Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

घंटागाडी पाणीपुरवठा कळीचा मुद्दा

0
0
वार्डातील स्वच्छता, कमी दाबाने पाणीपुरवठा आणि घंटागाड्यांमधील अनियमितता अशा विषयांवर पूर्व व पश्चिम समितीच्या बैठकींमध्ये जोरदार चर्चा झाली.

पोलिस आयुक्त हाजीर हो

0
0
गंगापूर रोडच्या रुंदीकरणात तोडल्या जाणाऱ्या झाडांची मोठी दखल घेत पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि मुख्य वनसंरक्षक यांना हजर राहण्याचे आदेश काढले आहेत. तसेच, पुढील सुनावणीपर्यंत या झाडांना हात न लावण्याचे निर्देशही ट्रिब्युनलने दिले आहेत.

रेल्वे बुकिंग एजंटांचा धुमाकूळ

0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील रिझर्वेशन काऊंटरवर एजंटांनी धुमाकूळ घातला असून नंबर लावूनही तिकीट मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून तिकीट बुकिंगमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

वृक्ष ठरतोय वाहतुकीला अडथळा

0
0
अशोकनगर बसस्टॉप समोरील वृक्ष वाहतुकीला अडथळा ठरत आहे. विशेषकरुन बसचालकांना वाहन वळवताना तो अडचणीचा ठरत आहे. याबाबत महापालिकेला कळविले असता, वृक्षप्रेमींचे नाव पुढे करुन तो हटविण्यासाठी टाळाटाळ केली जाते.

आधी काम, मग मिळेल मतदान

0
0
बागलाण तालुक्यातील केळझर धरणाच्या प्रलंबित असलेल्या चारी क्रमांक आठच्या कामाला तत्काळ सुरुवात करुन पुढील वायगावपर्यंतच्या कामाचे सर्वेक्षण करावे, या मागणीसाठी कृती समितीतर्फे सोमवारपासून सटाणात तहसिल कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत उपोषण आश्वासननंतर मंगळवारी सायंकाळी दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले.

नाशकात रिसर्च, इनोव्हेशन सेंटर व्हावे

0
0
नाशिकमध्ये आयटी उद्योगातील रिसर्च आणि इनोव्हेशन सेंटर स्थापित झाले तर त्याचा विशेष फायदा नाशिकसह राज्याला होईल, अशी खात्री ‘मटा राऊंड टेबल कॉन्फरन्स’मध्ये उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. तसेच, संभाव्य आयटी धोरणामध्ये कुठल्या बाबी आवश्यक आहेत.

खराब हवामानाचा द्राक्षांना फटका

0
0
जगभरात नावलौकिक असलेली नाशिकची द्राक्षे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत नाशिककरांसाठी बाजारात दाखल होतात. यंदा फेब्रुवारीचा तिसरा आठवडा सुरू होऊनही द्राक्षांची पुरेशी आवक नसल्याने सर्वसामान्य नाशिककर घरच्या द्राक्षांची प्रतीक्षेत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली निसर्गातील अनियमिततेमुळे चांगल्या द्राक्षांसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

पाणीपट्टी-घरपट्टी दरवाढ फेटाळली

0
0
महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रकात सुचवलेली घरपट्टी आणि पाणीपट्टीतील वाढ स्थायी समितीने अखेर फेटाळून लावली. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाला अनेक फाटे फुटले असून त्यांना रोखा, असा आदेश देत स्थायी सभापती रमेश धोंगडे यांनी सूचना आणि दुरुस्त्यांसह १ हजार ८७५ कोटी ६९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली.

वसतीगृहातून १७ मुली फरार

0
0
नाशिकमधील सावकरनगर परिसरातील वात्सल या शासकीय वसतीगृहातून १७ मुली आज (बुधवार) पहाटे फरार झाल्याचे समोर आले आहे. यामुळे वसतीगृह प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. १७ मुलींपैंकी ८ मुली सापडल्या असून ९ मुली अद्यापही बेपत्ता असल्याचे समजते आहे.

नाशकात बारबाला पसार

0
0
सुरक्षारक्षकावर मिरचीपूड फेकून १७ बारबालांनी धूम ठोकल्याचा प्रकार बुधवारी पहाटे अशोकस्तंभजवळील शासकीय वात्सल्य वसतीगृहात घडला.

