही खूणगाठ सर्वात महत्त्वाची. समाजसेवेत अनेक वर्षं घालवल्यानंतर आज सरकारी मदत किंवा सबसिडीची समाजाला खरचं गरज आहे का, असा प्रश्न पडतो.

नर्ससाठी १३४ पदे, परीक्षा देणारे ३ हजार

0
0
नाशिकच्या उपसंचालक आरोग्य सेवा मंडळांतर्गत येणा-या पाच जिल्ह्यांसाठी १३४ स्टाफ नर्स पदे सरळसेवेने भरली जाणार होती. त्यासाठी रविवारी 'एमकेसीएल'तर्फे आयोजित केलेल्या परीक्षेला ३१७६ उमेदवारांनी उपस्थिती लावली होती.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेला भगदाड

0
0
मध्य रेल्वेचे नाशिकरोड स्थानक प्रमुख रेल्वे स्थानक असूनही सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना नसल्याने प्रवाशांची अन् स्थानकाची सुरक्षा नक्की कोणाच्या हाती आहे, याबाबत प्रश्न निर्माण होतो. मेटल डिटेक्टर बंद असून रेल्वे स्थानकावर प्रवेशद्वाराशिवाय असंख्य रस्ते असल्याने रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेला भगदाड पडले आहे.

डास परवडले पण...!

0
0
लग्नघरी आदल्या दिवशी मुक्कामी आलेल्या घरच्या पाहुण्यांकडे वाजंत्री, घोडा, मंडप आणि केटरिंगच्या व्यवस्थेसारखी बरीच कामं असतात. दिवसभर दमछाक झाली कधी एकदाचा डोळा लागतो असं होतं. गेल्या आठवड्यात लग्नघरी मदतीसाठी गेलेल्या एकाला असा अनुभव आला की, तो आजही झोपेतून खाडकन जागा होतो.

कृषी विकासाची पुनर्मांडणी आवश्यक

0
0
फुलाफळांच्या उत्पादनाद्वारे जगाच्या बाजारपेठेत स्वत:चे स्थान मिळवणारा शेतकरी महाराष्ट्रात आहे, तसाच पारंपरिक पध्दतीने शेती करणारा व शेतात काहीच पिकत नाही म्हणून नशिबाला दोष देत बसणारा शेतकरीदेखील येथे आहे.

महामार्गचा विस्तार प्रशासनाच्या कात्रीत

0
0
एअरपोर्टच्या धर्तीवर महामार्ग बसस्थानक उभारणीचे टेंडर गेल्या सहा महिन्यांपासून एसटीच्या मुख्यालयी धूळ खात पडून आहे. गेल्यावर्षी मुख्यमंत्री निधीतून विकासासाठी राज्यातील सहा बसस्थानकांची निवड करण्यात आली होती.

नाशिककरांच्या भेटीला 'गांधी आडवा येतो'

0
0
एखादी व्यक्ती सुधारू पाहत असेल तर समाज त्याला त्यापासून परावृत्त करतो. गुन्हेगार सुधारला तर त्यापासून मिळणारे फायदे आपल्याला होणार नाहीत, यामुळे गुन्हेगाराला गुन्हेगारच ठेवण्यात समाज धन्यता मानतो, अशा कथानकाकडे जाणारे 'गांधी आडवा येतो' हे नाटक रंगमंचावर आले आहे.

कृषी विभागासाठी वेगळ्या बजेटची मागणी

0
0
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या बजेटचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्याच्या बजेटमधून कृषी विभाग वगळून त्याच्यासाठी वेगळ्या बजेटची मागणी सरकारकडे केली असल्याची माहिती कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

' प्रत्येक गावी कृषी ग्रंथालय उभारावे '

0
0
ग्रामीण महाराष्ट्रात कृषी साहित्य व सांस्कृतिक चळवळ उभी राहावी, यासाठी प्रत्येक गावात सरकारने कृषी ग्रंथालय सुरू करावे. सरकारने या धर्तीवरील वाचनालयांसाठी पुस्तके आणि रोख अनुदानाच्या स्वरुपात अनुदान द्यावे, यांसह पाच ठराव अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनात मांडण्यात आले.

उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी या त्रिसूत्रीची गरज

0
0
शेतकरी बांधवांच्या विचारांचे जागतिकीकरण व्हावे, यासाठी कृषी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून आता पुन्हा एकदा उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी अशी त्रिसूत्री जमविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांनी केले.

एसटी स्थानकाचा चेहरा बदलणार कधी?

0
0
नाशिकरोडचा भौगौलिक विस्तार झाला; परंतु त्या दृष्टीने कुठल्याही सुविधा देण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. शहरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना एसटी स्थानकांवर प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याची तक्रार सर्वच स्थानकांवर आहे.

डॉलर ऐवजी रुपये घेणारी टोळी गजाआड

0
0
अमेरिकन डॉलरचे आमीष दाखवत फसवणूक करणा-या ११ जणांच्या परप्रांतीय टोळीला नाशिक पोलिसांच्या पथकाने रविवारी गंगापूर गावातून अटक केली. अटक केलेल्यांमध्ये ४ महिला व ७ पुरुषांचा समावेश आहे.

अंबड रस्ता डांबरीकरणाची मागणी

0
0
अंबड लिंक रोड दोन्ही बाजूंनी रूंद करण्यात येत असून त्यामुळे वाहनधारकांची चांगली सोय होणार आहे, मात्र डांबरीकरणाला लागलेल्या उशीरामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून या भागात अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करावे अशी मागणी जोर धरत आहे.

पॅसेंजरला १३ किमीसाठी ५ तास

0
0
एखाद्या पॅसेंजरने १३ किलोमीटर अंतर कापायला किती वेळ लागेल, असा प्रश्न रेल्वे प्रवाशाला विचारला अन् त्यांनी फक्त पाच तास असे उत्तर दिले तर फार आश्चर्य वाटायला नको. कारण गुरुवारी भुसावळ पॅसेंजरला इतका अवधी लागला आहे.

एसीबीकडून 'टार्गेट ओरिएंटेड' काम

0
0
एसीबीने २०१२मध्ये महाराष्ट्रात अवघे ४८९ सापळे रचले. राज्यातील लाचखोरीचे प्रमाण पाहता हे प्रमाण काही टक्क्यांतही येणार नाही. एसीबीकडून (अँटी करप्शन ब्युरो) गेल्या पाच वर्षांत सातत्याने एवढ्याच प्रमाणात कारवाई केली जात आहे.

सुरक्षेसाठी वाहनांच्या वेगावर मर्यादा

0
0
दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्र्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला आहे. त्यातीलच एक भाग म्हणून त्र्यंबकरोडवरून जाणाऱ्या वाहनांना यापुढे एमपीए समोरून जाताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे.

बलात्कारप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा

0
0
आर्थिक कारणावरून शारीरिक व मानसिक छळ, तसेच बलात्कार केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बलात्कारानंतर आरोपींनी विवाहितेला जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

वाडा संस्कृतीच्या गावा जावे...

0
0
नाशिकच्या इतिहासाला वाडा संस्कृतिने कोंदण दिले आहे. पेशवेकालीन वाडे आणि त्यांची वास्तु शैलीने इतिहास अभ्यासकांना भुरळ घातली आहे. वाड्यांचे बांधकाम, त्यातील कोरीव लाकुड काम, दुर्मिळ नक्षी, मंदिरे, वाड्याचा परिसर दुर्मिळ होऊ लागला आहे.

नाशिकच्या सौंदर्याला काचेची लकाकी

0
0
काचेचा वापर हा गरीबांपासून ते धनिकांपर्यंत प्रत्येकाचा जवळचा विषय आहे. घरातल्या भितीवरच्या फ्रेमपासून ते राजांच्या महालातील झुंबरांपर्यत सर्वच ठिकाणी काच अविभाज्य घटक झाला आहे. झपाट्याने विकसीत होत असलेल्या नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणात काचेचा वापर वाढला असून वर्षाला दोन अब्ज रूपयांपर्यंत काचेची उलाढाल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images