नाट्यगीतात रमले नाशिककर

0
0
संस्कारभारती आयोजित ‘नाट्य संगीत’ कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिककरांची बुधवारची संध्याकाळ स्मरणीय झाली. निमित्त होते भरतमुनी जयंतीचे. संस्कार भारतीच्या सहा उत्सवांपैकी एक असलेल्या भरतमुनी जयंती उत्सव साजरा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अधिकारी नवे, पण गुन्ह्यांचे काय?

0
0
पोलिस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच तीन वर्षांच्या नियमानुसार बदल्या झाल्या आहेत. त्यात नाशिकरोड आणि उपनगर या पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दरवर्षी बदल्या होतात, अधिकारी येतात तेवढ्यापुरती परिस्थिती सुधारते. परंतु काही दिवसातच पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती होते.

मोबाइलची कबुली

0
0
आपल्या स्टेटस प्रमाणे मोबाइल वापरण्याची पध्दत सध्या मूळ धरु लागली आहे. मोबाइल ऑपरेट करता येत नसेल तरी चालेल. तो जवळ बाळगण्यात धन्यता मानणारे अनेक महाभाग आहेत. अशाच एका अधिकाऱ्याने नवीन मोबाइल घेतला.

अनुदानावरून सावळा गोंधळ

0
0
कांदा टंचाईवर महत्त्वपूर्ण उपाय ठरलेल्या कांदा चाळींच्या अनुदानाची योजना राज्य शासनाने पणन मंडळाकडून कृषी विभागाकडे हस्तांतरित केली आहे. मात्र, नवीन प्रस्ताव स्विकारण्याबाबत कृषी खात्याला कुठलेही अधिकृत निर्देश मिळालेले नाहीत, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे.

खंडेराव बर्वे यांचा अपघातात मृत्यू

0
0
नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर जवळील चिंचोली शिवारात शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख व डूबेरेचे उपसरपंच खंडेराव बर्वे यांचा अपघातात मृत्यू झाला. पाठीमागून येणाऱ्या खासगी बसने दुचाकीला घडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कमी उंचीचे दुभाजक‌ बनले धोकेदायक

0
0
नाशिक-पुणे या अत्यंत वर्दळीच्या महामार्गावर उंच दुभाजकांची गरज आहे. व्दारका ते सिन्नर फाटा या दरम्यान दुभाजकांची दुरवस्था झाल्यामुळे अपघात होत आहेत. अनेक बेशिस्त वाहनधारक अचानक दुभाजक ओलांडून विरुद्घ दिशेच्या रस्त्यावर वाहन नेतात.

व्यापाऱ्यांचा उद्या बंद

0
0
स्थानिक संस्था कर हटविण्यासाठी नाशिकसह राज्यभरातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी बंदचा नारा देतानाच मुंबईत आझाद मैदान येथे सभा घेण्याचे निश्चित केले आहे. यामुळे शुक्रवारी शहरातील व्यापार ठप्प होण्याची चिन्हे आहेत.

‘क्विक लेन’ सेंटर नाशकात

0
0
फोर्ड कंपनीच्या शोरूममधून कार घेतल्यानंतर त्यांना अविरत कार सर्व्हिस देण्यासाठी आशियातील चौथे आणि देशातील तिसरे ‘क्विक लेन’ सर्व्हिस सेंटर नाशिकमध्ये सुरू केल्याची घोषणा फोर्ड कंपनीचे कस्टमर सर्व्हिस ऑपरेशनचे उपाध्यक्ष पी. के. उमाशंकर यांनी केली.

फिरत्या दवाखान्यांचा सुळसुळाट

0
0
नाशिक-पुणे रोडवर सध्या फिरत्या दवाखान्यांचा सुळसुळाट झाला असून जागोजागी उभ्या असलेल्या दवाखान्यांमुळे सामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. या दवाखान्यांकडे कोणतेही परवाने नसून प्रशासनाने यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

अटल ज्ञान संकुलाचे लोकार्पण

0
0
नाशिक जिल्ह्यातील अद्ययावत अशा अटल ज्ञान संकुलाचा व लोकमान्य उद्यानाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (२२ फेब्रुवारी) भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images